वास्तव रामायण - डॉ. प. वि. वर्तक

वास्तव रामायण - डॉ. प. वि. वर्तक






रामायण - महाभारत म्हटलं की आजच्या पिढीला त्यातल्या गोष्टी अतिशयोक्ती वाटू लागतात. लढाईत होणारे बाणांचे वर्षांव, जादू वाटावी असे निरनिराळे होणारे चमत्कार, वानर किंवा पक्षी कसे काय माणसांत मिसळून लढाई करू शकतात. आजच्या पिढीला या सगळ्या गोष्टी अतर्क्य वाटू लागतात, मग वाटत आपणही इतके वर्षं या अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास कसा काय ठेवला?? परंतु रामायणा वर practical approach ठेवून डॉ प. वि. वर्तक यांनी लिहिलेला 'वास्तव रामायण' हा शोधनिबंध वाचून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतात --
∆ खगोलशास्त्राचा अभ्यास करून निश्चित केलेला रामायणाचा कालखंड (** तरीही यावर बर्याच लोकांची दुमत आहेत)
∆ रावण हा खरंच दहा तोंडाचा नसून ते ek machine असावं जे machine लढाई मध्ये रावण स्वतः वापरत असावा
∆  हनुमान, वाली सुग्रीव - जटायू हे प्राणी नसून प्राणी-पक्ष्याचा वेष धारण करणारी जमात असावी, कारण अजूनही अशा आदिवासी जाती - जमाती जगात अस्तित्वात आहेत.
∆ पाताळ म्हणजे दक्षिण अमेरिका असावी, राक्षस हे विषुववृत्तीय प्रदेशातील लोक असावेत. सिलोन किंवा श्रीलंका हे सुद्धा विषुववृत्ताच्या जवळ आहे.
∆ राक्षस जमातीकडे अद्ययावत technical skills होत्या. विमाने बनवण्याची कलाही अवगत होती, परंतु रामाने सगळ्या राक्षस जमातीला लढाईत नष्ट केल्याने यंत्र बनवणारे कारागीर आणि पर्यायाने ती कलाही ही नष्ट झाली
∆ शिवलिंगाच्या विकृत संकल्पनेला लेखकाने तडा देऊन, त्याबद्दल व्यवस्थित शास्त्रीय विश्लेषण केलेलं आहे.
∆ सत्याला अनुसरून रामाचे बरेचसे दोषही दाखविलेले आहेत

या आणि अशा बऱ्याचशा गोष्टींचं लेखकाने केलेल्या स्पष्टीकरणामुळे तत्कालीन परिस्थितीची जाणीव होते.
या ग्रंथातल्या प्रत्येक प्रकरणासाठी केलेल्या संशोधनासाठी अपार कष्ट घेतल्याची जाणीव होते.
आवर्जून वाचावे असे हे वास्तव रामायण आहे.

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर