Kingfisher ची fishing
वेळ - जवळपास दुपारचे ३.३०
गणपती घरात बसलेत. नुकतेच जेवणावळी उठून पांगापांग झालीये.
भाद्रपदातल्या पावसाची एक सर जोरररात कोसळून गेलीये..
पावळ्यातसून पाणी गळतंय.
पावळ्यातसून पाणी गळतंय.
समोर हिरवंगार भाताचं शेत.. बाजूला चरणारे बैल.. लांबून जंगलातून येणारे पाणकोंबड्या आणि बेडकांचे आवाज.. मधूनच चिमण्या / साळुंकीच्या गुजगोष्टींचं आवाज..
कावळ्या - काबूतरांची समोरच्या छतावर बसून पंख सुकवण्याची गडबड.. समोरच्या डोंगरावर चाल करून येणारा काळा मोठा ढग.. अंगणातल्या फुलांवर पाठशिवणीचा खेळ खेळणारी फुलपाखरांची जोडगोळी..
डबक्यातल्या बेडूक/माश्यांच्या पिल्लांवर लक्ष ठेवून वरच्या तारेवर ध्यानस्थ बसलेला किंगफिशर...

...घरातला बाप्पा मखरात बसून माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि मी gallery मध्ये बसून निसर्गावर लक्ष ठेवून आहे..
.. तेवढ्यात त्या kingfisher ने डबक्यात सूर मारून , पुन्हा आपल्या जागी बसून झटक्यात आपलं खाद्य गट्टम केलेलं आहे..
Woww.. मी एकटीच का या अवर्णनीय सोहळ्याची साक्षीदार व्हावी??!
त्या kingfisher च्या fishing चा 'आंखो देखा हाल' type करायला मी घेतलेला आहे.. 🐟🐦
~सुप्रिया घुडे~
गणेश चतुर्थी २०१७
Comments
Post a Comment