तेरुओ आणि कांही दूरपर्यंत
गौरी देशपांडे च्या प्रत्येक कथेमध्ये प्रेमाचे निरनिराळे कंगोरे पाहायला मिळतात. तेरुओ आणि कांही दूरपर्यंत २. कांही दूरपर्यंत मृत्यू हेच एक अखेरचं सत्य. मरण जवळ येताना आयुष्याचे बांधलेले ठोकताळे. '...आयुष्याच्या शेवटीच स्वार्थत्याग फोल वाटतात, सुटलेल्या संध्या सोनेरी वाटतात आणि घडलेले मुर्खपणे महामुर्खपणे वाटतात...' ' कांही दूरपर्यंत' कथा आहे नात्यांची. नात्यातल्या आपलेपणाची. आपलेपणाने आपल्या जवळच्या व्यक्तीला होऊ घातलेल्या सुरक्षिततेच्या कवाचाची. कथा एकदा वाचली .. धागा मिळेना, का असं शीर्षक.. पुन्हा.. पुन्हा वाचली.. मग काहीतरी गवसलं खरं.. कथा संपताना विचारात येणारं अवघडलेपण, आदर्शस्थानाला गेलेला तडा, त्यामुळे विखुरलेले मनाचे तुकडे, सांडलेले तुकडे ओंजळीत गोळा करण्यासाठी केलेली धडपड कांही.. कांही दूरपर्यंत... १. तेरुओ.. नवरा - 'जनक' सोबत 'ती' जपान ला येते. तिथे कथा २ समांतर रेषेवर सरकते - 'जपान व संस्कृती' आणि 'जपानमध्ये भेटलेला तेरुओ'. जपान मधील थंडी, तिथल्या बार मधील वरिष्ठ 'ममासान', हि...