चित्र ज्ञानेश्वरी (कर्मयोग) भाग १ आणि २ - by दीपाली पाटवदकर
चित्र ज्ञानेश्वरी (कर्मयोग) भाग १ आणि २ - by दीपाली पाटवदकर Deepali Patwadkar
IT क्षेत्रातली व्यक्ती, कलेशी नाळ जोडून आहे.. कुठेतरी माझाशी साधर्म्य वाटायला लागलं, आणि आपोआप पुस्तक वाचताना बंध जुळत गेले...
भगवद्गीता किंवा महाभारत हे माझे नेहमीचे आवडीचे विषय आहेत. अजूनपर्यंत भगवद्गीतेवर खूप जणांनी टीका - टिप्पणी - मते - मतांतरे - भाष्य - भाषांतरे केलेली आहेत. प्रत्येकाची पाहण्याची नजर वेग - वेगळी असली तरी गाभा तोच. तशीच संत ज्ञानेश्वरांच्या लेखणीतून उतरलेली 'भावार्थदीपिका' म्हणजेच 'ज्ञानेश्वरी' ...
'ज्ञानेश्वरी'.. इथे लेखिकेच्या नजरेतून.. पण ती सुरु होते एका 'बिंदू' पासून..
"बिंदू".. आरंभही तोच .. अंतही तोच ..
एकेक बिंदू जोडून, रेषा जोडत लेखिका आपल्यासमोर ज्ञानेश्वरी उभी करत जाते.. प्रत्येक illustration मागे घेतलेली मेहनत आणि patience वाखाणण्याजोगा आहे 👌
एक वेगळाच concept , या आधी कधी विचार केला नव्हता.. आणि तिच्या हातून घडलेल्या या कार्याचं श्रेय ती ज्ञानोबांना देतेय :)
कधीही कोणतंही पान उघडा, वाचा, चिंतन करा, कामाला लागा, काम करताना मनन करा..
लेखिकेची बिंदुरूपी ज्ञानेश्वरी डोळ्यांसमोर फिरत राहते..
पुस्तकात प्रा. राम शेवळकरांच्या वाक्याचा उल्लेख आहे -
"ज्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली गेली, त्या वयातच वाचली पाहिजे"
तसंच व. पु. काळेंच अशाच अर्थाच एक वाक्य आठवतं -
आपण गृहस्थाश्रम संपला की भगवद्गीता वाचायला घेतो. खरं तर संसार कसा करावा याचं सार या गीतेत सामावलेलं आहे...
लेखिकेने अजून ज्ञानेश्वरी च्या काही भागांवर काम करावे हि विनंती, तिच्याद्वारे पूर्ण भावार्थदीपिकेशी जोडलं जायला खूप आवडेल :)
पुस्तकातील लिखाण मराठी आणि English दोन्ही भाषेत असल्याने मराठेतर भाषिकांपर्यन्त सुद्धा आपल्याकडील साहित्य पोहोचणं शक्य होईल.
दोन्ही पुस्तके सर्वांनी आवर्जून वाचा आणि इतरांना भेट म्हणूनही द्या.
~सुप्रिया घुडे~
30-Oct-2017
Comments
Post a Comment