देवराई

देवराई
लेखक - डॉ. उमेश श्रीराम मुंडल्ये
Vivek saptahik








देवराई Devraai नावाचा एक चित्रपट आला होता, २००४ मध्ये. Atul Kulkarni यांनी एका schizophrenic patient ची भूमिका छान वठवली होती. त्या patient च्या मनातील पावित्र्याची कल्पना म्हणजे - देवराई.

मी स्वतः कोकणातली असल्याने माझ्या मराठवाडा विदर्भातल्या बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं होतं तेव्हा, हा चित्रपट पाहून - तुमच्याकडे खरंच एवढी घनदाट जंगलं असतात का??

देवराई - sacred groves. मनुष्यवस्तीपासून लांब असलेलं एक पवित्र जंगल. एखादं झाड किंवा दगड देव मानून ते जंगल त्याला अर्पण केलं जातं. मग त्या जंगलातला कोणताही भाग मनुष्य स्वार्थासाठी वापरू शकत नाही. धार्मिक भावना गुंतलेल्या असल्याने आपोआप माणूस त्या देवराई पासून दूर राहतो. आणि मग सुरू होतं महावृक्ष आणि महालातांचं तिथे अनभिषिक्त राज्य. तिथूनच उगम पावतात नद्या, पुन्हा नवीन निसर्गाच्या सृजनासाठी, वर्षानुवर्षे हे अखंड चालू आहे. अविरत.
परंतु गेल्या काही दशकात धार्मिकता लोप पावली आहे, आणि मनुष्य स्वार्थापायी बळी जातोय या पवित्र जंगलांचा.
या देवराई ना वाचवण्याचे, लोकजागृतीच काम गेले कित्येक वर्षे करतायेत, डॉ. उमेश  मुंडल्ये.
त्यांच्या जवळ असलेल्या अफाट महितीमधून या पुस्तकाद्वारे सुद्धा थोडीफार जनजागृती होईल ही अपेक्षा. 
वृक्ष संवर्धन सध्या काळाची गरज आहे. वृक्ष लावू नाही शकलो तरी आहे त्या वृक्षांची काळजी घेणं आपल्या हातात आहे.
आवर्जून वाचावं असं पुस्तक - देवराई 🌳

पुस्तक नोंदणीसाठी  खालील लिंक पहावी -
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2723175094376843&id=100000531367329

त्यांच्या fb page वर त्यांच्या कामाचा आढावा लक्षात येतो -
https://www.facebook.com/usmundlye/

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर