Posts

शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : १

Image
शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : १ नेक्स्ट ट्रिप डेस्टिनेशन कोणतं बरं?   मागच्या वेळी अक्कलकोट ला जाताना श्री. सौरभ मिरजकर यांनी सर काकांना कडगंची ला भेट देण्यास सुचवले होते.  त्या नंतर त्यांनीच सुचवलं कि कोकणातून शेगाव ला एक ट्रेन जाते. मग काय, आमच्या नेक्स्ट ट्रिप च डेस्टिनेशन फिक्स झालं.  रजू आत्ये म्हणते त्या प्रमाणे, दत्तभक्त आपोआप एकमेकांना भेटतात.  तसंच होतय गेले ३ वर्षं..  दत्त संप्रदायातील भक्त एकमेकांना दत्तगुरूंच्या दर्शनाचा मार्ग दाखवतायेत.. आणि मग सुरु झालाय दत्त भक्तांचा प्रवास एकत्र..  सद्गुरुंच्या भेटीच्या वाटेवर...  जायची तारीख नक्की  शेगाव च्या श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराबद्दल गेले कित्येक वर्ष बरंच ऐकून होतो. माझ्या आई - बाबाना सुद्धा तिथे एकदा जायची इच्छा होती. परंतु कोकणातून विदर्भात जायचं म्हणजे खूपच लांब पडतं, ट्रेन बदलत जावं लागणार त्यामुळे तिथे जाणं कधी झालं नाही.  मार्च २०२३ मध्ये शिमग्याला सुजल, किर्ती आणि मी भेटलो तेव्हा नेक्स्ट ट्रिप शेगाव च फिक्स केली आणि जून महिना...

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ७

याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html भाग ५  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html भाग ६  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_22.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ७ (क्रमशः) १७-डिसेंबर-२०२२ 12975 / MYS JP EXP ची टिकेट्स आम्ही कालच काढून ठेवली होती. किर्ती ची तब्येत बिघडलेली पाहता बुकिंग कन्फर्म असलेलंच बरं असा विचार केला होता. KSR बंगळुरू ला १ वाजेपर्यंत पोहोचेल ट्रेन. ३ वाजता माझी आणि किर्ती ची  KSR बंगळुरू हुन मुंबई ला जायची ट्रेन होती. आणि मडगाव पर्यंत जाणाऱ्या चौघांची ट्रेन यशवंतपुर हुन सव्व्वा तीन ची होती. (मडगाव हुन त्यांना पुन्हा दुसरी ट्रेन पकडायची होती 😥). म्हणजे २ तास बफर time असला असता आमच्याकडे. सकाळी ०९.३० ...

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६

Image
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html भाग ५  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६ (क्रमशः) १६-डिसेंबर-२०२२ आजच्या म्हैसूरू सिटी टूर साठी आम्ही खूपच excited होतो 🤩 आमच्यासाठी sightseeing पैकी म्हैसूरू ची खासियत म्हणून अंबाविलास पॅलेस, झू आणि वृंदावन गार्डन महत्वाचे होते. म्हैसूरू ला गेलात तर या ३ जागांना भेट दिलीच पाहिजे, असं बरंच ऐकून होतो. खरं म्हणजे काल संध्याकाळी म्हैसूरू ला पोहोचलो तेव्हाच आम्ही विचार केला होता की पोहोचल्यावर लगेच वृंदावन गार्डन ला निघायचं. तिथले musical fountain खास आहेत म्हणे. आम्ही गार्डन सिटी हॉटेल वर  संध्याकाळी ६ च्या दरम्यान  पोहोचलो. मॅनेजर तुकाराम यांच्या म्हणण्यानुसार आम्ही...

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ५

Image
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ५ (क्रमशः) १५-डिसेंबर-२०२२ ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण सकाळी ०८.३० वाजता आवरून तयार झालो. मुख्य म्हणजे आत्ये, जिला सर्वात जास्त वेळ लागतो, तिच्या नंतर नंबर लागतो सुजल चा 😆🤣  नाश्ता करण्यात वेळ दवडायचा नव्हता. इस्कॉन ला किंवा तिथे जवळपास नाश्ता मिळेल असं गृहीत धरूनच आम्ही lodge खाली उतरलो.  समोर रिक्षा वाल्याला इस्कॉन पर्यंत किती होईल ते विचारलं . ₹२००/- बोलला. लगेच ओला ऑटो मिळतेय का चेक केलं. ₹११०. सवालच नव्हता, २ ओला ऑटो बुक केल्या आणि इस्कॉन ला पोहोचलो. इस्कॉन temple: https://www.iskconbangalore.org/ मेन रोड वर उभं राहून आतमध्ये एवढं भव्य मंदिर आणि परिसर असेल याची कल्पना येत नाही.  ₹३०/- ...