फटकळपणा

आई : जरा फटकळपणा सोडून दे.
मी : तुला फटकळपणा वाटत असेल, माझा तो स्पष्टवक्ततेपणा आहे.
आई : माझ्या दृष्टीने तो फटकळपणा च आहे.
मी : pls आई, atleast मी तुझ्या 'अमक्या-तमक्या' सारखी कोणाच्या पाठून बोलत नाही. जे काही आहे ते तोंडासमोर.
आई : तू उगाच माझ्या माहेरच्या लोकांना मध्ये आणू नको.
(इथे माझ्या आईचा पारा चढलेला असतो आणि माझी बहिण खुदूखुदू  हसत असते 😝)
मी : अगं पण मी चुकीचं बोलतेय का, ते सांग मला.
स्पष्ट बोललं तर 'फटकळपणा' आणि पाठून बोललं तर gossiping.
माणसाने एक कोणता तो stand घ्यायला हवा ना.
एकतर मी अजिबात बोलणार नाही किंवा जे काही आहे ते समोर बोलेन. 
माणसाने binary पद्धतीत जगावं, 0 or 1, True or False, होय किंवा नाही.
आई : जळली तुझी ती binary पद्धत (इथे आई एकूणच software technology ला आग लावून मोकळी झालेली असते)
काय हवं ते कर, बोलू नको माझ्याशी जा.. (हे वाक्य म्हणजे वादात आई ला पुढे काही सुचत नाहीये,
तिला माझं बोलणं पटत असलं तरी जगरहाटीपुढे ते मान्य पण करायचं नाहीये,
तिला तिची हार स्पष्ट दिसतेय, परंतु तरीही ती मानायला तयार नाहीये 😜,
आणि मी व माझी बहिण devil smile म्हणजे काय म्हणतात ते करतोय 😝😈👹
)
तू कधी कोणाचं ऐकलंय. हट्टीपणा सोडू नको अगदी..

**
आणि इथे विषय संपलेला असतो, माझ्यासाठी 😁🤗🤓😎
पण ती पुन्हा हा विषय घेऊन माझ्याशी वाद घालणारच 😑
**

~सुप्रिया घुडे~
28-Jul-2017

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर