बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६

याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

भाग १ 
https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html


बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६
(क्रमशः)

१६-डिसेंबर-२०२२
आजच्या म्हैसूरू सिटी टूर साठी आम्ही खूपच excited होतो 🤩

आमच्यासाठी sightseeing पैकी म्हैसूरू ची खासियत म्हणून अंबाविलास पॅलेस, झू आणि वृंदावन गार्डन महत्वाचे होते. म्हैसूरू ला गेलात तर या ३ जागांना भेट दिलीच पाहिजे, असं बरंच ऐकून होतो.

खरं म्हणजे काल संध्याकाळी म्हैसूरू ला पोहोचलो तेव्हाच आम्ही विचार केला होता की पोहोचल्यावर लगेच वृंदावन गार्डन ला निघायचं. तिथले musical fountain खास आहेत म्हणे. आम्ही गार्डन सिटी हॉटेल वर संध्याकाळी ६ च्या दरम्यान पोहोचलो. मॅनेजर तुकाराम यांच्या म्हणण्यानुसार आम्ही फ्रेश होऊन, निघून पोहोचेपर्यंत ते संगीत कारंजे ची वेळ संपलेली असेल. त्यापेक्षा सिटी टूर मध्ये घेऊन जातील तेव्हाच जा. 

चलो, ये भी ठीक हैं. 😎

हॉटेल गार्डन सिटी मध्ये अंघोळीच गरम पाणी सकाळी ६ वाजताच सुरू होतं. त्यामुळे सर काका, मी आणि किर्ती सकाळी ७ वाजेपर्यंत सगळं आवरून तयार झालो. आमच्यासोबत मिनी बस मध्ये इतरही पर्यटक असणार होते त्यामुळे अध्ये मध्ये आम्हाला हवी तेव्हा गाडी थांबणार नव्हती. पेटपूजेचा halt डायरेक्ट दुपारी lunch time असणार होता. त्यामुळे पोटभर नाशता करूनच बस मध्ये बसायला हवं होतं. 

सर काका, किर्ती आणि मी lodge खाली उतरून Bennimantap Road वरून सकाळची कोवळी उन्ह घेत चालत निघालो. थंडी सोसेल इतपत होती. गुलाबी गोड थंडी म्हणू शकता 🥰 परत परत सांगावसं वाटतं की म्हैसूरू मधलं आल्हाददायक वातावरण सोडून कुठेच जाऊ नये असं वाटत होतं 😊 गल्लीतील Row Houses थंडीतल्या उन्हाची दुलई ओढून अजूनही पहुडलेली दिसत होती.
ती घरं बघून किर्ती मला म्हणते, म्हैसूरू ला एक घर घे, म्हणजे दर महिन्याला इथे येऊ फिरायला 😂
😂🤣😃😄😅😆🙂🤨😐😑🙃😕😔😞😣 इथे आई-बाबांच्या रत्नागिरी च्या घरी महिन्यातून एकदा जायला जमत नाहीये, आणि आम्ही म्हैसूरू ला जाणार 🤐😒😒😒


हॉटेल अतिथी :
Location Link : https://g.co/kgs/XczBWg
यांचं lodge सुद्धा आहे आणि ground floor ला बाजूला छोटंसं restaurant आहे. सकाळचा नाष्टा इथे मिळेल असं मॅनेजर तुकाराम यांनी सांगितल्याबरोबर आम्हा तिघांची पावलं इथे आपसूक वळली. 😁 बंगळुरू मधला एकमेव पदार्थ मला आवडला होता तो म्हणजे सेट डोसा. अतिथी मध्ये तोच मागवला. परंतु इथला सेट डोसा साधारण Pilsbury चे ready to mix pancake बनवतो ना तसला काहीसा प्रकार वाटला. एवढा काही नाही आवडला. पोटभरू प्रकार म्हणून ठीक वाटला.

Family Day Out in Mysuru: 🥳

१. जगन मोहन पॅलेस - आर्ट गॅलरी
Location Link : https://g.co/kgs/nFqZQ6
ओरिजिनल पैंटिंग पहायची असतील तर इथे भेट देणं ही पर्वणी च. राजा रवी वर्मा पासून ईतर अनेक भारतीय आणि विदेशी कलाकारांनी काढलेली चित्र इथे पाहायला मिळतात. तसेच कालौघात नाहीशी झालेली विविध वाद्ये अजूनही जपून ठेवलेली आहेत. २-३ मजले संपता संपत नाहीत. 

बस च्या शेजारी बरेच सेल्समन काही ना काही विकायला आले होते. किर्ती आणि सुजल ने एक छानपैकी सेल्फी स्टिक विकत घेतली. आता टूर सुरू झाली होती, त्यामुळे दिवसभर छान उपयोग झाला असता 🤩

२. सिल्क एम्पोरियम 
सिल्क एम्पोरियम मध्ये शुद्ध रेशमी साड्यांची खरेदी झाली. तसेच रक्तचंदन / चंदन साबण, चंदन अगरबत्ती आणि धूप, चंदन talcum पावडर सुद्धा घेतले.



३. श्री चमराजेंद्र zoological गार्डन किंवा म्हैसूरू झू 
(Vlog आमच्या नजरेतून : https://youtu.be/OrbjN30g5lQ)

Must visit place in म्हैसूरू 😻
खूप मोठं झू आहे असं आम्ही ऐकून होतो. त्यामुळे सगळी शॉपिंग घेऊन कुठे फिरणार म्हणून आम्ही बॅग्स बस मध्येच ठेवल्या. Guide ने त्या बाबतीत आम्हाला निश्चन्त राहा असं आश्वासन दिलं. झू मध्ये selfie stick allow नाहीये, कॅमेरा मोबाईल चालतो पण selfie स्टिक नाही. कदाचित स्टिक चा वापर करून पर्यटक प्राणी पक्ष्यांना त्रास देत असतील, किंवा आधी कधी असे incident घडले असतील म्हणून बॅन असावं. सुजल ची selfie स्टिक च उदघाटन इथे व्हायचं नव्हतं तर. इतर शॉपिंग सकट selfie स्टिक सुद्धा बस मध्ये ठेवून आम्ही झू मध्ये शिरलो.
🐒🦍🐺🦊🦁🐯🐴🦓🦌🐮🐂🐃🦒🐘🦏🦛🐰🐻🦃🐦🦆🦢🦚🦜🐢🐍
हे सगळे प्राणी पाहायला मिळतात या झू मध्ये.. अजूनही बरेच 🤩 ₹१००/- per head. फुल्ल पैसा वसूल. 




वेगवेगळे  पक्षी, cockatiel, macaw, species of parakeets..
बिबट्या, चित्ता, वाघ, सिंह... 
वाघांना पाहून तर डोळ्यांचं पारण फिटलं.. 
सिंह आणि बिबट्या झोपलेले च होते.. 
चित्ते in action होते 😀 
तरस प्रदक्षिणा घालत बसलेल.. 
gorilla प्रातःविधी उरकत होतं 💩 
कधी न पाहिलेले झेब्रा, गेंडा, Hippo, शहामृग इथे मस्त वावरताना दिसले.. 
काळवीट, हरीण, गवा रेडा, हत्ती यांची जेवणाची वेळ झाली होती आम्ही तिथे पोहोचेपर्यंत..
वेगवेगळे साप आणि खास आकर्षण किंग कोब्रा सुस्तावलेले पहुडलेले च होते. 




तसंही कोकणातल्या लोकांना सापांच काय कौतुक, आपल्या परड्यात नेहमी एखादं किरडू ते फणाधारी पर्यंत कोणी ना कोणी सोबतीला असतंच.  😀
माझ्याकडे कामाला एक बाई येते ना ती तर म्हणते घरात साप शिरला तर ती चपलेने सापांना फटकारते 😂 सापांना flying चप्पल देणारी एकमेव बाई पहिली मी आयुष्यात 🤣
तर, म्हैसूरू झू चा शेवट होतो जिराफ बघत.. एवढा सुंदर उंच प्राणी नेहमी nat geo वरच पहिला होता. 🦒😻 
जवळपास १५७ एकर चा हा एरिया फिरायला आम्हाला अडीच तास लागले. आमच्या guide ने एका तासांत फिरून बस कडे रिटर्न यायला सांगितलं होतं. परंतु झू एरिया एवढा vast आहे संपता संपात नव्हता. बाकी बस मधील पर्यटक कर्नाटक मधले होते त्यामुळे त्यांनी झू पाहायला जास्त वेळ नाही घालवला. इतर प्रवासी पटपट फिरून बस मध्ये जाऊन बसले. आम्हाला चालायला ही वेळ लागत होता, त्यात एवढ्या लांब आलो आहोत तर सगळं झू बघूनच जायचं असं ठरवलं. बाकीचे प्रवासी वैतागले होते. Guide चा २-३ वेळा कॉल येऊन गेला, शेवटी त्यांना सांगितलं तुम्ही पुढची २ places पाहून या, तोपर्यंत आम्ही झू पाहून, मग जेवून, बाहेरच थांबू.
असं बोलून आम्ही पूर्ण झू पाहून घेतला 😊

झू मध्ये गर्दी भयंकर होती. शाळांच्या ट्रिप आलेल्या होत्या. लहान मुलांची तर एवढी गर्दी. सगळी लहान लहान पोरं पायाखाली येत होती 😂. डिसेंबर मध्ये शक्यतो शाळेच्या सहली निघतात म्हणा, त्यामुळे असावी अशी गर्दी.

Statue of Mahishasura
Goddess Sri Chamundeshwari Temple
Statue of Nandi
या ३ गोष्टी आम्हाला काही पाहायला नाही मिळाल्या.
उद्या बंगुळुरू हुन ट्रेन होती आमची. सकाळी १० वाजता तरी lodge सोडायला हवं होतं. पहाटे उठून Chamundeshwari Temple पाहून येऊ, वाटेत रस्त्यावर Statue of Mahishasura आणि Nandi दिसेलच. पहाटे लवकर निघून पटकन lodge वर येऊ, असा आम्ही विचार केला.

Lunch :
Zoo च्या बाहेर New Mysore Refreshments restaurant आहे. अडीच तास चालून आम्ही खूप दमलो होतो. या रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवून घेतलं. म्हैसूर मसाला डोसा इथेच try केला. 😀 इथलं मिक्स फ्रुट जुइस खास होतं. 🤤





Buffer Time :
रेस्टॉरंट च्या शेजारी चॉकोलेट शॉप आहे. तिथे वेगवेगळ्या variety चे चोकॉलेत चे प्रकार मिळाले 🤩🍫 आत्ये ला तिच्या नातवासाठी चोकॉलेट्स घ्यायची होतीच, त्याने खास सांगितलं होतं, कूर्ग ची चॉकलेट्स मिळतील म्हैसूरू ला, ती घेऊन ये 😀
इथेच कूर्ग ची चहा आणि कॉफी सुद्धा होती. त्यातले सुद्धा पॅकेट्स उचलले आम्ही 🤩 चोकॉलेत tea हा एक खास प्रकार सुद्धा घेतला. 

अर्धाच दिवस झाला होता, आताच आम्ही इतके दमलो होतो.  बस ची वाट पाहत, आम्ही सगळे ज्या दुकानात शॉपिंग केली त्याच दुकानाबाहेर बसलो होतो. पडल्या ठिकाणी झोपू एवढी परिस्थिती होती, परंतु आता फक्त अर्धा दिवस होता हातात, एवढ्या वेळात जेवढं म्हैसूरू cover करता येईल तेवढं बघायचं होतं. 

तेवढ्यात बस आली आणि पुढील tour साठी आम्ही कूच केलं. 
बस मध्ये शिरल्यावर आम्ही आधी शॉपिंग बॅग्स चेक केल्या आणि त्यातील समान सुद्धा. सगळं जिथल्या तिथे होतं. पण सुजल ची selfie स्टिक कोणीतरी ढापली 😭😡😠🤬
ती शेवटपर्यंत आम्हाला मिळालीच नाही 😢 


४. अंबा विलास किंवा म्हैसूरू पॅलेस :
Location Link : https://g.co/kgs/r4yHu8
Vlog आमच्या नजरेतून : https://youtu.be/afs0jYThFKA

इथे पोहोचल्याक्षणी नजरेत भरते ती गर्दी 😱 आणि त्या गर्दीतून दिसतो तो भव्य राजवाडा. 🤩
इथे सुद्धा ₹१००/- per head प्रवेश फी आहे. रात्री ७ ते ८ sound & light programme असतो. परंतु आम्हाला वृंदावन गार्डन चा musical fountain पाहायचा होता, म्हणजे तोच city टूर च्या package मध्ये होता त्यामुळे इथे फक्त राजवाडा पाहून निघायचं होतं. आम्हाला guide ने एक तासांचा वेळ दिला. यावेळी झू मध्ये लागला तसा वेळ काढण्यात अर्थ नव्हता नाहीतर पुढील ठिकाण पाहायला मिळाली नसती.








राजवाडा व्यवस्थित maintain केलेला आहे.  wodiyar संस्थानिकांच्या सर्व वापरलेल्या तसेच शिकार केलेल्या
 वस्तू इथे पाहायला मिळतात. राजवाड्यातील कलाकुसर तर अप्रतिम आहे. नजर जाईल तिथे श्रीमंती आणि देखावे पाहतच राहावे असे आहेत. इथेच दर वर्षी दसरा सण साजरा होतो त्या pavilion ची भव्यता पाहून दसरा किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असेल याची कल्पना येते.
म्हैसूरू पॅलेस च्या बाहेर लाकडी कलाकुसरीच्या छान छान वस्तू विकायला असतात, फक्त bargaining करता यायला हवं 😃 मी हत्तीच्या कलाकुसर असलेल्या keychains घेतल्या, म्हैसूरू ची आठवण म्हणून. 🐘
म्हैसूरू पॅलेस मध्ये एवढी गर्दी होती की माणसं एकमेकांना चिकटून पुढे सरकत होती, मुंबई च्या लोकल ट्रेन ची आठवण आली तिथे जाऊन 😀 आम्हाला कळत नव्हतं, की नेहमीच म्हैसूरू ला अशीच गर्दी असते की आज आमच्याच नशिबात आहे हे 😣
परंतु इथपासून आमच्या ट्रिप ला नजर लागायला सुरुवात झाली म्हणू शकता 😖
आत्ये च पोट खराब झालं 😞 काकीने तिला औषध दिलं, त्याने आत्येला लगेच आराम पडला. परंतु अर्धी टूर अजून शिल्लक होती आमची, त्यामुळे धाकधूक होतीच दिवसभर 😟

५. St. Phelomina's Church (St. Joseph's Cathedral)
Location Link : https://g.co/kgs/rPXC3Y
Vlog आमच्या नजरेतून : https://youtu.be/uTUjGgGw0d0

हे चर्च आशिया खंडातील दुसरं मोठं चर्च म्हणून गणलं जातं. हे चर्च गॉथिक स्थापत्यशैलीत बांधलेलं आहे. या शैलीची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे टोकदार कमान, रिबड डोम, फ्लाइंग बट्रेस. युरोपमधील अनेक महान चर्च आणि इतर ख्रिश्चन धार्मिक इमारती या शैलीत बांधल्या गेल्या आहेत. Same architecture मध्ये उत्तर गोव्यात एक चर्च आढळून येतं - Mae De Deus Church or Mother of God Church 
गोव्यातील सगळे चर्च पालथे घातलेल्या आम्हाला या चर्च च विशेष कौतुक नाही वाटलं. आत्ये बस मध्येच थांबली, आम्ही १५-२० मिनिटांत चर्च पाहून बस मध्ये येऊन बसलो.

६. श्रीरंगपट्टण /  जामिया मस्जिद, Tipu's Death Place
जामिया मस्जिद ही श्रीरंगपट्टण मधील टिपू सुलतान च्या किल्ल्यात आहे. इथे टिपू सुलतान ची फॅमिली नमाज पढायला येत असे. किल्ल्यामध्ये पाहण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. ब्रिटिशांनी टिपू सुलतान ला मारल्यावर किल्ला तोफा डागुन उध्वस्त केला. टिपू सुलतान ला जिथे मारलं गेलं तिथे छोटंसं स्मारक बांधलेलं आहे. किल्याहून जामिया मस्जिद कडे जाताना उजव्या बाजूला वाटेत बारुदखाना असल्याचे दाखवतात. वरून छोटासा entrance दिसत असला तरी जमिनीखाली तो एकरवर पसरला आहे असं म्हटलं जातं, सध्या तिथे entry नाहीये.
या किल्ल्यापेक्षा बंगळुरू चा टिपू सुलतान चा समर पॅलेस बराच सुस्थितीत आहे. 




७. श्री रंगनाथ स्वामी मंदिर
या मंदिराला बाहेरूनच नमस्कार करून आम्ही निघालो. Architecture जबरदस्त दिसत होतं. परंतु इथेच आम्हाला संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते, ७ च्या अगोदर काहीही करून आम्हाला वृंदावन गार्डन ला पोहोचायचं होतं. इथपर्यंत येऊन ते world famous musical fountain आम्हाला miss करायचं नव्हतं.
आता one day tour मध्ये सगळी ठिकाणं आटोपयची म्हणजे काही स्थळांवर पाणी सोडावं लागणार हे आम्ही गृहीतच धरलं होतं 😢

८. कृष्णराजा सागर डॅम / वृंदावन गार्डन / Musical Fountain or Illumination
म्हैसूरू संस्थानचे राजे कृष्णराजा वोडियार चौथे यांच्या काळात हे धरण बांधलं गेलं. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना सुद्धा त्यांनी भविष्याचा विचार करून धरणाचं काम पूर्ण केलं. त्यांचेच नाव या धरणाला दिलेलं आहे. KSR dam, जवळपास 490 km2 चा एरिया व्यापलेला आहे. बंगळुरू city च्या रेल्वे स्थानकाला सुद्धा यांचेच नाव आहे. KSR डॅम ३ नद्यांच्या संगमावर बांधलेलं आहे - कावेरी, हेमावती, लक्ष्मण तीर्थ. येथील नागरिक कावेरी नदीला खूप मानतात, येथे ९०% दुकानांना नावं कावेरी (Cauvery) च दिसतील. 
याच धरण परिसरात 60 acres जागेत वृंदावन हे सुंदर बोटॅनिकल गार्डन उभारलं गेलं. गार्डन च्या entrance पासून musical fountain पर्यन्त जाण्यासाठी धरणाचा बांध पार करावा लागतो. 
संध्याकाळी ०६.४५ च्या दरम्यान आम्ही KSR dam परिसरात पोहोचलो. एका मोठ्या पार्किंग एरिया मध्ये आमची बस पार्क करून guide ने आम्हाला परत ०७.४० पर्यन्त इथेच येण्याबद्दल instructions दिले. अर्ध्या तासांचा musical शो असेल, बाकी अर्धा तास गार्डन फिरायला दिला असेल, म्हणजे जवळच आहे garden, अशी समजूत करून घेतली आम्ही. आमच्या शॉपिंग बॅग्स बऱ्याच होत्या, त्या अशाच बस मध्ये ठेवून जायची आम्हाला भीती वाटत होती, चोरीला गेल्या तर भयंकर भुर्दंड पडला असता. आधीच एक selfie स्टिक गेलेली होती. भूक तर एवढी जबरदस्त लागली होती, गार्डन मध्ये काहीतरी खाऊन घेऊ असं म्हणून बॅग्स ओढत आम्ही माणसं जातायेत त्यांच्या मागून निघालो. 
पाचेक मिनिटं चालल्यावर लक्षात आलं, वाटतं तेव्हढं सोप्प प्रकरण नाहीये हे. प्रवेशद्वार पर्यन्त चालत च बरंच अंतर आम्ही पार करत आलो होतो, शेवटी प्रवेशद्वार दिसलं. प्रवेशद्वार समोर इतकी गर्दी, जत्रा भरली होती. नशीब guide ने आधीच टिकेट्स काढून आमच्या हातात सुपूर्त केली होती. गर्दीतून कसे बसे आम्ही आतमध्ये घुसलो. इथेच ७ वाजले होते. आता इथे काही खात बसायला वेळ नव्हता, लवकरात लवकर fountain पर्यन्त पोहोचणं गरजेचं होतं. गर्दीचा लोट जिथे जातोय तिथे blindly आम्ही चालत होतो. समोर डाव्या बाजूला famous KSR dam ची विस्तीर्ण पसरलेली भिंत दिसली. त्यावर indian tricolor flag ची lighting केलेली होती. वाटलं इथेच fountain थोड्या वेळात सुरू व्हायच असेल. परंतु त्या अथांग जलसागरावरील डॅम समोरील बांधावरून तो भव्य जनसागर अजून पुढे चालत जात होता. आता या गर्दीत आमच्यातील एक जरी व्यक्ती हरवली असती तर कठीण होतं. जागा नवीन आणि भाषा नवीन. आम्ही literally एकमेकांचा हात धरून एकमेकांना गर्दीतून ओढत पुढे सरकत होतो. 
आज दिवसभर सगळीकडेच गर्दी का? अशीच गर्दी असते का वर्षभर म्हैसूरू ला?? 🙁
बांध पार झाला परंतु ते कारंजे कुठे आहे ते अजून काही कळत नव्हतं. आम्ही आता खूपच दमलो आणि वैतागलो होतो, एकदाचं कारंजे बघून कधी पोटात काहीतरी ढकलतोय
असं झालं होतं.
कारंजे चा स्पॉट काही, इतकं चालूनही मिळत नव्हता. असं शोधता शोधता ते musical संपून नाही गेलं म्हणजे मिळवलं 😓 आत्येची परस्थिती आम्ही कशीतरी थोपवून धरली होती, त्यात एवढं चालणं. आत्ये आणि काकीची परिस्थिती खराब होती. मी, किर्ती, सुजल चा भूकबळी जायचा बाकी होता, ऍसिडिटी वाढायला सुरुवात झाली होती. ती आमच्या चिडचिडीवरून च लक्षात येत होतं 😆 (आता हसायला येतंय, तेव्हा परिस्थिती काय होती इथे नाही समजावू शकत 😢)
अचानक कुठेतरी हिंदी गाण्यांचा आणि जल्लोषाचा आवाज 
हळू हळू जवळ यायला लागला, कदाचित आम्ही पोहोचलो होतो ⛲😰
एका चौकोनी भागात रंगीबेरंगी प्रकाशझोतात कारंजे उडत होते. भोवती गोलाकार बसण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या होत्या. आम्ही समोर पोहोचलो आणि शो थांबला 😰 अरे बापरे आम्ही उशिरा पोहोचलो की काय 🥵 तेवढ्यात पायऱ्यांवर बसलेली गर्दी आमच्या दिशेने झेपावली, बाहेर पडण्यासाठी.. कसे बसे आम्ही पायऱ्यांपर्यत पोहोचलो, शेवटचा शो चा स्लॉट बाकी होता, नशीब 😨
पायऱ्यांवर बसायला गेलो खरे, एक एक पायरी घुडग्यापर्यंत उंच. आम्ही चढून बसायचं कसं 😭 इतर पब्लिक शक्यतो शाळेतली पोरं होती, ती माकडसारखी चढून बसत होती, इथे आम्ही काय करायचं. त्यात साड्या घातलेल्या आत्ये आणि काकीची तर परिस्थिती अजून बेक्कार 😤 कशीतरी कुठेतरी जागा बळकावून आम्ही बसलो आणि पुढचा शो चालू व्हायची वाट पाहत होतो.
Lights off झाल्या. तोच पोरांचा जल्लोष सुरू झाला. मी आणि सुजल आमचे मोबाईल कॅमेरा on करून तयारीत राहिलो. आणि हिंदी गाण्यांवर कारंजे थुई थुई नाचायला लागले. आजूबाजूचा जल्लोष त्या कारंज्यावर अजून वाढत जात होता....
परंतु यात काय वेगळं असं होतं??? 😐 
ज्या जगप्रसिद्ध कारंज्यांसाठी साठी आम्ही कालपासून आटापिटा करत होतो, एवढी तंगडतोड करत, या अर्ध्या माणसाच्या उंचीच्या पायऱ्या चढून जागा अडवून बसलो होतो,....
त्या कारंज्या "शीला की जवानी" वर नाचत होत्या 🤐😯😫😭😷



आम्ही आमचे कॅमेरा बंद करून अत्यंत थंड डोक्याने, nil expressions मध्ये ती कारंजी बघत होतो 😶 
आमच्या आजूबाजूचा लहान पोरांचा crowd बेंबीच्या देठापासून ओरडत मजा करत होता. आणि आम्ही... 😷

इथे येण्यापेक्षा चामुंडेश्वरी किंवा रंगनाथ स्वामि मंदिर पाहायला गेलो असतो.. त्यापेक्षा गार्डन च्या बाहेर खाण्याचे स्टॉल होते तिथे आडवा हात मारला असता 😵

अरे हो, ०७.३० इथेच वाजले, ०७.४० पर्यंत आम्ही कसेच बस पार्किंग पर्यंत पोहोचू शकत नव्हतो. तो पूर्ण बांध पुन्हा भर गर्दीत चालायचा आहे तो विचार करूनच धडकी भरली. कारंजे थांबताच त्या गर्दीसोबत आम्ही सुद्धा धावत सुटलो. 
खायला थांबायला वेळ नव्हता. एका ठिकाणी पॉपकॉर्न, चणे, fried मटार दिसले ते पटकन सुजल आणि किर्ती ने घेतले. बस मध्ये बसून तरी खाऊ. 
एकदाची बस मध्ये बसलो आणि आम्ही सगळ्यांनी पॉपकॉर्न चा बकाणा तोंडात कोंबला. भुकेने गरगरायला झालं होतं. बस चालू झाल्यावर थंड हवेवर lodge ला पोहोचेपर्यंत डुलकी लागली. कोणलाही एकमेकांशी बोलायची ही ताकद नव्हती. 🤧🥵

Back to Hotel Garden City :
मॅनेजर तुकाराम आमच्या टूर चा फीडबॅक घ्यायला समोर आले खरे, परंतु माझी तरी काही बोलायची ताकद नव्हती, काका बोलले असतील.
जेवणा ची ऑर्डर रूम service ला सांगू, तो आणून देईल असा विचार केला. सर काका एवढे फिरूनही फ्रेश होते 😱 दिक्षित diet पॅटर्न 🫡 त्यामुळे त्यांना दिवसातून एक वेळ जेवायची सवय आहे. आम्ही दिवसातून ४ वेळा खाणारी माणसं, आमचं पित्त खवळलं 😖😆
काका आमच्यासाठी Hotel Ashirwad Grand मधून डिनर पार्सल घेऊन आले, जिथे आम्ही काल जाऊन जेवलो होतो.
Lodge वर पोहोचताच किर्ती ला पित्ताच्या उलट्या सुरू झाल्या, कारण नक्की काय खाल्ल्यामुळे ते कळायला मार्ग नव्हता. कदाचित दुपारी प्यायलेल juice असावं. डाळ खिचडी आणली होती तीसुद्धा तिला खाल्ल्यावर उलटी झाली. रात्रीपर्यंत तर तिच्या पोटात पाणी किंवा औषध ही टिकत नव्हतं. टेन्शन वाढत चाललं होतं. उद्या किर्ती घरापर्यंत व्यवस्थित पोहोचायला हवी होती आणि मुंबई ला येणाऱ्या आम्ही दोघीच होतो, बाकी चौघ वेगळ्या route / ट्रेन ने रत्नागिरी कुडाळ ला जाणारे होते. मला आता खूप टेन्शन आलं होतं. 
दिवसभराचा हिशोब डायरी मध्ये लिहून उद्या बंगळूरु ला कसं जायचं हे discussion आमचं सुरू झालं. डायरेक्ट ट्रेन पकडायची की बुकिंग करून जायचं. किर्ती ची परिस्थिती पाहता आम्हाला ट्रेन बुकिंग करणं सोयीस्कर वाटलं. १०.३०am ची म्हैसूरू - बंगळुरू ट्रेन होती. सकाळी ०९.३० लाच lodge सोडू, असा विचार करून आम्ही झोपायला गेलो. 

एक मात्र धडा मिळाला होता आज, city टूर हा प्रकार आपल्याला जमण्यासारखा नाहीये. म्हणजे ग्रुप मध्ये लहान मुलं किंवा तरुण माणसं च असतील तर ठीक. अशा प्रकारे पटापट सगळी ठिकाणं एका दिवसांत पाहणं वयोमानानुसार तरी शक्य नाही. आणि प्रत्येक ठिकाण अभ्यासपूर्ण पाहता सुद्धा येत नाही.. 
इतर पर्यटकांचा विचार करत, धावपळीत नजर टाकून होते फक्त...

(क्रमशः)
~ सुप्रिया घुडे

यापुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर