दिवाळीचा फराळ
दिवाळीचा फराळ
आई - "दिवाळीचा फराळ खायचा असेल तर अगोदर १आठवडा सुट्टी काढून फराळ बनवायला ये"
मी - "१ आठवडा??? 😱🤒🤕
अगं, तुला माझी सरकारी नोकरी वाटली काय?!" 😒😕🙃
आई - "ते बघ काय ते तू. मागाहून फराळासाठी रडत बसायचं नाही. माझ्याने एकटीला आताशी काय जमत नाही. आणि तुझ्या बहिणीला mobile पुढे काही सुचत नाही 😒"
(शेवटच्या वाक्यावर दोघींची तिथे बाचाबाची सुरू झालेली मला phone वर ऐकायला येते आणि फराळ म्हटलं की मला कुडाळ ची आठवण येते 😍)
.
.
कुडाळ... 💞
शाळेतून सुटून थेट घराच्या gate पर्यंत पोचलं की फराळाचा सुगंध स्वागताला तयार असायचा 😇
विहीर, माड, मोठठ अंगण, अंगणातलं तुळशी वृंदावन, कौलारू घर(आम्ही आत्ये च्या शेजारी भाड्याने राहात होतो, बाबांची सिंधुदुर्ग मध्ये transfer असेपर्यंत); असं सगळं फराळाच्या वासावर पार करत मी आई समोर पोहोचलेली असायचे. पटकन आवरून आई करत असलेल्या फराळाच्या तयारीत माझा खारीचा वाटा असायचा 🤗
त्यावेळी stove वर तळल्या जाणाऱ्या फराळाची मजाच काही निराळी होती ☺
आत्ये नोकरी करत असल्याने रात्री जेवून तिच्या मदतीला आम्ही फराळ बनवायला जायचो 😃
रात्री १० नंतर फराळ बनवायचं दुसरं session आत्येकडे सुरू व्हायचं. 😀
आमच्याकडे चकल्या आणि करंज्या सर्वांत शेवटी बनवल्या जायच्या. कारण आधीच बनवल्या तर दिवाळीच्या दिवशी फराळाच्या डब्यात देण्यापूरत्या पण उरायच्या नाहीत 😝
साफ-सफाई साठी शनिवार - रविवार ठरलेले. दर दिवशी काढायच्या रांगोळीच्या designs ठरवल्या जायच्या. वर्षानुवर्षे दारासमोर कंदील म्हणून प्रत्येक घरातली एक विशिष्ट "चांदणी" असायची, ती पोटमाळ्यावरून काढली जायची. पणत्या पाण्यात भिजत ठेवल्या जायच्या(त्यामुळे तेल जास्त शोषून नाही घेतलं जातं आणि पणती खूप वेळ जळते).
फटाक्यांची तयारी केली जायची(तेव्हा प्रदूषण नव्हतं वाटते 😝)..
तुळशीच्या लग्नासाठी वृंदावनाची साफ-सफाई करून नवीन रंग दिला जायचा, ते काम माझ्या बाबांचं असायचं. त्यातही माझा खारीचा वाटा असायचा 😋🤗
अभ्यंगस्नानासाठी लागणारे नवीन कपडे, उटणं, कारटी, मोती साबण, रस-पोह्याची तयारी, घरातली ओवाळणी आटोपली की कुडाळेश्वराला किंवा वालावल च्या रामेश्वराला जायची लगबग (रत्नागिरी ला असलो तर भैरी आणि दत्ताच्या देवळात जायचो), लक्ष्मीपूजनाला प्रत्येक दुकानात जाऊन हात भरून chocolates घ्यायची गडबड ...
सगळं काही nostalgic प्रकारातलं होतं खरं 😍
.
.
.
आई - "अगं, ऐकतेयस ना? कुठे तंद्री लागली?"
मी - "काही नाही तुम्हा दोघींची वादावादी ऐकत होते "
आई - "मग काय ठरवतेयस?"
मी - "बघू कसं जमतंय ते..."
.
.
.
आता पूर्वीसारखी फराळाची किंबहुना दिवाळीची मजा खरच नाही अनुभवता येणार. 😖
एकतर आधीच्या पिढीत तेवढे त्राण नाहीत,
आणि आताच्या पिढीला तेवढा वेळ नाही..... 😢
~सुप्रिया घुडे~
07-Oct-2017
फोटो source : unknown

Comments
Post a Comment