Posts

Lockdown मधील पाककौशल्य भाग ५

Image
 Lockdown मधील पाककौशल्य भाग ५ सध्या घरूनच काम सुरू असल्याने एकदा सकाळी दोन्ही वेळचं जेवण बनवून दिवसभर कामाला बसावं लागतं. एकसारखं डाळभात आणि उसळी खाऊन कंटाळा यायला लागला. मग विचार केला तसंही जेवण बनवायचं आहेच तर रोज वेगवेगळे पदार्थ try करायला काय हरकत आहे, तेवढेच नवनवीन पदार्थ शिकता येतील.  तर गेल्या काही आठवाड्यातले घरी (जेवण / नाश्त्यासाठी / नैवेद्यासाठी) बनवलेले काही पदार्थ खालीलप्रमाणे : 🔹केरळ style Coconut Milk Egg Curry https://cookpad.com/in-mr/recipes/14915006-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-coconut-milk-egg-curry-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes 🔹दम आलू https://cookpad.com/in-mr/recipes/14922587-%E0%A4%A6%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%82-dum-aloo-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes 🔹कढी पकोडे चावल https://cookpad.com/in-mr/recipes/14942009-%E0%A4%95%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%...

रामकथामाला

Image
 रामकथामाला College मधली गोष्ट. नेहाचा मित्र स्वप्निल, भेटला की greet करताना 'जय श्री राम' बोलायचा. छान वाटायच ते. Hi-Hello बोलणारी पिढी जेव्हा आपल्या आधीच्या पिढीचे संस्कार पुढे घेऊन चालते. मला भेटल्यावर पाहिलं वाक्य असायचं त्याचं - 'जय श्री राम घुडे साब' 😀 साब - साहेब 😁 मला या गोष्टीचीही मजा वाटायची ऐकताना 😄 पण झालं असं, मलाही या गोष्टीची अशी सवय लागली की तो भेटला की त्याच्या आधी मीच 'जय श्री राम' बोलून मोकळी व्हायचे 😄 म्हणजे बघा हा, सवय कशी लागते. अशाच सवयी आपण आपल्या पुढच्या पिढीला लावणं गरजेचं आहे, नाही का?  सगळीकडे Marvel movies चे फॅन्स एवढे आहेत (जास्त का, मी ही त्यातलीच 😁). त्यातले काही characters पाहिले की लक्षात येतं, Americans ही त्यांच्या पुराण कथांमध्ये रमतात पण आपण आपल्या पुराण कथांचे दावे दिले की आपण बुरसट ठरतो. Thor, Odin, Loki, Bifrost हे cool पण त्याऐवजी आपण पवनदेव किंवा नारद अशी नावं घेतली तर लगेच समोरचा नाकं मुरडतो 😑 पुढील पिढीला तरी आपल्या Super Heroes ची ओळख करून देणं गरजेचं आहे. Recently Disney+Hotstar वर Legend Of Hanuman 13 Episod...

The Eyes of Darkness 👁️

Image
The Eyes of Darkness 👁️ Novel by American Writer Dean Koontz published in 1981. 🧗🏽‍♀️🧗🏻‍♂️⛰️🏔️🗻 Women Christiana lost her son Dany in accident one year ago. She sent him for camping in mountains. And there in mishap all truop members got dead... After one year, suddenly she started getting message in Dany's room .... NOT DEAD... AND HERE THE STORY BEGINS.. We start thinking about supernatural activity.. then telepathy.. then Psychokinesis.. then telekinesis... Till the end of the story, we get astonished with whole plot twist.. 🦠 But more than that writer tells of a Chinese military lab that creates a virus as part of its biological weapons programme. This fiction book predicted the Wuhan virus around 40 years ago? A thriller novel written  in 1981, mentioned a virus named Wuhan-400. In the novel, the virus was created as a weapon in a laboratory. Thats really strange.. Fiction can definitely be strange at a times. 😃 🧫 Definitely a catchy novel, dont miss to read 📖 ⌛ ...

पाककौशल्य भाग ४

Image
पाककौशल्य भाग ४ Grated Coconut - Condensed Milk - Chocolate Roll Actually Facebook वर वेगळी recipe बघताना हा पदार्थ सुचलाय. आमच्याकडे खोबऱ्याचा सदैव सुकाळ त्यामुळे ते कुठे कुठे वापरायच त्यासाठी आयडिया शोधाव्या लागतात. 😁 खोबरं किसून, भाजून, मिक्सर वर बारीक करून पुन्हा कढई मध्ये काढून घेतलं. मंद आचेवर परतत त्यात condensed milk mix करत गेले. यात पण बरेच उद्योग झालेच म्हणा. नेहमी काहीतरी छोटे-मोठे अपघात होतच असतात माझ्या बाबतीत, त्यातलाच हा एक. Milkmaid चा पत्र्याचा डबा होता. त्यातलं उरलेला ऐवज बोटांनी पुसून घ्यायला(एक थेंब पण सोडत नाही आपण, संसारी ना 😋) आणि आतली sharp edge दोन बोटांच्या मध्ये घुसत हात चिरायला, एकच क्षण. लगेच नळाखाली धरला पण रक्त काही थांबेना. खूप आत घाव गेलेला. बेसिन मध्ये रक्त. मूर्खासारखं त्यावर बर्फ धरला आणि रक्त काळं पडायला लागल. बहिणीने गूगल करून पाहिलं तर बर्फ नाही लावायचा, हळद लावून घाव घट्ट धरायचा(opposite to gravitational force). मग बऱ्याच वेळाने थांबलं रक्त. bandage करून मग पुढची procedure केली 😬 तर हे condensed milk घातलेले खोबरं गॅस बंद करून कोमट झाल्यावर त...

आज रविवार. आज मस्त आराम करायचा..

Image
 आज रविवार. आज मस्त आराम करायचा.. ... असं शनिवारीच ठरवलं होतं. तो रविवारची पहाट उजाडलीच ती हवेत गारठा घेऊन. मस्त त्या दुलई तुन अंग बाहेर निघत नव्हतं. पण बहिणीला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे तिला सोडायला मला उठणं क्रमप्राप्त होतं. असो, तीला सोडून आल्यावर पुन्हा रजईत शिरायचं असं ठरवून बाहेर पडले. बाहेर जमीन ओली दिसली, अरे एवढं दव पडलंय?? मग लक्षात आलं, दवबिंदू नाही पावसाची रिपरिप आहे ती. 🤦 पण थंडी जशी हवी तशीच 🤗🌨️ घरी येताना वर्तमानपत्र घेऊन आले, नेहमी त्या tv/ मोबाईल वर बातम्या वाचून/पाहून कंटाळा आला होता.  गॅलरी समोर बसून, इत्यंभूत पेपर वाचत, हातातल्या ऊन ऊन चहाचा घोट रिचवत रविवार सकाळची सुरुवात झाली 😍 तासा - दीड तासाने बहिणीचा इच्छित स्थळी पोहोचल्याचा कॉल येईलच तेवढ्यात एक झोप काढून घेऊ म्हणून पुन्हा रजई गुंडाळून घेतली. पण म्हणतात ना, गाढवाला ओझं वाहायची एवढी सवय झालेली असते की एखाद्या दिवशी ओझं कमी झालेल असेल तरी त्याला त्रास होतो 😅 तशी परिस्थिती आहे माझी 😜 जरा स्वस्थ बसलं की कामांची लिस्ट डोळ्यांसमोर दिसायला लागते. घरातली कामं करायला रविवारच तर मिळतो. प...

जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर

Image
जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर Middle class किंवा upper middle class कथेच्या नायिकांभोवती रेंगाळणार्या कथा. पहिली कथा आवडली, नंतरची २-३ प्रकरणं वाचल्यावर वाटायला लागलं कथा अर्धवट सोडलेल्या का वाटतायेत?! तरीही पुढच्या कथा वाचत राहिले.. एक ध्यानात आलं खरं.. कथा अर्धवट नाही सोडल्या आहेत, तिथूनच तर खरी कथेला सुरू होणार आहे.. प्रत्येक कथेच्या शेवटाला तो धागा तसाच मोकळा सोडलाय, वाचकांसाठी, विचार करायला.. खरं पाहिलं तर हाच realistic approach नाही का?! नाहीतरी आपल्या आयुष्यातही आपली कथा चालतच तर आहे.. आपण जिवंत असेपर्यंत.. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तिपूरता तो धागा संपतो.. आपला धागा तर आयुष्यभर चालतच असतो..  मला या कथासंग्रह मधल्या ४ कथा खूप आवडला - ●मारियाची बहीण जेन ●नव्या कोऱ्या पांढऱ्या साडीचे एक टोक ●आई नावाची बाई ●मात कथांच्या शेवटचे twist एकदम जबरदस्त आहेत.  ~ सुप्रिया घुडे

1st Day for Office After Lockdown

Image
महिलांसाठी लोकल्स चालू झाल्या त्यामुळे आता ऑफिस ला जाणं क्रमप्राप्त होतंच. गेले आठ महिने पंचक्रोशी च्या बाहेरही न पडलेली मी सीमोल्लंघन करत ऑफिस ला पोहोचणार होती. कालच्या शुक्रवारी अगदी शाळेतला पहिला दिवस असल्यासारखी उत्सुकता. 👧 बाहेर अजूनही कोरोना प्रभाव कमी न झाल्याने स्वतःच्या शरीराची बांधाबांध करून आम्ही लोकल वर स्वार होण्यास तयार ⚔️  तशीही यापूर्वी सुद्धा घरातून बाहेर पडताना अशीच pack होऊन निघायचे म्हणा, आता फक्त त्यात hand gloves ची भर पडली 🤷 किर्ती एक आठवडा अगोदर पासून ऑफिस ला जायला लागून जुनी झाली होती, त्यामुळे माझी कौतुकं तिला याची डोळा पहावी लागत होती 🤦 नंदू सरांना लांबूनच पाय लागू करत, त्यांना follow करत, जबरदस्ती किर्ती कडून स्वतःचा निघताना एक फोटो काढून घेतला 🙆😋😜 station ला पोहोचल्यावर लक्षात आलं, आपणच घरात बसून होतो तर, सगळं जग बाहेर फिरतंय 😁 मग एकेका बायकांचे varieties of masks बघत, आपण बांधलेल्या scarf ची लाज वाटायला लागली, आणि अजूनही मी fashion जगतात खूपच मागासलेली असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली 😝😷👻 तरी नशीब किर्ती ने नवीन style चे मास्क घेऊन ठेवले होते म...