घर - अंगण : दीपाली पाटवदकर

घर - अंगण : दीपाली पाटवदकर






स्त्री कितीही careeristic असली तरी घरातली कामं काही तिचा पिच्छा सोडत नाहीत.
म्हणजे मला आठवतं, मी आई ला नेहमी बोलायचे, तुला कंटाळा नाही येत घरात एकसारखं राबायला, मी तर अजिबात अशी घरातली कामं नाही करत बसणार, एखादी कामाला बाई लावेन हवं तर. त्यावर आई चं उत्तर ठरलेलं असायचं, आपल्या घरातली कामं करायला कसला कंटाळा.
आणि या गोष्टीचं प्रत्यय मी स्वतः घर घेतल्यावर आला. वर वरच्या कामाला जरी बाई लावलेली असली, तरीही माझी घरातली कामं काही चालूच असतात. स्वतःचा संसार म्हणून आपोआप घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आवड निर्माण व्हायला लागते..
अशाच छोट्या छोट्या गोष्टींचं अनुभव कथन केलेलं आहे लेखिकेने या पुस्तकात. त्यामुळे आपसूकच या गोष्टींशी आपण नकळत जुळले जातो..
दुसरं घराचं प्रत्यंग म्हणजे - अंगण.
सध्याच्या flat संस्कृतीत अंगणाच रूपांतरण gallery मध्ये झालेलं आहे म्हणा. पण अंगण म्हटलं की आमची आधीची कौलारू घरं आठवतात (typical कोकणी 😇).
त्यासमोरच ऐसपैस अंगण, तिथे मांडलेले खेळाचे डाव, गप्पागोष्टी, सहभोजन, काय आणि काय.. अर्ध आयुष्य त्या अंगणातच गेलं असेल..
लेखिकेच्या 'अंगणातल्या' stories वाचताना आपोआप तुमच्या जुन्या आठवणी जाग्या होतात..
लेखिकेची प्रत्येक गोष्ट explain करण्याची style मला या आधीच्या 3 पुस्तकांतून खूप आवडली होती.

https://supriyaghude.blogspot.com/2018/03/by.html?m=1
https://supriyaghude.blogspot.com/2018/04/blog-post_73.html?m=1

हे पुस्तक सुद्धा आवर्जून वाचावं असं आहे.
Happy Reading! 📖

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर