खजूर - खोबऱ्याचे लाडू

🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄
...स्त्री चे सौंदर्य जसे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते, तसं तिचे सुगरणपण तिच्या हातापेक्षा खाणार्याच्या जिभेवर असतं, असं म्हणायला हरकत नाही. खाणारा जर कौतुक करून खाणारा असेल आणि चूक सुद्धा प्रेमाने पोटात घालणारा असेल, तर तिला उत्तमोत्तम करून खाऊ घालावेसे वाटेल. मग ती उपजत नसली, तरी प्रयत्नाने सुगरण होईल!...

- पुस्तक : घर - अंगण (खवैय्या पृ. क्र. २४) 
लेखिका : Deepali Patwadkar
🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄



खजूर - खोबऱ्याचे लाडू

१. १०० ग्रॅम किंवा २० ते २५ खजुराच्या बिया काढून खजूर एका कढईत मॅश करून घेणे.
२. ४ वाट्या सुके खोबरे किसून ठेवावे.
३. १ वाटीभर (आवडीनुसार प्रमाण ठरवावे) गूळ किसून घ्यावा.
४. कढईत २ चमचे गायीचे शुद्ध तूप गरम करून, मंद आचेवर खजुराचा गर गरम करावा, त्यात किसलेले सुके खोबरे थोडे थोडे मिक्स करत काविलत्याने ढवळत राहावे.
५. ड्रायफ्रूटस चे बारीक तुकडे (बदाम, काजू, बेदाणे, इतर.) मिश्रणात घालावे आणि पुन्हा ढवळत राहावे.
६. मिश्रण एकजीव झाले की कढई आचेवरून
काढून मिश्रण थंड होऊ द्यावे.
७. तयार मिश्रणाचे छोटे लाडू बनवून त्यावर दुधात भिजवून ठेवलेल्या काळ्या मनुका लावाव्यात.

लाडू तयार ✌

- सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर