Posts

Untold Feelings...

खूप भीती वाटते मला हल्ली.. सगळी माझ्या जवळची माणसं नाहीशी होतं चालली आहेत.. कधी वाटतं वेड लागेल मला विचार करून.. खरंच मला फरक पडतोय का की नाही पडत आहे??? तशीही मी एकटी लांब राहतेय सगळ्यांपासून, तसाही काय फरक पडतो ना.. कधी वाटत सगळी लोकं आहेत जिवंत, बस्स मी लांब आहे म्हणून मला नाही भेटत आहेत.. म्हणजे मी सगळं assume करतेय का??? म्हणजे नक्की काय होतंय.. की मी एकटी पडलेय.. पूर्ण एकटी... माझं मरण कसं असेल, कोणी असेल तरी का शेवटच्या क्षणी माझा सोबत, पण तसही काय फरक पडतो कोणी नसलं तरी, मी तर या जगातच नसेन.. कोणचं नव्हतं भेटलं मला शेवटच्या क्षणी, नाही बाबा नाही काका.. मला वाटलं पण नव्हतं जी भेट घेतली ती शेवटची भेट होती.. मला वेड लागेल खरंच विचार करून आता.. मामाची news ऐकून काल मी वेड्यासारखी काहीतरी timepass करत बसले, म्हणजे त्रास होत होता.. मला वाटत होतं काहीतरी.. मी दगड झालेय का, की मी स्वतःला सावरतेय, की मला आता काहीच फरक पडत नाहीये.. मला घरची आठवण येतेय, Hereafter I can't loose anyone .. I cant.. I can't afford to... मला खूप भीती वाटतेय... खूप... मला हवेत सगळे... मी नाही राहू...

कुठेतरी वाचलेले - १

Image
अश्वत्थामा, कृष्ण सखा उद्धव यासोबत द्वारकेतील समुद्रा वरील भेटीमध्ये  बोलताना.. अश्वत्थामा - उद्धवजी, सागर तुम्हाला कसा वाटतो?... उद्धव - सागर गुरुसारखा वाटतो. त्याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. शत योजने विस्तीर्ण असलेला आणि गहन गोष्टी असलेला सागर आपल्या पोटी अनेक रत्ने बाळगून आहे. अगणित संपत्ती त्याच्या उदरी आहे. असंख्य जलचर त्याच्या पोटी विहारताहेत. त्याच्या आकाशाला भिडण्यासाठी उसळणाऱ्या लाटा पाहून डोळे दिपतात. सागराचं अफाट बळ आणि व्याप्ती लक्षात घेता असं वाटतं की, एका क्षणात पृथ्वी आपल्या उदरात गडप करेल. पण हजारो वर्षे झाली. त्याने आपल्या मर्यादा उल्लंघल्या नाहीत. आपल्या मर्यादेच्या आतच सुखनैव गर्जतो आहे. त्याच्या पोटातील वडवानल त्याला नित्य ताप देतात, जाळतात. पण त्याच दुःख त्याच्या पृष्ठभागावर दिसत नाही. सागर स्थितप्रज्ञ योग्यासारखा आपल्या जागी अचल आहे. सागर कुणावर आक्रमण करत नाही. परवस्तू आपल्या पोटात ठेवत नाही. माणसाने सागरासारखं असावं. आपल्या मर्यादा जाणाव्यात. अपेक्षा सीमित कराव्यात. ज्याचा आपल्याला कधीही उपयोग होणार नाही अशा परावस्तूंचा हव्यास टाळावा. माणूस स...

चित्र ज्ञानेश्वरी (कर्मयोग) भाग १ आणि २ - by दीपाली पाटवदकर

Image
चित्र ज्ञानेश्वरी (कर्मयोग) भाग १ आणि २ - by दीपाली पाटवदकर Deepali Patwadkar IT क्षेत्रातली व्यक्ती, कलेशी नाळ जोडून आहे.. कुठेतरी माझाशी साधर्म्य वाटायला लागलं, आणि आपोआप पुस्तक वाचताना बंध जुळत गेले... भगवद्गीता किंवा महाभारत हे माझे नेहमीचे आवडीचे विषय आहेत. अजूनपर्यंत भगवद्गीतेवर खूप जणांनी टीका - टिप्पणी - मते - मतांतरे - भाष्य - भाषांतरे केलेली आहेत. प्रत्येकाची पाहण्याची नजर वेग - वेगळी असली तरी गाभा तोच.  तशीच संत ज्ञानेश्वरांच्या लेखणीतून उतरलेली 'भावार्थदीपिका' म्हणजेच 'ज्ञानेश्वरी' ... 'ज्ञानेश्वरी'.. इथे लेखिकेच्या नजरेतून.. पण ती सुरु होते एका 'बिंदू' पासून.. "बिंदू".. आरंभही तोच ..  अंतही तोच .. एकेक बिंदू जोडून, रेषा जोडत लेखिका आपल्यासमोर ज्ञानेश्वरी उभी करत जाते.. प्रत्येक illustration मागे घेतलेली मेहनत आणि patience वाखाणण्याजोगा आहे 👌 एक वेगळाच concept , या आधी कधी विचार केला नव्हता.. आणि तिच्या हातून घडलेल्या या कार्याचं श्रेय ती ज्ञानोबांना देतेय :) कधीही कोणतंही पान उघडा, वाचा, चिंतन करा, कामा...

Kingfisher ची fishing

वेळ - जवळपास दुपारचे ३.३० गणपती घरात बसलेत. नुकतेच जेवणावळी उठून पांगापांग झालीये. भाद्रपदातल्या पावसाची एक सर जोरररात कोसळून गेलीये.. पावळ्यातसून पाणी गळतंय. समोर हिरवंगार भाताचं शेत.. बाजूला चरणारे बैल.. लांबून जंगलातून येणारे पाणकोंबड्या आणि बेडकांचे आवाज.. मधूनच चिमण्या / साळुंकीच्या गुजगोष्टींचं आवाज.. कावळ्या - काबूतरांची समोरच्या छतावर बसून पंख सुकवण्याची गडबड.. समोरच्या डोंगरावर चाल करून येणारा काळा मोठा ढग.. अंगणातल्या फुलांवर पाठशिवणीचा खेळ खेळणारी फुलपाखरांची जोडगोळी.. डबक्यातल्या बेडूक/माश्यांच्या पिल्लांवर लक्ष ठेवून वरच्या तारेवर ध्यानस्थ बसलेला किंगफिशर... ...घरातला बाप्पा मखरात बसून माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि मी gallery मध्ये बसून निसर्गावर लक्ष ठेवून आहे.. .. तेवढ्यात त्या kingfisher ने डबक्यात सूर मारून , पुन्हा आपल्या जागी बसून झटक्यात आपलं खाद्य गट्टम केलेलं आहे.. Woww.. मी एकटीच का या अवर्णनीय सोहळ्याची साक्षीदार व्हावी??! त्या kingfisher च्या fishing चा 'आंखो देखा हाल' type करायला मी घेतलेला आहे.. 🐟🐦 ~सुप्रिया घुडे~ गणेश चतुर्थी २...

फटकळपणा

आई : जरा फटकळपणा सोडून दे. मी : तुला फटकळपणा वाटत असेल, माझा तो स्पष्टवक्ततेपणा आहे. आई : माझ्या दृष्टीने तो फटकळपणा च आहे. मी : pls आई, atleast मी तुझ्या 'अमक्या-तमक्या' सारखी कोणाच्या पाठून बोलत नाही. जे काही आहे ते तोंडासमोर. आई : तू उगाच माझ्या माहेरच्या लोकांना मध्ये आणू नको. (इथे माझ्या आईचा पारा चढलेला असतो आणि माझी बहिण खुदूखुदू  हसत असते 😝) मी : अगं पण मी चुकीचं बोलतेय का, ते सांग मला. स्पष्ट बोललं तर 'फटकळपणा' आणि पाठून बोललं तर gossiping. माणसाने एक कोणता तो stand घ्यायला हवा ना. एकतर मी अजिबात बोलणार नाही किंवा जे काही आहे ते समोर बोलेन.  माणसाने binary पद्धतीत जगावं, 0 or 1, True or False, होय किंवा नाही. आई : जळली तुझी ती binary पद्धत (इथे आई एकूणच software technology ला आग लावून मोकळी झालेली असते) काय हवं ते कर, बोलू नको माझ्याशी जा.. (हे वाक्य म्हणजे वादात आई ला पुढे काही सुचत नाहीये, तिला माझं बोलणं पटत असलं तरी जगरहाटीपुढे ते मान्य पण करायचं नाहीये, तिला तिची हार स्पष्ट दिसतेय, परंतु तरीही ती मानायला तयार नाहीये 😜, आ...

भूमिती

Image
↔↔↔↔↔↔↔↔↔↔ भूमिती ... नारळ पाण्याने भिजवला की कोयत्याच्या २ फटक्यात नारळाचे २ भाग वेगवेगळे होतात. मग कोयती किंवा सुरीने हळुवार आतल्या खोबऱ्याच्या कडा काढाव्या लागतात, म्हणजे खोबरं किसताना व्यवस्थित किसलं जातं आणि कवड/करवंटी अगदी साफ होते. खोबऱ्याच्या कडा काढताना सुरीचं टोक बरोबर मध्ये ठेवून, सूरी गोल फिरवायची म्हणजे बरोबर कडा निघतात, नं तुटता. असलाच काहीसा प्रकार आपण शाळेत सुद्धा शिकलोय का?? 🤔 भूमिती मध्ये वर्तुळ काढताना... ??!! 🤓 कंपास चं टोक बरोबर मध्यावर ठेवून पेन्सिल चं टोक गोलवार फिरवायचं. झालं वर्तुळ ⭕ आता कळलं, भूमितीचा उपयोग स्वयंपाकघरात कसा होतोय ते??? 😝🏃🍚🍛🍳🍲🌯 ↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔ ~सुप्रिया घुडे~ 17-Jul-2017

नाळ

Image
नाळ आई - काय अद्भुत रसायन आहे यार हे. कस काय तिला माझ्या मनात काय चाललंय ते कळतं? विचारलं तर बोलते - "आई आहे तुझी मी". आता हे काय उत्तर झालं??! समोर असताना एक वेळ समजू शकते, चेहऱ्यावरचे बदललेले expressions तिला सांगून जात असतील, काय बिनसलय ते. ( माझंही थोबाड आहेच तसं, emotions नं लपवणार 😏 ). पण, phone वर बोलत असताना कसं काय कळू शकत, काय विचार करतेय ते मी, अगदी कितीही आवाज normal ठेवून बोला?? 🙄 सगळंच अजिब-ओ-गरीब.. म्हणजे अगदी सध्या-सध्या गोष्टी - बोलता - बोलता अचानक म्हणेल, "तुला तहान लागलीये का, जा पाणी पिऊन ये" आता कमाल झाली, या क्षणी माझा शरीराला पाण्याची गरज आहे हे तिला कस कळावं? 🤔 अगदी भारतीय अर्थव्यवस्थेवर जरी मी चर्चा करत असेन तरी अचानक विचारेल, "कोणाशी बिनसलय का तुझं? कशावरून चिड-चिड होतेय का.?!" आता तर म्हटलं हद्दचं झाली. आई ला कसं कळलं?? 🤔🤔🤔 गर्भाशयात असताना बाळ नाळेने आई च्या हृदयाशी जोडलेलं असतं. तेव्हा बाळाच्या हालचाली वरून आई ला कळत असेलही. पण अगं आई, तुझं हे बाळ कधीच नाळ तोडून बाहेर आलंय, या खुल्या जगात एकटं वावरत...