Posts

माया

Image
माया Compulsory bed rest म्हटल्यावर घरात काही काम करण्याचा प्रश्नच उरत नव्हता. मी स्वतः आता कुठे जेवण बनवायला शिकलेय, त्यामुळे किर्ती कडून चपात्या वगैरे बनवण्याची अपेक्षा करणं तर दूरची गोष्ट 🙊  आई-वडिलांनी केलेल्या लाडाचे दुष्परिणाम आता आम्हा दोघींना भोगावे लागणार आहेत, हे कळून आम्ही चुकलेलो होतो 😧 आता खरी शोधमोहीम सुरू होणार होती - mission कामवाली बाई 💃 शेजारीपाजारी, society committee members सगळ्यांना आधीच whatsapp messages धाडून मोकळी झाले होते - urgently in need of housemaid. 🙏 तरीही लवकरात लवकर घरी पोहोचणं गरजेचं होतं, नाही म्हटलं तरी दुसर्याच्या शोध मोहिमेवर किती अवलंबून राहणार. Discharge मिळताच काही दिवसात; मी सर काका, आत्ये, काकी, किर्ती, सुजल अशा सगळ्या लवाजम्या सकट घरी पोहोचले. बाई कशी शोधायची यावर आमच्यात बरीच खलबत सुरू झाली.  आत्ये आणि कीर्ती ने तर ठरवलं होतं, समोर येईल त्या स्त्री ला विचारायचं - "तुमच्याकडे बाई येते का कामाला??! " 😑 जवळच आदिवासी पाडे आहेत, तिथे जाऊन विचारून यायचं का असा पण विचार मांडला गेला. सुदैवाने दुसऱ...

तेरुओ आणि कांही दूरपर्यंत

Image
गौरी देशपांडे च्या प्रत्येक कथेमध्ये प्रेमाचे निरनिराळे कंगोरे पाहायला मिळतात.  तेरुओ  आणि कांही दूरपर्यंत २. कांही दूरपर्यंत मृत्यू हेच एक अखेरचं सत्य. मरण जवळ येताना आयुष्याचे बांधलेले ठोकताळे. '...आयुष्याच्या शेवटीच स्वार्थत्याग फोल वाटतात, सुटलेल्या संध्या सोनेरी वाटतात आणि घडलेले मुर्खपणे महामुर्खपणे वाटतात...' ' कांही दूरपर्यंत' कथा आहे नात्यांची. नात्यातल्या आपलेपणाची. आपलेपणाने आपल्या जवळच्या व्यक्तीला होऊ घातलेल्या सुरक्षिततेच्या कवाचाची. कथा  एकदा वाचली .. धागा मिळेना, का असं शीर्षक.. पुन्हा.. पुन्हा वाचली.. मग काहीतरी गवसलं खरं.. कथा संपताना विचारात येणारं अवघडलेपण, आदर्शस्थानाला गेलेला तडा, त्यामुळे विखुरलेले मनाचे तुकडे, सांडलेले तुकडे ओंजळीत गोळा करण्यासाठी केलेली धडपड कांही.. कांही दूरपर्यंत... १. तेरुओ.. नवरा - 'जनक'  सोबत 'ती' जपान ला येते. तिथे कथा २ समांतर रेषेवर सरकते - 'जपान व संस्कृती' आणि 'जपानमध्ये भेटलेला तेरुओ'. जपान मधील थंडी, तिथल्या बार मधील वरिष्ठ 'ममासान', हि...

नक्षत्रांची फुले

Image
नक्षत्रांची फुले आकाश आणि प्रकाशाच्या गोष्टी लेखिका : दीपाली पाटवदकर आकाशदर्शन इतक्या सहज सोप्या भाषेत कोणीच समजावलं नसेल. लेखिकेची विषय समजावण्याची सहज पद्धत चित्र ज्ञानेश्वरी च्या वेळीच लक्षात आली होती. परंतु आकाशदर्शन सारखा गहन विषय day to day life मधील examples शी निगडित असू शकतो हे 'नक्षत्रांची फुले' वाचून च लक्षात येत. मुखपृष्ठावरील स्वतः भोवती असंख्य तारका लपेटून स्वतः मध्येच मग्न होऊन नाचणारी आकाशगंगा पाहून, 'बदन पे सितारे लपेटे हुए' गाण्याची आठवण होते (किंबहुना हे गाणं ऐकलं तर मला लेखिकेच्या आकाशगंगेची आठवण होईल यापुढे नेहमी...). लेखिकेने २७ निरनिराळ्या उदाहरणातून आकाशाशी निगडित माहिती समजावलेली आहे. त्यातल्या मला जास्त आवडलेल्या कथा - चंद्रा तुझी कोर कशी, समुद्र मंथन, उत्तर आकाश, हर हर गंगे (गंगा आणि आकाशगंगा यांची घातलेली सांगड तर उत्तम), हृदयी हरी नांदतो, आशिर्वाद(टिळकांच्या संदर्भात असल्यामुळे असेल कदाचित 😊). आई मुळे मला आकाश निरीक्षणाची आवड लागलेली होती, आता या पुस्तकामुळे अजून गोष्टी clear झाल्या आहेत. आई नाहीये आता, तीला हे पुस्तक व...

भरलेल्या मिरच्या

Image
ओलं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट भरलेल्या मिरच्या It happens, when you are a Kokani but try to follow Marathwada Receipe from the internet 😝 So I finally settled with my own Receipe ✌😎 सारण : ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, बेसन पीठ, हळद, गरम मसाला, हिंग, जिरं, ओवा, धणे, मीठ - सुप्रिया घुडे

१. चतुर लाली मांजर २. बकरीचं पिल्लू ३. कोकलू कोल्हा ४. बेडूक काका ५. सामसूम वाघ

Image
लोककथेंवर आधारित असलेली बालचमुंसाठी,  कविता महाजन यांच्याकडून ५ पुस्तकांची ही खास भेट. १. चतुर लाली मांजर - चिनी लोककथेवर आधारित २. बकरीचं पिल्लू - छत्तीसगढ मधील लोककथेवर आधारित ३. कोकलू कोल्हा - आफ्रिकेमधील लोककथेवर आधारित ४. बेडूक काका - व्हिएतनाम मधील लोककथेवर आधारित ५. सामसूम वाघ - आफ्रिकेमधील लोककथेवर आधारित आजकाल मराठी वाचन करणारी लहान पिढी सापडणं थोडं कठीणच आहे. परंतु पालकांना या गोष्टी Bedtime Stories म्हणून आपल्या मुलांना वाचून दाखवता येतील. प्रत्येक पुस्तकात त्या-त्या प्राण्यांची वैशिष्ट्य आणि वैविध्यपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, त्यामुळे मुलांसोबत पालकांच्या ही सामान्य ज्ञानात बरीच भर पडेल. पुस्तकांच्या शेवटी; origami, मुखवटे, रेखा चित्रांची कृती सुद्धा दिलेली आहे.  त्यामुळे लहान मुलांना gift देण्यासाठी उत्तम पुस्तकांचा संच आहे हा! 👍 - सुप्रिया घुडे

खजूर - खोबऱ्याचे लाडू

Image
🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄 ...स्त्री चे सौंदर्य जसे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते, तसं तिचे सुगरणपण तिच्या हातापेक्षा खाणार्याच्या जिभेवर असतं, असं म्हणायला हरकत नाही. खाणारा जर कौतुक करून खाणारा असेल आणि चूक सुद्धा प्रेमाने पोटात घालणारा असेल, तर तिला उत्तमोत्तम करून खाऊ घालावेसे वाटेल. मग ती उपजत नसली, तरी प्रयत्नाने सुगरण होईल!... - पुस्तक : घर - अंगण (खवैय्या पृ. क्र. २४)  लेखिका : Deepali Patwadkar 🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄 खजूर - खोबऱ्याचे लाडू १. १०० ग्रॅम किंवा २० ते २५ खजुराच्या बिया काढून खजूर एका कढईत मॅश करून घेणे. २. ४ वाट्या सुके खोबरे किसून ठेवावे. ३. १ वाटीभर (आवडीनुसार प्रमाण ठरवावे) गूळ किसून घ्यावा. ४. कढईत २ चमचे गायीचे शुद्ध तूप गरम करून, मंद आचेवर खजुराचा गर गरम करावा, त्यात किसलेले सुके खोबरे थोडे थोडे मिक्स करत काविलत्याने ढवळत राहावे. ५. ड्रायफ्रूटस चे बारीक तुकडे (बदाम, काजू, बेदाणे, इतर.) मिश्रणात घालावे आणि पुन्हा ढवळत राहावे. ६. मिश्रण एकजीव झाले की कढई आचेवरून काढून मिश्रण थंड होऊ द्यावे. ७. तयार मिश्रणाचे छोटे लाडू बनवून त्यावर द...

नामशेष

खरंच देव आहे?? कदाचित देव सुद्धा नामशेष झालाय कधीच,.. dinosaurs सारखा.. Dinosaurs नामशेष होण्यास बरीच कारणं होती, उल्कापात, हिमयुग वगैरे.. देवाला नामशेष तर माणसानेच केलं आहे.. - सुप्रिया घुडे १४-एप्रिल-२०१८