Posts

Showing posts from December, 2018

धन्य ती Gynaec कला - डॉ. मीना नेरुरकर

Image
धन्य ती Gynaec कला - डॉ. मीना नेरुरकर डॉ. मीना नेरुरकर यांच्या विषयी सांगावं तेवढं कमीच आहे. Gynecologist, actor, director, author, playwright, dancer and choreographer, एकच व्यक्ती आयुष्यात एवढे सारे role करू शकते, हे बघून कमाल वाटते आणि अभिमान सुद्धा. http://www.meenanerurkar.com/about.html दादर, महाराष्ट्रात शिकून सध्या अमेरीकास्थित लेखिकेच as a Gynecologist म्हणून अनुभव कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. अमेरिका आणि भारतातील cultural difference, आचार-विचार याचं लीलया वर्णन लेखिकेने केलेलं आहे. लहानपणी स्वतःच्या सावळ्या रंगाबद्दल असलेला न्यूनगंड अमेरिकेत गेल्यावर कसा कमी झाला, तिथे तुमच्या कामाला कसं प्राधान्य दिलं जातं, याबद्दल लेखिकेने सांगितले आहे. अमेरिकन lifestyle चा एक मंत्र आहे - You have one life to live. So do whatever you want. As long as you do not hurt others, go ahead and live your life to the fullest. They take complete pride in whatever work they do. आणि अमेरिकेच्या उन्नतीचं हेच मुख्य कारण आहे. लेखिकेचे अमेरिकेतील डॉक्टरी पेशातील patients handle ...

मार्जारगाथा - रुपाली पारखे - देशिंगकर

Image
मार्जारगाथा - रुपाली पारखे - देशिंगकर जेव्हा don एक dialogue बोलतो - I love wild cats,मुझे जंगली बिल्ली बहोत पसंद हैं.. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक रानमांजर येतं नेहमी. परंतु त्या रान मांजरात सुद्धा अजून प्रकार आहेत, ते मार्जारगाथा वाचून कळलं. मी एक hardcore मांजरप्रेमी असल्या कारणाने हे पुस्तक घेतलं, आणि त्यात बरीच रंजक माहिती मिळाली. मांजरांचे विविध प्रकार, त्यांचं राहणीमान, जीवनशैली,  एकूणच मार्जारकुळाची माहिती या पुस्तकात मिळेल.  Discovery Tai चं लिखाण मी नेहमी Day To day nature मधून वाचत आलेली आहे, ताई ची लेखनशैली जबरदस्त आहे, त्यामुळे तीच मार्जारगाथा हे पुस्तक सुद्धा माहिती देण्याच्या बाबतीत अजिबात निराश करत नाही. लहानथोर सर्वांनी वाचावं अशी ही मार्जारकुळाची महितीपुस्तिका आहे. साप्ताहिक विवेक च्या Sub-Editor - शीतल खोत यांनी पुस्तक माझ्या पर्यंत पोचण्यासाठी खूप मदत केली, त्यांना मनापासून धन्यवाद!

Wall Panting - Warali Painting

Image
गेले एक दीड वर्षं फक्त मातीच्या रंगाचं background भिंतीवर रंगवून ठेवलं होतं. येता-जाता पावणे-रावळे सगळे विचारायचे, काय करायचं ठरवलंय इथे.. सगळंच गुलदस्त्यात.. त्यात घरात असे प्रसंग घडत होते की हातात brush घ्यायची इच्छा ही होत नव्हती.. या आधी एक wall painting हातात घेतलं होतं, तेव्हा brush तसंच ठेवून दिलं, त्यानंतर कधी आई आली तेव्हा रंगाने कडक झालेलं brush बघून खूप रागावली, म्हणे वडिलांकडून फक्त कला घेतली, थोडी अक्कल पण घ्यायची, बाबा बघ काम झालं की कसे रंग-brush, सगळ्या जागच्या जागेवर वस्तू.. मागच्या वर्षी बाबांच्या वर्ष श्राद्धाला घरच्या garden wall वर wall painting केलं होतं. रस्त्यावरून जाणारे सगळे विचारायचे आई ला, कोणाकडून करून घेतलं, आईला माझं कौतुक - "माझ्या मोठ्या लेकीने केलंय.." . . शेवटी काल ठरवून हे रखडलेलं काम पूर्ण करायचं ठरवलं.. 4 festivals of india in Warali ( वारली ) painting.. सलग चार तास लागले पूर्ण करायला.. . . . सगळं काम झाल्यावर रंग, स्वच्छ केलेलं brush जागच्या जागेवर.. आता आवरून देणारं कोणी नाहीये.. आणि कौतुक करणारं माझं माणूस पण राहिलेलं ...

घर - अंगण : दीपाली पाटवदकर

Image
घर - अंगण : दीपाली पाटवदकर स्त्री कितीही careeristic असली तरी घरातली कामं काही तिचा पिच्छा सोडत नाहीत. म्हणजे मला आठवतं, मी आई ला नेहमी बोलायचे, तुला कंटाळा नाही येत घरात एकसारखं राबायला, मी तर अजिबात अशी घरातली कामं नाही करत बसणार, एखादी कामाला बाई लावेन हवं तर. त्यावर आई चं उत्तर ठरलेलं असायचं, आपल्या घरातली कामं करायला कसला कंटाळा. आणि या गोष्टीचं प्रत्यय मी स्वतः घर घेतल्यावर आला. वर वरच्या कामाला जरी बाई लावलेली असली, तरीही माझी घरातली कामं काही चालूच असतात. स्वतःचा संसार म्हणून आपोआप घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आवड निर्माण व्हायला लागते.. अशाच छोट्या छोट्या गोष्टींचं अनुभव कथन केलेलं आहे लेखिकेने या पुस्तकात. त्यामुळे आपसूकच या गोष्टींशी आपण नकळत जुळले जातो.. दुसरं घराचं प्रत्यंग म्हणजे - अंगण. सध्याच्या flat संस्कृतीत अंगणाच रूपांतरण gallery मध्ये झालेलं आहे म्हणा. पण अंगण म्हटलं की आमची आधीची कौलारू घरं आठवतात (typical कोकणी 😇). त्यासमोरच ऐसपैस अंगण, तिथे मांडलेले खेळाचे डाव, गप्पागोष्टी, सहभोजन, काय आणि काय.. अर्ध आयुष्य त्या अंगणातच गेलं असेल.. लेखि...

वास्तव रामायण - डॉ. प. वि. वर्तक

Image
वास्तव रामायण - डॉ. प. वि. वर्तक रामायण - महाभारत म्हटलं की आजच्या पिढीला त्यातल्या गोष्टी अतिशयोक्ती वाटू लागतात. लढाईत होणारे बाणांचे वर्षांव, जादू वाटावी असे निरनिराळे होणारे चमत्कार, वानर किंवा पक्षी कसे काय माणसांत मिसळून लढाई करू शकतात. आजच्या पिढीला या सगळ्या गोष्टी अतर्क्य वाटू लागतात, मग वाटत आपणही इतके वर्षं या अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास कसा काय ठेवला?? परंतु रामायणा वर practical approach ठेवून डॉ प. वि. वर्तक यांनी लिहिलेला 'वास्तव रामायण' हा शोधनिबंध वाचून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतात -- ∆ खगोलशास्त्राचा अभ्यास करून निश्चित केलेला रामायणाचा कालखंड (** तरीही यावर बर्याच लोकांची दुमत आहेत) ∆ रावण हा खरंच दहा तोंडाचा नसून ते ek machine असावं जे machine लढाई मध्ये रावण स्वतः वापरत असावा ∆  हनुमान, वाली सुग्रीव - जटायू हे प्राणी नसून प्राणी-पक्ष्याचा वेष धारण करणारी जमात असावी, कारण अजूनही अशा आदिवासी जाती - जमाती जगात अस्तित्वात आहेत. ∆ पाताळ म्हणजे दक्षिण अमेरिका असावी, राक्षस हे विषुववृत्तीय प्रदेशातील लोक असावेत. सिलोन किंवा श्रीलं...

तुंबाडचे खोत श्री. ना. पेंडसे

Image
तुंबाडचे खोत - जगबुडी नदीच्या च्या किनाऱ्यावर वसलेली खोत घराण्याची चार पिढ्यांची द्विखंडी कहाणी. पेशवाईच्या उत्तरार्धा पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या कालखंडांत खोतांचा सगळा जीवनपट पुरा होतो. या कादंबरीतील एकमेव भारावून टाकणारं व्यक्तिमत्व वाटलं मला ते म्हणजे - नरसु खोत. क्षुद्र बुद्धीच्या लोकांना त्याने कधीच भाव दिला नाही. दिलदार माणूस, चुलत भावंडं नेहमी जळत, कुरघोडी करत राहिले त्यावर, तरी त्याने त्याकडे लक्ष दिला नाही, त्यांना तो अक्षरशः खेळवत राहिला. परंतु हीच लोकं संकटं आल्यावर नरसु कडे धाव घेत, आणि मदत मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्याने कधीच माघारी पाठवलं नाही. हा नरसु जगला त्यात शान होती! परंतु आयुष्यात चढ-उतार असायचेच. अशा राजस प्रकृतीच्या माणसाला आयुष्याच्या उत्तरार्धात अपमान, चरित्र्यावरचे उडालेले शिंतोडे सहन करावे लागले. तरी त्याचा मृत्यू 'शान से' व्हायचा होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा तो काळ. नरसुने मामलेदार काचेरीवर काँग्रेस चा झेंडा फडकवला आणि घोषणा दिल्या - "इंग्रजानो चालते व्हा - छोडो हिंदुस्थान-" आणि पोलिसांनी आदेश दिला - ...