आयुष्य


.. फोन वाजला,

आई - 'क्ष' hospitalised आहे. जाऊन भेटून ये.

मी - हो, जेवायलाच बसलेय. निघते लगेच.

फोन ठेवला. अरे, आता गणपतीला तर भेट झाली आणि एकदम paralysis attack?

सगळ्यांची फोना-फोनी सुरू.

वेळ कशी येईल नाही सांगू शकत. तरुणपणातलं एवढं उमद व्यक्तिमत्व, वयोमानानुसार तेही अचानक attack आल्यामुळे असं अंथरुणाला खिळलेलं बघवत नव्हतं. कशी परिस्थिती येते ना.

एकदा नियती ने डाव साधला की पैसा पण काहीही नाही करू शकत.

नातेवाईकांची गर्दी जमली. अशा वेळी नेहमी एकमेकांचा द्वेष करणारे पण एकत्र येतात. बाहेर विषय सुरू होतात -

१- 'क्ष' याने सगळी property खाल्ली आता बघा काय परिस्थिती आलीये ती.

२- जाऊ दे आता काही बोलून उपयोग आहे.

३- बायको पोरीचे हाल ना

मी - अरे पण आता अशा परिस्थितीत काही बोलून उपयोग आहे का?

१- हो, 'क्ष' तुझे लाड करायचा ना म्हणून तुला त्याच कौतुक.

मी - अस काही नाही. पण माणूस आज आहे उद्या नाही. असं समजा झालेल्या गोष्टींची अद्दल घडली त्याला. का उगाच वाईट गोष्टी उगाळत बसा. माझा आयुष्यातली जवळची माणसं अचानक नाहीशी झालेली पहिली आहेत मी...

खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सगळीकडे हा blame/hate game खेळत असतो. नातेवाईकांमध्ये किंवा office मध्ये म्हणा. काय साध्य होणार आहे या सगळ्याने? सद्य परिस्थिती अशी आहे की आज आपण जी व्यक्ती समोर पाहतो ती उद्या दिसेल की नाही तीसुद्धा शाश्वती नसते.

अगदी काल- परवाची Elphinstone stampede चीच घटना घ्या. घरातून बाहेर पडताना त्यांनी विचार तरी केला असेल का की आपण पुन्हा कधीच आपल्या घरात श्वास घेणार नाही आहे. जे आपल्या गावापासून/घरातल्यांपसून लांब मुंबई ला आले असतील (शेवटची कधी घरातल्यांशी भेट झाली असेल देव जाणो) त्यांना वाटलं तरी असेल की आपण आपल्या माणसाला भेटलो ती शेवटची  भेट होती??

शाळा - college मध्ये असताना कोणाशी भांडण झालं/ बोलणं बंद केलं की आई समजवायची -
'अगं, एकदा आपा-पल्या आयुष्यात busy झालात की एकमेकांना भेटायचं सोड, बोलायला पण वेळ मिळणार नाही. आताच life enjoy करा. अशी भांडणं करत बसू नका.'
आता कळतंय की त्यात किती तथ्य होतं ते..
आपल्याला एकमेकांसाठी वेळ कमी पडत चाललाय.

माझ्या ऑफिस मधली मैत्रीण मला बोलली -
"आपली भेटच होत नाही. तुझे साडीतले सगळे photos मी direct fb वर पाहाते"

एवढी busy झालोय आपण की एकमेकांकडे पाहायला ही वेळ नाही.??!!!!
WALL•E Movie आठवतो मला अशा वेळी.
सामोरा-समोर उभी राहून लोकं chatting करतायेत.

Elphinstone stampede चा विषय चालू होता तेव्हा ती बोलत होती - "लोकं किती निर्दयी झालेत."

पण मला असं वाटतं, आपण लोकांना निर्दयी नाही बोलू शकत. जीवावर बेतलं की सगळेच स्वार्थी बनतात. तोच स्वार्थीपणा तिथल्या प्रत्येक व्यक्तीने दाखवला. In fact, निसर्गाचा नियमच आहे तो.
लोकांकडे वेळ नाहीये. सगळ्यांना घाई लागलेली आहे. कुठेतरी पोहोचायची घाई!

घडाळ्याचे गुलाम बनलोय आपण. यातून काही साध्य होणार नाहीये. स्वतः ला वेळ द्या. घरातल्यांना वेळ द्या.
Gossiping/Blame game/Hate Game  सोडून द्या. प्रत्येक क्षण असा साजरा करा की शेवटचा आहे. आयुष्य खूप छोटं आहे. ते खरच एकमेकांचा द्वेष / Gossiping करण्यात  फुकट घालवू नका...

आयुष्य साजरं करा...

~सुप्रिया घुडे~
01-Oct-2017

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर