महायुग by स्वप्नील सोनवडेकर
पुस्तक : महायुग लेखक : स्वप्नील सोनवडेकर पृष्ठसंख्या : २०३ https://www.amazon.in/-/hi/Swapnil-Sonawdekar/dp/1685099653 ब्रह्माच्या एका दिवसाला “कल्प” असे म्हणतात. एक कल्प उलटले की महाविनाश घडतो. ब्रह्माचा हा एक दिवस एक हजार महायुगांचा मिळून बनलेला असतो. या एक हजार युगातच चौदा मन्वंतरे घडतात. प्रत्येक महायुग हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा चक्रातून जाते. सत्ययुग चार हजार वर्षांचे, त्रेतायुग तीन हजार वर्षांचे, द्वापारयुग दोन हजार वर्षांचे तर कलियुग एक हजार वर्षांचे असते. याशिवाय यातील सत्य आणि त्रेता, त्रेता आणि द्वापार अशा प्रत्येक दोन युगात मध्यंतरीची काही वर्षे असतात. हा मधला काळ एकूण दोन हजार वर्षांचा असतो. त्यामुळे प्रत्येक महायुग एकंदर बारा हजार वर्षांचे असते आणि ब्रह्माच्या एका दिवसात अशी तब्बल एक हजार महायुगे असतात. म्हणजे ढोबळपणे सांगायचे तर एका मन्वंतरात ४ महायुगे असतात. सद्यकाळातील कल्प हे वराहकल्प किंवा श्वेतवराह कल्प म्हणून ओळखले जाते. ही सगळी माहिती मी का सांगतेय? तर स्वप्नील सोनवडेकर यांची महायुग कादंबरी वाचण्याआधी पुराणांची थोडी तोंडओळख असेल तर ही का