बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ७

याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

भाग १ 
https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html


बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ७

(क्रमशः)

१७-डिसेंबर-२०२२

12975 / MYS JP EXP ची टिकेट्स आम्ही कालच काढून ठेवली होती. किर्ती ची तब्येत बिघडलेली पाहता बुकिंग कन्फर्म असलेलंच बरं असा विचार केला होता. KSR बंगळुरू ला १ वाजेपर्यंत पोहोचेल ट्रेन. ३ वाजता माझी आणि किर्ती ची KSR बंगळुरू हुन मुंबई ला जायची ट्रेन होती. आणि मडगाव पर्यंत जाणाऱ्या चौघांची ट्रेन यशवंतपुर हुन सव्व्वा तीन ची होती. (मडगाव हुन त्यांना पुन्हा दुसरी ट्रेन पकडायची होती 😥). म्हणजे २ तास बफर time असला असता आमच्याकडे.

सकाळी ०९.३० वाजताच आम्ही म्हैसूरू च गार्डन सिटी हुन checkout केलं. तासभर अगोदर पोहोचलो तरी चालेल पण उशीर नको.

म्हैसूरू हुनच सुटणार होती त्यामुळे ट्रेन आधीच लागलेली होती. किर्ती च्या उलट्या थांबल्या असल्या तरी ती घाबरून काही खात नव्हती, त्यामुळे अशक्तपणा येऊन ती बसेल तिथे डोकं ठेवून झोपत होती.

येताना जेवढे आम्ही excited होतो तेवढे जाताना टेन्शन मध्ये होतो, एका गोष्टीने ट्रिप ला गालबोट लागलं खरं.

बस्स आता आम्हाला लवकर बंगळुरू ला पोहोचून आपापली ट्रेन पकडायचे वेध लागले होते. १०.३० वाजून गेले तरी म्हैसूरू हुन ट्रेन निघायचं नाव घेईना. अर्ध्या तासाने आमच्या ट्रेनसाठीची announcement सुरू झाली - "Train will be delayed due to technical reasons.." बस्स आता हेच व्हायचं बाकी होतं. Late म्हणत तब्बल २ तास ट्रेन म्हैसूरू लाच थांबून होती...
मडगाव ला जाणारी ट्रेन 17309/Yesvantpur - Vasco da Gama Express यशवंतपुर हुनच सुटणारी होती त्यामुळे सर काका, आत्ये, काकी आणि सुजल टेन्शन मध्येच होते.

किर्ती आणि माझी ट्रेन 11014 - Coimbatore Mumbai Ltt Express ही कोईम्बतुर हुन बंगळुरू ला येणार होती, ती ट्रेन दीड तास late होती त्यामुळे नेमकी मला आणि किर्ती ला ट्रेन मिळाली. 

कुडाळ - रत्नागिरी चा लॉट : 
सर काका, आत्ये, काकी आणि सुजल; चौघांनी KSR ला उतरून यशवंतपूर ला जाण्यासाठी कॅब केली. सर काका आणि सुजल continue online  चेक करत होतेच, ट्रेन ची लोकेशन. तसंही कॅब ड्राइवर सुद्धा सांगत होता कि तुम्हाला ट्रेन नाही मिळणार. शेवटी तेच झालं,  17309 ट्रेन सुटून गेली. 

हि ट्रेन चुकली म्हटल्यावर पुढचं त्यांचं मडगांव ते कुडाळ - रत्नागिरी टिकेट्स मी कॅन्सल केली, कारण पुढची सुद्धा ट्रेन त्यांना मिळणं शक्य नव्हत. 

सुजल ला ऑफिस मधून message आला, कदाचित पोलिसांची गोवा ड्युटी लागू शकते, ३१st जवळ आला होता ना. त्यामुळे सुजल ला लवकरात लवकर रत्नागिरी ला पोहोचून ऑफिस ला हजर होणं आवश्यक होत. एक रात्रही बंगळुरू ला थांबणं शक्य नव्हतं. 
या चौघांचं फुल्ल डिस्कशन चालू होता. कॅब ड्राइवर ला एव्हाना अंदाज आला होता, गिर्हाईकांना परतीची टिकेट्स काहीही करून हवी  आहेत. 

मी परत एकदा वॉर्न करतेय, बंगळुरू च्या रिक्षा आणि कॅब ड्रायव्हर्स वर अजिबात विश्वास ठेवू नये. 

कॅब ड्राइवर ने यांना बस ची कन्फर्म टिकेट्स काढून देण्याचं आश्वासन दिलं. अडला हरी म्हटल्यावर चौघंही त्याने सुचवलेल्या बस बुकिंग सेंटर ला गेले. लगेच संध्याकाळी  ५ वाजता बस आहे म्ह्णून सांगितलं. चला म्हणजे दोन एक तास थांबून बस येईल लगेच. म्हणून चौघंही तिथेच बसून राहिले. परंतु ७ वाजून गेले तरीही बस नाही. एजन्ट एवढंच बोलत होता, येतेच आहे बस थोड्या वेळात. आत्ये आणि सुजल बाजूच्या बुकिंग ऑफिस ला विचारून आले, तर तिथला एजन्ट बोलला हि बस रात्री नऊ वाजता येते, तुम्हाला खोटं सांगितलेलं दिसतंय. आता काय बोलणार. शेवटी ९ नंतर बस आली. 
कारण सांगितलं कि ठरलेली बस बिघडली म्हणून हि change केली. एकदाचा प्रवास सुरु झाला खरा. परंतु मडगाव पर्यंत चा रोड एवढा खराब होता, त्यात या चौघांना पाठच्या स्लीपर सीट्स मिळाल्या, आणि त्या खराब रोड वरून बस फुल्ल उडत चालली होती. 
सर काका आणि आत्येला चांगलीच बस लागली. काकीला मणक्याचा आणि गुढग्याचा त्रास, त्यामुळे तिची पण कंबर जाम धरली. त्यात सकाळी उजाडल्यावर मध्ये बस बंद पडली.  कोणत्या मुहूर्तावर तो कॅब ड्राइवर भेटला आणि त्याने बस ची तिकीट काढून दिली देव जाणो. पण यात जीवाचे खूप खूप हाल झाले. ११ वाजेपर्यंत मडगाव ला एकदाची हि बस ची वरात पोहोचली. 
आत्येला दोन्ही बाजूने दंड धरून काकी आणि सुजल घेऊन उतरले. आत्येला खूपच बस लागली. सर काका सुद्धा बेजार झाले होते. 

मडगाव हुन Madgaon - Mumbai LTT Express/11100 च कन्फर्म तिकीट मिळालं. दुपारी १२:४५ ला मडगाव हुन च सुटणार होती, परंतु हि ट्रेन स्टार्टींग लाच दिड तास late निघाली - दुपारी  ०२.१५ ला. 
असो, पण त्या बस च्या प्रवासापेक्षा ट्रेन कधीही बरी .... 

बरं हि ट्रेन कुडाळ ला थांबत नाही त्यामुळे एक स्टेशन अगोदरच सावंतवाडी ला सर काका आणि आत्ये ला उतरावं लागलं. मग तिथून रिक्षा करून दोघंही कुडाळ ला पोहोचले. 

सुजल आणि काकी पुढे रत्नागिरी ला उतरणार होते. नेमकी हि ट्रेन क्रोसिंग साठी कुडाळ ला थांबली. पण हे आधी कुठे माहिती होत. 😟
ट्रेन ला बरीच क्रोसिंग लागले आणि सव्वा पाच ला पोहोचणारी ट्रेन रत्नागिरी ला संध्याकाळी ७ ला पोहोचली. आमचा सर्वात शेवटचा लॉट घरी पोहोचला होता... 

मुंबई चा लॉट : 
11014 - Coimbatore Mumbai Ltt Express 
परतीच्या प्रवासात आम्हाला upper आणि middle birth allocate झाली होती. पुन्हा तो २४ तासांचा प्रवास 😓 किर्ती ला आराम करायचा होता, तिची रवानगी upper birth ला केली. मलाही झोपायचं होतं परंतु lower birth ला असलेल्या काकांनी आधीच declare केलं - मला झोप कमी आहे त्यामुळे मी झोपणार नाही. झालं म्हणजे मी middle birth ला झोपायचा विचार करत होते, आता तेही शक्य नाही. ते काका होते नागपूरचे पण पुण्यात स्थायिक झालेले. उद्या सकाळी पुणे येणार म्हणजे हे काका सीट ची अडवणूक करून वैताग आणणार होते, एवढं नक्की.
समोरच्या birth वर एक south indian young पोरगा होता (ज्याला हिंदी कळत नव्हतं, आणि बोलताही येत नव्हतं), तोही पुण्यालाच उतरायचा होता. आणि एक बंगाली काका होते, जे पुण्यात बरेच वर्ष राहत असल्याने अस्खलित मराठी बोलत होते. मागाहून बोलताना ते बोलले की ते कोलकत्ता चे आहेत म्हणून कळलं. नाहीतर त्यांच्या भाषा प्रभुत्वावरून कोणालाही कळलं नसतं की हे काका महाराष्ट्रीय नाही आहेत. ते सुद्धा पुण्यालाच उतरायचे होते. 6th passenger एक बाई होती जी रात्री एका स्टेशन ला चढली, ती सुद्धा पुण्यालाच उतरायची होती.
थोडक्यात पुणे येईपर्यंत आम्हाला lower birth रिकाम्या मिळणार नव्हत्या. असंच adjust करावं लागणार होतं तर 😣
त्या नागपुरी काकांची प्रचंड बडबड चालू होती. रिटायर्ड माणूस. मुलगा बंगळुरू स्थायिक. घरचं सगळं व्यवस्थित. एखाद महिना मुलाकडे राहायला जाणार, कधी पुण्यात येऊन राहणार. अशी माणसं, ज्यांचं सगळं व्यवस्थित चालू असतं ना त्यांना दुसऱयाला सल्ले द्यायला आणि दुसऱ्याला कमी लेखायला खूप आवडतं, अशा type मधले ते नागपुरी काका होते. 😑
आधी त्याच्या गप्पा त्या बंगाली काकांसोबत चालू होत्या. बंगाली काकांना एव्हाना लक्षात आलं होतं, हे नागपुरी प्रकरण काय आहे ते. समोरचा कोणत्याही विषयावर बोलत असला कि नागपुरी काका त्याला विरोध करणारच, म्हणजे थोड्या वेळापूर्वी आपण याच विषयाच्या बाजूने बोलत होतो हे सुद्धा ते विसरून जात होते, बस्स सोमोरच्याला विरोध 😁  
मी लोवर सीट ला अर्ध्या बाजू मध्ये पडून यांच्या गप्पा ऐकत होते, बस्स माझी उठून बसायची हि परिस्थिती नव्हती म्हणून, नाहीतर मी सुद्धा गप्पामध्ये सामील झाले असते 😜 
त्यांच्या गप्पा संपल्या आणि नागपुरी काकांनी माझ्यावर निशाणा साधला - "काय तुम्ही आजकालची तरुण पोरं. जराशा त्रासाने थकता, blah  blah... " 😕
माझी खरच परिस्थिती नव्हती त्यांना उत्तर द्यायची, मी बस्स एकच वाक्य बोलले - "बंगळुरू काही आम्हाला मानवल नाही ... "
नागपुरी काका : "अरे तुम्हा मुंबईकरांना त्या गर्मीत राहायची सवय लागलेली तुम्हाला कसं जमणार "
बंगाली काका : "असं काही नाही, आता मी सुद्धा इतकी वर्ष पुण्यात राहतोय पण मलाही ते बंगळुरू काही जमत नाही बाबा "
झालं.. यावरून पुन्हा त्यांचे वाद सुरु झाले.. बंगाली काका माझ्या बाजूने बोलत होते.  मग तेच नागपुरी काकांना बोलले - "तुम्ही या birth वर येऊन बसा, तिची तब्येत बरी वाटत नाहीये तर तिला तिथे थोडं आडवं होऊ देत "
तरी नाईलाजाने नागपुरी काकां त्यांच्या बाजूला जाऊन बसले आणि मला पूर्ण सीट मिळताच डिनर च्या आधी १-२ तास मी झोप काढली . 
तरी तिथे बसून त्यांनी एक किस्सा सांगितला  - मागच्या प्रवासात त्यांना एक मिलिटरी ऑफिसर सहप्रवासी भेटले. त्यांच्या बायकोला असंच झोपायचं होतं तर या नागपुरी काकांनी अजिबात तिला सीट रिकामी करून दिली नाही. त्या  मिलिटरी ऑफिसर नि TC कडे complaint केली तरी हा माणूस आपला हेकेकोर पणा सोडत नव्हता. बरं  त्यांना स्वतःच्या या स्वभावाबद्दल एवढं कौतुक वाटत होत. 
काही माणसाच्या अशा आत्म मश्गुल स्वभावावर उपचार नसतो. त्यांना स्वतः सोडून इतर कोणीही दिसत नाही . 
but थँक्स to that बंगाली काका, त्यांच्यामुळे मला थोडा वेळ आराम करायला मिळाला. 
रात्री जेवून झाल्यावर सुद्धा नागपुरी काका काही झोपायला तयार नव्हते, काय माहिती त्याला असं दुसर्यांना त्रास द्याल आवडत असावं. 
सकाळी सुद्धा ते लवकर उठून बसले. मी middle birth , त्यामुळे त्यांना धड बसताही येत नव्हतं. मलाच वाटलं, जाऊ दे, म्हातारं माणूस आपल्यामुळे त्रास  नको,मग मी सुद्धा लवकर उठून खाली येऊन बसले. तरीही मलाच परत ऐकून घ्यावा लागलं ते वेगळंच - "काय आजकालची तरुण पोरं तुम्ही उशिरा उठता"
काही माणसं एवढी डोक्यात जातात ना, वाटतं वयाचा मान न ठेवता ताडकन बोलून मोकळं व्हावं. परंतु माझी उलट बोलायची सुद्धा परिथिती नव्हती ती वेगळी  😁  
शेवटी पुण्याला आमचा कंपार्टमेंट रिकामा झाला मग मी आणि किर्ती दोन्ही lower birth पकडून आडवे झालो. 
मी लास्ट स्टेशन LTT ला उतरणार होते. पण विचार केला ठाण्याला उतरून किर्ती ला कॅब मध्ये बसवेन मग मी कॅब ने माझ्या घरी जाईन. 
ठाण्याला उतरल्यावर एकहि ओला /उबेर दुपारी लंच time ला ride accept करेनात. बंगळुरू काय आणि मुंबई काय.. ओला /उबेर वाल्यांचा वेगळाच swag  😒
शेवटी किर्ती ला कॅब मिळाली आणि मी ऑटो करून घरी गेले.. 

अशा तर्हेने आमची हि बंगळुरू - म्हैसूर ट्रिप ची सुरुवात excitement झाली असली तरी सांगाता आजारपणामुळे थोडी कडू आठवणींनीच झाली ... 
आमच्या अंदाजानुसार बंगळुरू चा सेट डोसा आणि म्हैसूर झू च्या बाजूच्या रेस्टॉरंट मधलं juice  आम्हाला महागात पडलंय .. 
अक्षरशः त्यानंतर आज तीन महिने झाले परंतु आम्ही स्ट्रीट फूड चा आता एवढा धसका घेतलाय.. नको रे बाबा..   

ट्रिप खर्च :
आमच्या ६ जणांचा खर्च २६४००/-  झाला. Including राहणे, खाणे, पिणे, प्रवास ...  शॉपिंग यात धरलेली नाही. 
ठग रिक्षावाले / कॅब वाले भेटले नसते तर अजून कमी झाला असता खर्च ... 
बरं झालं घरून कार करून गेलो नाही, त्यामुळे एवढ्यावरच भागलं.. 
असो not  bad .. 

सोलापूर चा खर्च (कार करून, ३ दिवसांसाठी) ४००००/- झाला होता मग त्यामानाने बंगळुरू - म्हैसूर स्वस्त्यात आटोपली म्हणायची .. 

अशा तर्हेने बंगळुरू - म्हैसूर ट्रिप ची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.... 

(समाप्त )

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर