१. चतुर लाली मांजर २. बकरीचं पिल्लू ३. कोकलू कोल्हा ४. बेडूक काका ५. सामसूम वाघ

लोककथेंवर आधारित असलेली बालचमुंसाठी, 
कविता महाजन यांच्याकडून ५ पुस्तकांची ही खास भेट.
१. चतुर लाली मांजर - चिनी लोककथेवर आधारित
२. बकरीचं पिल्लू - छत्तीसगढ मधील लोककथेवर आधारित
३. कोकलू कोल्हा - आफ्रिकेमधील लोककथेवर आधारित
४. बेडूक काका - व्हिएतनाम मधील लोककथेवर आधारित
५. सामसूम वाघ - आफ्रिकेमधील लोककथेवर आधारित

आजकाल मराठी वाचन करणारी लहान पिढी सापडणं थोडं कठीणच आहे. परंतु पालकांना या गोष्टी Bedtime Stories म्हणून आपल्या मुलांना वाचून दाखवता येतील.

प्रत्येक पुस्तकात त्या-त्या प्राण्यांची वैशिष्ट्य आणि वैविध्यपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, त्यामुळे मुलांसोबत पालकांच्या ही सामान्य ज्ञानात बरीच भर पडेल.

पुस्तकांच्या शेवटी; origami, मुखवटे, रेखा चित्रांची कृती सुद्धा दिलेली आहे. 

त्यामुळे लहान मुलांना gift देण्यासाठी उत्तम पुस्तकांचा संच आहे हा! 👍

- सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर