Posts

पाककौशल्य भाग ४

Image
पाककौशल्य भाग ४ Grated Coconut - Condensed Milk - Chocolate Roll Actually Facebook वर वेगळी recipe बघताना हा पदार्थ सुचलाय. आमच्याकडे खोबऱ्याचा सदैव सुकाळ त्यामुळे ते कुठे कुठे वापरायच त्यासाठी आयडिया शोधाव्या लागतात. 😁 खोबरं किसून, भाजून, मिक्सर वर बारीक करून पुन्हा कढई मध्ये काढून घेतलं. मंद आचेवर परतत त्यात condensed milk mix करत गेले. यात पण बरेच उद्योग झालेच म्हणा. नेहमी काहीतरी छोटे-मोठे अपघात होतच असतात माझ्या बाबतीत, त्यातलाच हा एक. Milkmaid चा पत्र्याचा डबा होता. त्यातलं उरलेला ऐवज बोटांनी पुसून घ्यायला(एक थेंब पण सोडत नाही आपण, संसारी ना 😋) आणि आतली sharp edge दोन बोटांच्या मध्ये घुसत हात चिरायला, एकच क्षण. लगेच नळाखाली धरला पण रक्त काही थांबेना. खूप आत घाव गेलेला. बेसिन मध्ये रक्त. मूर्खासारखं त्यावर बर्फ धरला आणि रक्त काळं पडायला लागल. बहिणीने गूगल करून पाहिलं तर बर्फ नाही लावायचा, हळद लावून घाव घट्ट धरायचा(opposite to gravitational force). मग बऱ्याच वेळाने थांबलं रक्त. bandage करून मग पुढची procedure केली 😬 तर हे condensed milk घातलेले खोबरं गॅस बंद करून कोमट झाल्यावर त...

आज रविवार. आज मस्त आराम करायचा..

Image
 आज रविवार. आज मस्त आराम करायचा.. ... असं शनिवारीच ठरवलं होतं. तो रविवारची पहाट उजाडलीच ती हवेत गारठा घेऊन. मस्त त्या दुलई तुन अंग बाहेर निघत नव्हतं. पण बहिणीला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे तिला सोडायला मला उठणं क्रमप्राप्त होतं. असो, तीला सोडून आल्यावर पुन्हा रजईत शिरायचं असं ठरवून बाहेर पडले. बाहेर जमीन ओली दिसली, अरे एवढं दव पडलंय?? मग लक्षात आलं, दवबिंदू नाही पावसाची रिपरिप आहे ती. 🤦 पण थंडी जशी हवी तशीच 🤗🌨️ घरी येताना वर्तमानपत्र घेऊन आले, नेहमी त्या tv/ मोबाईल वर बातम्या वाचून/पाहून कंटाळा आला होता.  गॅलरी समोर बसून, इत्यंभूत पेपर वाचत, हातातल्या ऊन ऊन चहाचा घोट रिचवत रविवार सकाळची सुरुवात झाली 😍 तासा - दीड तासाने बहिणीचा इच्छित स्थळी पोहोचल्याचा कॉल येईलच तेवढ्यात एक झोप काढून घेऊ म्हणून पुन्हा रजई गुंडाळून घेतली. पण म्हणतात ना, गाढवाला ओझं वाहायची एवढी सवय झालेली असते की एखाद्या दिवशी ओझं कमी झालेल असेल तरी त्याला त्रास होतो 😅 तशी परिस्थिती आहे माझी 😜 जरा स्वस्थ बसलं की कामांची लिस्ट डोळ्यांसमोर दिसायला लागते. घरातली कामं करायला रविवारच तर मिळतो. प...

जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर

Image
जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर Middle class किंवा upper middle class कथेच्या नायिकांभोवती रेंगाळणार्या कथा. पहिली कथा आवडली, नंतरची २-३ प्रकरणं वाचल्यावर वाटायला लागलं कथा अर्धवट सोडलेल्या का वाटतायेत?! तरीही पुढच्या कथा वाचत राहिले.. एक ध्यानात आलं खरं.. कथा अर्धवट नाही सोडल्या आहेत, तिथूनच तर खरी कथेला सुरू होणार आहे.. प्रत्येक कथेच्या शेवटाला तो धागा तसाच मोकळा सोडलाय, वाचकांसाठी, विचार करायला.. खरं पाहिलं तर हाच realistic approach नाही का?! नाहीतरी आपल्या आयुष्यातही आपली कथा चालतच तर आहे.. आपण जिवंत असेपर्यंत.. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तिपूरता तो धागा संपतो.. आपला धागा तर आयुष्यभर चालतच असतो..  मला या कथासंग्रह मधल्या ४ कथा खूप आवडला - ●मारियाची बहीण जेन ●नव्या कोऱ्या पांढऱ्या साडीचे एक टोक ●आई नावाची बाई ●मात कथांच्या शेवटचे twist एकदम जबरदस्त आहेत.  ~ सुप्रिया घुडे

1st Day for Office After Lockdown

Image
महिलांसाठी लोकल्स चालू झाल्या त्यामुळे आता ऑफिस ला जाणं क्रमप्राप्त होतंच. गेले आठ महिने पंचक्रोशी च्या बाहेरही न पडलेली मी सीमोल्लंघन करत ऑफिस ला पोहोचणार होती. कालच्या शुक्रवारी अगदी शाळेतला पहिला दिवस असल्यासारखी उत्सुकता. 👧 बाहेर अजूनही कोरोना प्रभाव कमी न झाल्याने स्वतःच्या शरीराची बांधाबांध करून आम्ही लोकल वर स्वार होण्यास तयार ⚔️  तशीही यापूर्वी सुद्धा घरातून बाहेर पडताना अशीच pack होऊन निघायचे म्हणा, आता फक्त त्यात hand gloves ची भर पडली 🤷 किर्ती एक आठवडा अगोदर पासून ऑफिस ला जायला लागून जुनी झाली होती, त्यामुळे माझी कौतुकं तिला याची डोळा पहावी लागत होती 🤦 नंदू सरांना लांबूनच पाय लागू करत, त्यांना follow करत, जबरदस्ती किर्ती कडून स्वतःचा निघताना एक फोटो काढून घेतला 🙆😋😜 station ला पोहोचल्यावर लक्षात आलं, आपणच घरात बसून होतो तर, सगळं जग बाहेर फिरतंय 😁 मग एकेका बायकांचे varieties of masks बघत, आपण बांधलेल्या scarf ची लाज वाटायला लागली, आणि अजूनही मी fashion जगतात खूपच मागासलेली असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली 😝😷👻 तरी नशीब किर्ती ने नवीन style चे मास्क घेऊन ठेवले होते म...

काळेपाणी ~ स्वातंत्र्यवीर सावरकर

Image
 काळेपाणी ~ स्वातंत्र्यवीर सावरकर 'मला काय त्याचे' अथवा 'मोपल्यांचे बंड' या पहिल्या कादंबरी नंतर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' हा आपल्या आत्मचरित्राचा भाग लिहिला होता. ह्या आत्मचरित्रात अंदमानात काळ्या पाण्यावर सश्रम कारावासाची भयानक शिक्षा भोगणार्या राजबंद्यांचे जीवन दिलेले आहे. औट घटकेचे टीचभर हिंदू राज्य ही संकल्पना 'माझी जन्मठेप' मध्ये आलेली आहे. ह्या पुस्तकाचे गुजराती भाषांतर झाल्यानंतर काही राजकारण्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे 'माझी जन्मठेप' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याप्रमाणे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 'माझी जन्मठेप' पुस्तकावर दि. १७ एप्रिल १९३४ ला बंदी घातली. म्हणून सावरकरांनी 'काळे पाणी' ही दुसरी कादंबरी लिहिली. यात त्यांनी अंदमानच्या बंदीगृहातील अत्यंत कष्टकारक, तापदायक, अमानुष गुंडगिरीचे जीवन कसे जगावे लागते होते, ते दर्शविले आहे. हे कथानक एका बंदिवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे. रफीउद्दीन, योगानंद, मालती आदि नावे काल्पनिक असली तरी त्या अभियोगांतील मूळच्या नावाशी   मिळतीजुळती च आहेत. सुप्रसिद्ध गायक...

Lockdown मधील पाककृती भाग ३

Image
 Lockdown मधील पाककृती भाग ३ 🍱 भाकरी आणि वांग्याचं भरीत आजची foodstory खास भाकरी साठी आहे 😉 lockdown मुळे कामाला बाई यायची बंद झाली त्यामुळे आमचं चपात्या / पोळ्या खायचं बंद झालं. त्यात आम्ही कोकणातली कायम भात खाणारी माणसं. करायला पण सोयीस्कर. पण डॉक्टरना आमचं ते सुख काही पाहवलं नाही 😁 भात बंद आणि पोळी/ भाकरी खायला सुरू करा म्हणे. झाली का पंचाईत. इथे चपात्या नाही बनवता येत मग भाकरी तर लांबची गोष्ट.  आता वेळ मिळतोच आहे तर थोडाफार जेवण बनवायला शिकूनच घेऊ म्हटलं. आधी चपात्या बघू, घडीच्या नाही फुलके तरी. एक आठवड्यात नाही म्हटलं तरी जम बसला. आणि गेले २-३ महिने मस्त पोळ्या बनायला लागल्या 🤗 या महिन्यात दळण घेताना विचार केला की multigrain पीठ वापरून पाहू. तसं आमच्या चक्की वाली ला सांगितलं, प्रमाण काय ते तुम्ही बघा. पीठ घरी आणलं खरं, पण चपात्या काही व्यवस्थित होईनात. काहीतरी गडबड झाली खरी. पोळी पेक्षा भाकरी च पीठ जास्त वाटतंय. कॉल केला तिला, नक्की कसलं पीठ दिलंत, प्रमाण काय. तर म्हणजे ज्वारी-बाजरी-नाचणी ९०% आणि गहू १०%. 🤦 अहो, मग हे भाकरी च पीठ नाही का झालं. आता काय बोलून उपयोग. चल...

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर

Image
 बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर विषयदृष्ट्या विचार करता; प्रेमभावना, सामाजिक परिस्थिती, व्यक्तिजिवन, कल्पकता प्रधान कथा, हलकी-फुलकी विनोदपर कथा असे विषय दृष्टीसमोर ठेवून या कथांचे संकलन केलेले दिसते. यातील प्रेमकथेतील नायिका या सामान्य घरातल्या, दुर्दैवी, दारिद्र्यात पिचणार्या, क्वचित अशिक्षित आहेत, परंतु त्यांच्या प्रेमाची जात उंच आहे.  कुसुमाग्रज यांनी अगदी हळुवारपणे प्रेमकथांचे भावकाव्यांशी असलेले ऋणानुबंध दर्शविले आहेत.  समाज जीवनातील परिवर्तनाचा व्यक्तिमनावर होणारा परिणाम दर्शवणारी, मनोविश्लेषण व वास्तव दर्शन यांचा मेळ साधून सामाजिक आशय प्रकट करणारी कथा, हा कुसुमाग्रज यांच्या कथांचा महत्वाचा भाग आहे.  एका ठराविक रिंगणात कथा फिरवत न ठेवता कुसुमाग्रजांनी यांत आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाजूनी विविधता व नावीन्य आणले आहे. कुसुमाग्रजांची ही व्यक्तिचित्रणे निष्ठा मानणारे आणि जपणारे असामान्य माणसे आहेत, आणि यांत पुरुष पात्रांपेक्षा स्त्री पात्रेच अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत, हे खास नमूद करावेसे वाटते.  काव्यमय भाषाशैली हे कुसुमाग्रजांचे सामर्थ्य आहे.  "स्त्रीत्व ...