एकेक पान गळावया - गौरी देशपांडे
गौरी देशपांडे याचं लिखाण सहज, सोप्प अस नक्कीच नाहीये. ते पचनी पडायला वेळ लागतोच. 'एकेक पान गळावया' हे मी वाचायला घेतलेलं गौरी च पाहिलंच पुस्तक. पहिल्या प्रकरणातच गौरी ही लेखिका म्हणून काय असामी आहे याची खात्री पटली. प्रकरण १: कारावासातून पत्रे - निम्म्याहून अधिक गोष्ट वाचेपर्यंत सगळ 'डोक्यावरून'च जात होतं, हे मी प्रामाणिकपणे काबुल करेन. परंतु जेव्हा लेखाच्या शेवट ला पोहोचतो, तेव्हा नक्की 'कारावासातून पत्रे' हे शीर्षक का दिलंय याचा उलगडा होतो. प्रकरण २: मध्य लटपटीत - आयुष्यात नक्की काय हरवलंय याचा शोध घेता-घेता जेव्हा कथेच्या शेवटी आपणच आपल्याला गवसतो, तेव्हा मनात तरळत राहतो एक चिरंतन आनंद. प्रकरण ३: एकेक पान गळावया - आयुष्यातले बंध; म्हटले तर सोपे, म्हटले तर क्लिष्ट; तेही लेखिकेने इतक्या सहजतेने उलगडलेले आहेत. घरातल्या प्रत्येक सदस्याने वाचावी अशी ही कथा. आई-वडील-मुलं यांच्यातील भावनाबंध exact मांडले आहेत. ही कथा वाचताना लेखिका प्रत्येकाला त्या-त्या जागी उभं राहून विचार करायला लावते. तळ टीप: वाचकांनी 'कारावासातून पत्रे ' सर्वात शेवटी वाचण्यास घ्याव...
Comments
Post a Comment