कुठेतरी वाचलेले - २
भूतकाळाच्या उदारातच भविष्यकाळ जन्माला येत असला तरी भविष्यकाळाच भवितव्य भूतकाळाला ठरविता येत नाही. कालचक्र कधीच थांबत नाही. घटना घडत जातात. वर्तमान काळातून भूतकाळाकडे पाहताना गतगोष्टी चूक की बरोबर ठरवू पाहतो. पण जी गोष्ट आपणाकडून घडविली जाते ती दुरुस्त पण करता येत नाही. समजतं, पण उमजत नाही. आपण सारे जगत असतो. समाधान किंवा पश्चाताप करत राहतो. काळ पुढे सरकत असतो. उद्याचा भविष्यकाळ आजचा वर्तमानकाळ होतो आणि आजचा वर्तमानकाळ भूतकाळात जमा होतो. मनुष्यप्राणी बदलाच्या अपेक्षेने भविष्यकाळाची वाट पाहात असतो... - चिरंजीव... अश्वत्थामा पृष्ठ क्र.५५ (लेखक - शंकर टिळवे)