बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ५

याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

भाग १ 
https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html
बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ५
(क्रमशः)

१५-डिसेंबर-२०२२
ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण सकाळी ०८.३० वाजता आवरून तयार झालो. मुख्य म्हणजे आत्ये, जिला सर्वात जास्त वेळ लागतो, तिच्या नंतर नंबर लागतो सुजल चा 😆🤣 
नाश्ता करण्यात वेळ दवडायचा नव्हता. इस्कॉन ला किंवा तिथे जवळपास नाश्ता मिळेल असं गृहीत धरूनच आम्ही lodge खाली उतरलो. 
समोर रिक्षा वाल्याला इस्कॉन पर्यंत किती होईल ते विचारलं . ₹२००/- बोलला. लगेच ओला ऑटो मिळतेय का चेक केलं. ₹११०. सवालच नव्हता, २ ओला ऑटो बुक केल्या आणि इस्कॉन ला पोहोचलो.

इस्कॉन temple:
मेन रोड वर उभं राहून आतमध्ये एवढं भव्य मंदिर आणि परिसर असेल याची कल्पना येत नाही. 

₹३०/- (प्रत्येकी ₹५/-) चप्पल स्टॅण्ड ला देऊन एका गोणीत आमचे सहाही जणांचे चप्पल एकत्र ठेवले गेले. 
त्यानंतर श्री प्रल्हाद नृसिंह, श्री निवास गोविंद, श्री गरुड असं देव दर्शन करत आपण मुख्य राधाकृष्ण मंदिरापर्यंत पोहोचतो. 

बरंच चालत, पायऱ्या चढत जावं लागतं. In fact या जागेचं नावच Hare Krishna Hill आहे. आत्ये आणि काकीला चढणीचा त्रास होतो. आत्येला धाप लागते आणि काकीचे घुढगे धरतात त्यामुळे आम्ही शक्यतो कुठे जास्त चढायचं असेल अशा जागा skip करतो. या ठिकाणी एवढं चढत जायचं असेल याची कल्पना नव्हती, तरी आत्ये आणि काकीने manage केलं. 




मंदिर स्वच्छ आणि सुंदर आहे. Generally सगळ्यांच इस्कॉन मंदिराचे management perfect च असतं त्यामुळे दुमत उरतच नाही. तरीही मला आपलं जुहूच च इस्कॉन जास्त आवडतं 🥰😃 
किर्ती ने नवऱ्यासाठी भगवद्गीता घेतली. तर मी कृष्ण कथाचं पुस्तक घेतलं. इस्कॉन मध्ये श्री कृष्णाची पुस्तकं discount price मध्ये मिळतात. 

मी जुहू च्या इस्कॉन ला भगवद्गीता घेतली होती, वाचते मी अधून मधून कोणतही एखादं पान उघडून. डोळसपणे आणि मनाची कवाडं उघडी ठेवून वाचलं तर गीता नेहमीच काहीतरी नवीन शिकवण देत असते. आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या भगवद्गीते मध्ये आहे. जी उत्तरं आपण तरुणपणी शोधत असतो. आणि माणूस उत्तरवयात गीता हातात घेऊन बसतो, जेव्हा मिळालेल्या उत्तरांचे बस्स हिशोब मांडायचे असतात. आपल्यात काही महान आत्मे सुद्धा आहेत जे म्हणतील आम्हाला असल्या अध्यात्माची गरज नाही 😄असो.. 
मंदिरातून बाहेर पडण्या अगोदर इथे एक फूड court दिसलं. आम्ही आधीच भुकेलेली होतोच, खाण्याच्या एवढ्या variety बघून आम्ही तुटूनच पडलो. 🤤 









हव्या त्या खाऊ ची ऑर्डर द्यायची, gpay करायचं, तिथली व्यक्ती लगेच एका paper plate मध्ये आपण घेतलेला पदार्थ microwave मध्ये गरम करून देणार, तिथेच उभं राहून खायचं. कसलाही kiosk नाही 😁 पोटभरून खाल्ल्यावर बाहेर पडताना एका ठिकाणी एका द्रोणात गरमागरम "प्रसादम" दिला जातो. 

तुम्ही २-३ द्रोण आधारासाठी एकात एक ठेवून उचलले तरी तिथली व्यक्ती एकच द्रोण काढून तुमच्या हातात ठेवते. तुम्ही ठरवा, कसं काय ते manage करत खायचं ते. 😆 आम्ही आधीच बरेच पदार्थ खाऊन पोट भरून आलो होतो त्यामुळे प्रसाद म्हणून पाच जणीत २ असे द्रोण घेतले.
ते फूड court आधी का ठेवलंय ते लक्षात आलं. लोकं प्रसादम खाऊनच पोट भरतील मग ते विविध पदार्थ खाणारच नाहीत 😀 पण काहीही म्हणा, ते पदार्थ होते फ्रेश आणि tasty. 
काका आमच्या पुढे चालत जाऊन कधीच चप्पल स्टॅण्ड ला पोहोचले होते. 😃 चप्पल collect करून आता आम्ही बंगळुरू पॅलेस च्या मार्गाला निघालो, जे कालपासून आमचं pending होतं.

बंगळुरू पॅलेस :
इस्कॉन हुन बंगळुरू पॅलेस ला जायला आम्हाला ओला कार / ऑटो काहीच मिळत नव्हतं.या बंगळुरू पॅलेस ला काय नरटी लागली होती देव जाणो 😠 इस्कॉन च्या बाहेर 2 रिक्षावाले ₹५००/- मध्ये आम्हा सहा जणांना बंगळुरू पॅलेस ला सोडायला तयार झाले. 
तिथे पोहोचलो खरे, पण हाय रे कर्मा, आज तर पॅलेस च्या गेट समोर सुद्धा कोणाला उभं करत नव्हते, आधीच्या वळणावरून च सगळ्या vehicles ना परत पाठवत होते. आम्ही रिक्षा तिथेच सोडल्या आणि चौकशी केली तर म्हणे मोठं function आहे, कोणी deligates येणार आहेत, पॅलेस आज पब्लिक साठी बंद आहे.
असली तळपायाची आग मस्तकात गेली होती सांगू. 🤬
जर एवढा मोठा function होता तर काल आम्ही दारापर्यंत आलो होतो तेव्हाच का नाही सांगितलं. तेव्हा का बोलले ''उद्या या". एका रात्रीत तर function ठरत नाही 😡
आमचा सगळ्यांचा भयंकर हिरमोड झाला होता. महत्वाचं म्हणजे हे आम्हाला कालच कळलं असतं तर आम्ही सकाळीच म्हैसूरू ला जायला निघालो असतो, आमचा अर्धा दिवस इथे फुकट गेला नसता. खूप खूपच चिडचिड झाली 😠

Back to Sri Vijaya Palace Lodge: 
बंगळुरू ने overall च हिरमोड केला होता, बंगळुरू लवकरात लवकर सोडावं म्हणून आम्ही lodge वर निघालो. 
त्यात भरीस भर एका रिक्षा वाल्याने डोकं फिरवलं. चिकपेट म्हटल्यावर सोडतो बोलला आणि बसल्यावर कोणत्यातरी दुकानाचे promotion करायला लागला, इथे शॉपिंग करा म्हणे. त्याला वाटलं आम्ही शॉपिंग ला चाललो. त्याला बोललो आम्ही केली काल शॉपिंग आम्हाला lodge वर सोडा, तर म्हणे तिथे नाही जाऊ शकत, दुकानांपर्यंत सोडतो. च्यायला 🤬
आता तर समस्त बंगळुरू च्या रिक्षावाल्याना एकत्र करून काडी लावावी असा असुरी विचार मनात यायला लागला 👿 
लगेच दुसरी ऑटो पकडली, त्याला शिव्या देऊन (मनातल्या मनात) सोडलं 🤬
आम्ही बसलेल्या ऑटो वाल्याने बंगळुरू पॅलेस चा काय issue झाला ते विचारलं, मी कालपासूनची सगळी गरळ ओकली. मग तो आम्हाला समजवणीच्या सुरात सांगायला लागला, म्हैसूरू ला जा इथल्यापेक्षा पॅलेस आणि झू छान आहेत. बंगळुरू ला काही नाही. मी मनात - "नशीब हे तुम्हीच बोलताय". 😒 त्याच्याकडे म्हैसूरू ला जायला कोणतं mode of transport सोयीचं आहे ते विचारलं. तर त्याने ट्रेन सांगितलं. तरी बस ने जायचं म्हटलं तर मॅजेस्टिक ला बस पकडायची ना? तर म्हणे नाही Satellite Bus Stand. Majestic वरून म्हैसूरू ला बस जात नाही म्हणे. च्यायला, या लोकांमध्ये च एकमत नाही म्हैसूरू ला बस जातात कुठून नक्की 😠
बंगळुरू पॅलेस ते चिकपेट २ ऑटो करून प्रत्येकी ₹१५०/- (x २ = ₹३००/-) रिक्षा चे झाले. मी प्रत्येक वेळी पब्लिक ट्रान्सपोर्ट च भाडं यासाठी सांगतेय की इथली लोकं कसे प्रवाशांना फसवतात हे सगळ्यांना कळावं 😡

पॅकिंग आम्ही आदल्या रात्रीच करून ठेवली होती. आलो की जेवून बॅग उचलायची आणि म्हैसूरू ला निघायचं या तयारीत च आम्ही सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो. 
चिकपेट ला उतरून किर्ती, सुजल आणि मी राघवेंद्र प्रसन्न ला निघालो. ते एकमेव रेस्टॉरंट होत आमच्या पोटाला आधार 🥺 सर काका, आत्ये, काकी ला आम्ही lodge वर पुढे पाठवलं, त्यांच्यासाठी पार्सल घेऊनच येणार होतो.

कालच्या pothy च्या शॉपिंग मध्ये आत्ये ने एक readymade blouse घेतला तो तिला खूपच loose होत होता. आता replace कधी करणार, वेळ तर अजिबात नव्हता. मग आम्ही तिघी जेवणाचं पार्सल घेऊन येईपर्यंत सर काका आत्ये ला घेऊन pothy ला गेले आणि आत्ये च काम झालं. नाहीतर तेवढंच राहिलं असतं. 

Lunch @ राघवेंद्र प्रसन्न :
इडली डोसा यापैकी आम्हाला काहीही नको होतं. तरी कालचा स्ट्रीट फूड चा सेट डोसा चांगला होता, तसा इथे मिळतो का विचारू तर म्हणे तो सकाळी किंवा संध्याकाळी. आता नाही 🤐 मग मी पोटाला थंड म्हणून curd rice मागवला आणि या दोघीनी fried rice मागवला. तो rice बघून हसावं की रडावं तेच कळेना 😃 त्यांचा तो बिसबेली भात च सॉस सोबत वाढला होता  असं वाटत होतं 🤣 
एक मिनिट, rice सोबत सॉस कोण खातं???? 🤔🤔🤔🤔




अजून एक डिश काहीतरी मागवायची म्हणून veg Manchurian मागवलं, नशीब त्या डिश ला तरी राघवेंद्र प्रसन्न ने न्याय दिला होता 🤣

म्हैसूरू साठी प्रयाण :
सगळ्यांची पेटपूजा झाल्यावर आम्ही श्री विजया पॅलेस च्या रूम सोडल्या. तरी आता एकदा शेवटचं कोणालातरी विचारावं म्हणून reception च्या manager ला विचारलं, आम्ही म्हैसूरू ला कसे जाऊ? कालपासून बरेच confuse झालो आहोत आम्ही. तर त्याने स्पष्ट सांगितलं बस ने नको ट्रेन ने जा. आता पाऊण तासांत एक ट्रेन आहे. खाली रिक्षा मिळतील, रिक्षा ला ₹५०/- द्या (जास्त मागतील पण तेवढेच द्या) आणि तडक KSR बंगळुरू गाठा. आता ट्रेन च्या पारड्यात च जास्त मतं होती, आम्ही बॅग्स उचलून 3 ऑटो पकडल्या. आणि इथेही बंगळुरू सोडता सोडता ऑटो वाल्यानी लुटायच ते लुटलं. तीनही रिक्षावाले ₹१००/- च्या खाली यायला तयार नव्हते. अडला हरी म्हणून, परत या बंगळुरू च्या रिक्षावाल्यांची म्होरं नको म्हणत आम्ही KSR बंगळुरू गाठलं.

तिकीट काढायला बऱ्याच मोठ्या line होत्या आणि मोजकीच २-३ च तिकीट window ओपन होते. कमाल वाटली, एवढं मोठं स्टेशन आणि २-३ च तिकीट window का ओपन ठेवाव्या?
त्यात बंगळुरू ची लोकं खूपच गावठी आणि बेशिस्त. बायका तर आपल्या बाई पणाचा फायदा घेऊन मध्येच घुसून डायरेक्ट तिकीट घेत होत्या. बघितलं थोडा वेळ आणि मग फुल्ल राडा केला - "काय मेट्रो सिटी असून उपयोग, असले बेशिस्त लोकं तुम्ही आहात तर 😠" 
त्या मध्ये घुसणार्या बायकांची सुद्धा नाही ठेवली. ज्यांना हिंदी समजत होती त्यांना थोडी अक्कल आली असावी. मग ती लोकं सुद्धा माझ्या बाजूने उभे राहिले. लगेच तिथे एक RPF constable आला आणि त्याने मध्ये घुसणार्यांना हकलावून line मध्ये उभं केलं. 🤨😎

एकदा बोरिवली ला बस मध्ये चढताना एक पोरगा line मध्ये न येता मध्येच घुसला होता, तेव्हा कॉलर धरून त्याला मी खाली आणलं होतं आणि line मध्ये यायला लावलं. आई ला घडला प्रकार सांगितल्यावर ती एवढी घाबरली - "म्हणे मुंबईत नवीन आहेस असं वागू नको." आपल्याला बेशस्तीत वागलेलं आवडतं नाही, असलं वागणं स्वतःच्या घरी, पब्लिक place मध्ये नाही 🤨

₹४८०/- च KSR बंगळुरू ते म्हैसूरू junction जनरल क्लास च तिकीट झालं. कुठे ते ओला चे ₹४०००/- आणि कुठे ₹४८०/-. 
ट्रेन प्लॅटफॉर्म ला लागलेलीच होती. बसायला ही जागा मिळाली. 

अडीच तासांत आम्ही म्हैसूरू ला पोहोचलो. म्हणजे कालपासून ओला आणि रिक्षा ड्राइवर जे सांगत होते, ५ तास लागणार ते कसले.??!! ठग लोकं नुसती 😠 

म्हैसूरू junction :
म्हैसूरू पर्यंतच्या प्रवासात सकाळपासून चिडचिड होऊन जे डोकं खराब झालं होतं ते शांत झालं. आणि म्हैसूरू junction ला उतरून आम्हा सहा जणांची पुन्हा मजा मस्करी सुरू झाली 😀 काही जागेच्या वातावरणात च जादू असते, ती जादू म्हैसूरू ला आमच्यावर मंतरली 🥰




इथून हॉटेल गार्डन सिटी पर्यंत जायचं कसं हे बघणं गरजेचं होतं. पुन्हा हॉटेल मालकांना कॉल केला. 
गेल्या महिनाभरात गार्डन सिटी च्या मालकांना इतक्या वेळा आमचे कॉल गेले असतील ना 😆 बुकिंग करायचं होतं तेव्हा आत्ये कॉल करायची, आणि कालपासून मी बोलत होते 😁 बरं आम्ही दोघीही कॉल करायचो सर काकांच्या नंबर वरून 🤣 

हॉटेल मालकांना कॉल केल्यावर त्यांनी prepaid ऑटो करून यायचं सुचवलं. म्हैसूरू ला सुद्धा prepaid auto सेवा असल्याचं बघून आम्ही जाम खुश झालो. 

म्हैसूरू स्टेशन प्लॅटफॉर्म हुन बाहेर पडेपर्यंत भुयारी मार्गातून चालत गेलात तर दोन्ही बाजूने सुंदर भित्तिचित्रे रंगवलेली दिसतात 😍









स्टेशन बाहेर येताच entrance ला एक जोडपं उभं होतं त्यांना आम्ही प्रीपेड ऑटो स्टॅण्ड कुठे आहे विचारलं तर त्यांनी डाव्या side ला बोट दाखवलं. तेवढ्यात समोर एक ऑटोवाला येऊन उभा राहिला, त्याने ऐकलं होतं आम्ही प्रीपेड ऑटो शोधतोय त्याने लगेच पुढे येऊन उजव्या बाजूला बोट दाखवलं. आम्ही confused 🤔 
परंतु मगाशी ज्या जोडप्याला आम्ही विचारलं होतं, त्यांच्या लक्षात आलं हा ऑटोवाला आम्हाला फसवतोय, लगेच तो माणूस धावत आला आणि परत त्याने डाव्या side ला थोडं लांबवर प्रीपेड ऑटो चा बोर्ड दिसत असल्याचं दाखवला. त्याला मनापासून धन्यवाद बोललो. आणि त्या रिक्षावल्याकडे बघायला जाणार तर तो तिथून पळाला होता 😠

म्हैसूरू मधलं प्रसन्न वातावरण भारावून टाकतं. काही जागा आणि माणसं पाहताक्षणी  मनात घर करतात, प्रेमात पाडतात तसं काहीसं म्हैसूरू बाबतीत झालं. 




म्हैसूरू ते हॉटेल गार्डन सिटी साठी प्रीपेड स्टॅण्ड ला ३ ऑटो केल्या . प्रत्येकी ₹५०/-.. महाराष्ट्रात सुद्धा पाहिजे यार हा प्रीपेड ऑटो प्रकार, खूप गरज आहे ...


Hotel Garden City :
Bannimantap road वरचं BEST HOTEL. अजून काहीच शब्द नाहीयेत. कालपासून आपण इथेच का नाही आलो, असं राहून राहून वाटायला लागलं. 
 तुकाराम नावाचे गृहस्थ मॅनेजर म्हणून आहेत तिथे. त्यांनी आधीच आमची माफी मागितली, म्हणे माझं नाव मराठी आहे परंतु मी तुमच्याशी मराठीत बोलू शकत नाही, बऱ्याच पिढ्या अगोदर आम्ही म्हैसूरू ला स्थायिक झाले ते इथलेच झालो 😀 मॅनेजर ने आल्या आल्या  गप्पा मारत आमचा ताबा घेतला म्हणू शकता. त्यांनी आम्हाला म्हैसूरू सिटी टूर चे सुद्धा ऑपशन दिले. आमचं एक मोठं टेन्शन कमी झालं, नाहीतर इथे कसं कुठे फिरायचं हा प्रश्नच होता.


रूम वर येऊन फ्रेश झाल्यावर मस्त वाफाळत्या चहा ने ताजेतवाने झालो 🤩



हॉटेल आशिर्वाद ग्रँड :
हे रेस्टॉरंट सुचवलं मॅनेजर तुकाराम यांनीच 😄 
आशिर्वाद मध्ये जेवण पोटभर झालं आणि मन तृप्त झालं. त्यांच्याकडंच पान सुद्धा खास होतं. 





जेवायला जाण्या अगोदर आणि जेवल्यानंतर मस्तपैकी Bannimantap road  रेंगाळत फिरलो. फोटो काढले 😋 एकत्र फिरत - गप्पा मारत जो वेळ घालवला जातो ना त्याची तुलना काशाशीच होऊ शकत नाही 😊
 या गार्डन सिटी मध्ये राहण्यासाठी, इथे असंच रेंगाळत फिरण्यासाठी परत एक म्हैसूरू ट्रिप करायची असा विचारही चालू झाला आमचा 😆




जेवून हॉटेल ला आल्यावर म्हटलं तुकाराम महाराजांना पकडू आणि उद्याच्या ट्रिप ची माहिती विचारून घेऊ.
परंतु त्यांची शिफ्ट संपली होती आणि हॉटेल मालकाचे भाऊ आले होते. त्यांनी सिटी टूर ची व्यवस्थित माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.१५ सगळ्यांनी reception ला हजर राहा सांगितलं. 
One day Tour चे आमचे सहा जणांचे ₹२१००/- होणार होते. Best deal होती 😍 कुर्ग आणि ऊटी चे सुद्धा package होते त्यांच्याकडे पण आम्हाला म्हैसूरू च पाहायचं होतं. 


मिनी बस आली की आम्हाला त्यात बसवून देणार होते. एक काम आमचं झालं होतं.

आता दुसरं - आम्हाला इथला authentic Mysore पाक हवा होता. ते सुद्धा त्यांनी काम केलं. त्यांच्या कडील माणसाला उद्या येताना तिथल्या famous डेअरी मधून फ्रेश म्हैसूर पाक व्यवस्थित पॅक करून आणायचं फर्मान सुनावलं 😃 ₹१२००/- किलो. आम्हा तिघीना ऑफिस मध्ये सुद्धा वाटायचा होता. अर्धा किलो चे पॅक असे अडीच किलो म्हैसूर पाक आम्ही मागवला. 🥰



रात्री झोपण्याआधी mandatory एक गप्पांच session झालं 😀 दिवसभराचे हिशोब डायरी मध्ये लिहून काढले.
 
आता फक्त उद्या लवकर उठून सकाळी ०८.१५ ला रेडी राहायचं होतं 🚌

(क्रमशः)
~ सुप्रिया घुडे
यापुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन