बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ४
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
भाग २ https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html
भाग ३ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html
भाग ३ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html
बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ४
(क्रमशः)
१४-डिसेंबर-२०२२
बंगळुरूतील आगमन :
Finally मी आणि किर्ती सकाळी ६ वाजता KSR Bangalore ला पोहोचलो.
इथे पोहोचताच अंदाज आला की हे बंगळुरू च main रेल्वे स्टेशन आहे. यालाच Bangalore City Junction ही म्हणतात. (https://g.co/kgs/kamUqk)
तशी बंगळुरू मध्ये अजून २ स्टेशन आहेत -
KSR आणि Cantonment एकाच line वर आहेत तर यशवंतपुर थोडं सिटी पासून लांब आहे.
माझं एक observation की main city मधून येणाऱ्या trains (like Mumbai) या KSR ला येतात आणि इतर stations हुन येणाऱ्या trains यशवंतपुर ला येतात.
तर...
मुंबई हुन पहिला लॉट बंगळुरू ला पोहोचला होता. रत्नागिरी - कुडाळ मिलाप तिथे already आदल्या दिवशी झाला होता. आता मुंबई-रत्नागिरी-कुडाळ मिलाप दुपारी व्हायचा होता 😀
तोपर्यंत मला आणि किर्ती ला lodge शोधून, फ्रेश होऊन, दिवसभर बंगळुरू सिटी टूर साठी गाडी शोधायची होती.
KSR बंगळुरू स्टेशन ला उतरल्यावर प्लॅटफॉर्म १ वरून बाहेर पडलं की Southern Bhavan (https://g.co/kgs/fy3Nm2) म्हणून एक restaurant आहे.
आम्ही दोघीनी बॅग्स बाजूला ठेवून आधी इथे "कापी" घ्यायचा विचार केला 😁☕
तुम्ही इथे रीतसर काउंटर समोर queue मध्ये उभं राहून payment करूनही कूपन घेऊ शकता किंवा स्क्रीन वर मेनू select करून (self service) gpay करूनही कूपन मिळतं.
बाजूला उभ्या असलेल्या माणसाच्या समोर मस्त वाफळती इडली दिसली. भूक लागलेली होती. यहीपे हमारा इमान डगमगल्या 😆 आणि आम्ही सुद्धा कापी सोबत इडली खाऊन बंगळुरू च्या ट्रिप ची साग्रसंगीत सुरुवात केली 😋
उदरभरण झाल्यावर आता श्री विजया palace lodge ला जायचं होतं. Google location handy ठेवलं. १-२ रिक्षावाले समोर आले, १००-२०० होतील सांगायला लागले. तेवढ्यात कोणीतरी बोलताना ऐकलं - Prepaid Auto. बस्स आता हे prepaid auto कुठे आहे तेच शोधायचं होतं. किर्ती चा लक्ष गेला तिथे एका ठिकाणी prepaid auto असं लिहिलेलं होतं.
ही prepaid auto system खरंच छान आहे. संपूर्ण देशभरात implement करायला हवी, रिक्षावाल्यांची मुजोरी कमी होईल.
₹६०/- च कूपन काढलं, कूपन चे ₹२/- काउंटर ला द्यायचे आणि रिक्षावल्यानी इच्छित स्थळी पोहोचवलं की त्याला ₹६०/ द्यायचे होते.
रिक्षात बसल्यावर गूगल मॅप on केला. पत्ता सांगितला - अभिनय थिएटर जवळ. परंतु lodge आतल्या गल्लीत होतं, आणि गूगल मातेने आम्हाला भरकटवल. थोडं पुढे गेलो. रिक्षा वाल्याला lodge माहिती नव्हतं, आणि माहिती असलं तरी त्याने सांगितलं नसेल, परप्रांतीय आहेत हे आमच्या भाषेवरून / हेलवरून त्याला कळलं असेलच. रिक्षा परत फिरवायला सांगितली आणि एका ठिकाणी सोडायला सांगितलं, तिथून विचारत चालत जाऊ असा विचार केला. रिक्षा फिरवल्याने त्याने ₹२०/- extra घेतले. आणि इथपासून च बंगळूरु च्या रिक्षावाल्यांचे खरे रंग आम्हाला दिसायला लागले.
Actually आम्ही correct जागी उतरलो होतो, बस्स बाजूच्या गल्लीतून आतमध्ये जायचं होतं. गल्लीच्या तोंडावर एकमेव चहावाला उभा होता, बाकी सगळी गल्ली सुनसान. दुकानं सकाळचे ७ वाजले तरी साखरझोपेतच होते.
मुंबई ची प्रकर्षाने आठवण यायला लागली, आमची मुंबई कशी नेहमी चालू असते. निदान रस्त्यावर माणसं तरी काही विचारावं म्हंटल तर असतात.... झालं.... पाऊल ठेवलं नाही इथे आणि comparison चालू झाल होतं 😐 त्या चहा वाल्याला lodge च नाव सांगितलं तसा तो लगेच उच्चारला - "अम्मा, ये विजया palace इधरही हैं, यहासे जावो"
अम्मा..... 🤩
एवढं ऐकून south ला आल्याचा फील आला. 😊
लगेच मी किर्ती ला हाक मारली, जिला बॅग घेऊन एका ठिकाणी उभं केलं होतं - "अम्मा, इधर आओ" 🤩
श्री विजया palace Lodge:
Check In 12pm च होतं, परंतु आम्ही लवकर पोहोचणार आहोत हे आधी कॉल करून त्यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे extra charge लावून त्यांनी एक रूम रिकामी करून दिली. अंघोळीसाठी गरम पाण्याची वेळ सकाळी ०७.३० ते १०. आमचा दुसरा लॉट १ वाजता पोहोचेल तेव्हा परत एकदा गरम पाण्याची व्यवस्था करण्याची आम्ही त्यांना विनंती केली, आणि त्यांनी ती मान्यही केली 😊
Entrance च्या जवळ शेगडी / भांडी दिसत होती. म्हणजे सर काकांच्या पिण्याच्या गरम पाण्याची ही सोय होणार होती.
👍 रूम / वॉशरूम स्वच्छ होते, अगदी सोलापूर / अक्कलकोट ला अनुभव आले तसे नव्हते. स्वछता बघून जीव भांड्यात पडला नाहीतर आत्येने या lodge मालकांना सुद्धा धारेवर धरलं असतं, गोदावरी lodge ला केलेलं तसं 😆 आणि आता तर हिंदी मध्ये वार्तालाप... मग काय मज्जाच 😂
पण उगाच का, आता आत्ये आमच्यापेक्षाही चांगलं हिंदी बोलते 😎
२४ तासांच्या धावपळीने क्षीणलेला जीव, रूम ताब्यात आल्यावर फ्रेश झाला.
माझी मैत्रीण आणि ex-colleague श्रुती बंगळूर ला शिफ्ट झाली आहे. तिला message केला, मी उतरले lodge वर, तसा तिचा लगेच कॉल आला 🤩
मग तिने इथे फिरायला सुरू करण्या आधी म्हणून बरेचसे suggestions दिले. Weekday ला मी तिथे गेले होते म्हणून, अन्यथा दोघी नक्कीच प्रत्यक्ष भेटलो असतो. आम्ही फिरायला आलो असल्याने पायाला चाकं लावून फिरत होतो, त्यामुळे तिला भेटणं शक्य नव्हतं म्हणा.
परंतु तिने दिलेल्या suggestions चा ट्रिप दरम्यान खूपच उपयोग झाला.
Chikpet:
फ्रेश होऊन तयार होऊन किर्ती आणि मी lodge बाहेर आलो, थोडा हा भाग explore करू चालत असा विचार केला.
०८.३०am झाले तरी दुकानं उघडली नव्हती. चहा नाश्ता करून घेऊ म्हणून कुठे रेस्टॉरंट दिसतंय का हे सुद्धा बघत होतोच.
श्रुती बोललीच होती - Chikpet ला lodge मिळालाय तुम्हाला, अगदी prime location आहे shopping साठी. तो एरिया बघून लक्षात आलं एव्हाना, पुण्यातल्या पेठा कश्या तसं हे चिकपेट, बेलपेट आणि अजूनही कसले कसले पेट .. 👛👜👝🛍️🎒
पुढे चालत गेल्यावर chikpet च मेट्रो स्टेशन आलं.
तिथे मेट्रोचा मॅप बघत होतो तर तिथला security guard बोलायला आला. ती वेगळी गोष्ट की आम्हाला एकमेकांचं हिंदी अजिबात समजत नव्हतं 😋.
त्या मेट्रो मॅप वर Mysuru Road स्टेशन दिसलं.
Security ला विचारलं हे स्टेशन म्हैसूरू मध्ये आहे काय, तो त्याच्या अगम्य हिंदीत काहीतरी बोलला, आम्ही 'हो' असं समजून घेतलं. उद्या आम्हाला म्हैसूरू साठी प्रयाण करायचं च होत, जर मेट्रो ने जाता येत असेल तर सोनेपे सुहागा 🤩 आपल्या lodge पासूनही हे मेट्रो स्टेशन जवळ आहे म्हणजे बॅग्स जास्त ठिकाणी नाचवायला नाही लागणार. आधीच मी या chikpet सारख्या prime लोकेशन वर lodge मिळाल्याच्या खुशीत होते, त्यात म्हैसूरू जायची सोय जवळ च झाली म्हटल्यावर मी खुश होऊन लगेच काकांना कॉल केला - "काका, जबरदस्त लोकेशन वर lodge बुकिंग केलंय तुम्ही" 🥳 ती मंडळीट्रेन मध्येच होती, अजून इथे पोहोचायला२-३ तास होते.
त्याच security ला ब्रेकफास्ट कुठे मिळेल विचारलं. त्याच्या बर्याचश्या कन्नड मिश्रित हिंदी शब्दांमधून २ शब्द पकडता आले मला - राघवेंद्र प्रसन्न 🍱
एका ठिकाणी मिळालं हे राघवेंद्र प्रसन्न. अरे, येताना तर दिसलं नाही हे. कदाचित सगळी दुकानं बंद होती तेव्हा, म्हणून कळलं नसेल. अर्धा तासच झाला असेल आम्हाला मागे फिरून, तेवढ्या वेळात राघवेंद्र प्रसन्न तुडुंब भरून गेलं होतं. इथे आम्ही चहा आणि इडली / मेदू वडा ओर्डर केले. एव्हाना कळून चुकलं होतं, पुढचे काही दिवस आता इडल्याच हाणायच्या आहेत 😕🙃
खाल्लं आहे तर शतपावली म्हणून दुसऱ्या दिशेला चालत येऊ म्हटलं. इथे bike rider आणि pillion rider दोघांनाही हेल्मेट सक्ती असल्याचं दिसलं.
वाटेत अभिनय थिएटर लागलं, हेच ते ऍड्रेस वर दिलं होतं. Chikpet चौक पर्यंत चालत आलो. मेट्रो स्टेशन पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स ची दुकानं होती आणि या विरुध्द दिशेला कपड्यांची. इथलं एक मोठं दुकान शॉपिंग साठी हेरून ठेवलं - Pothy.
चला संध्याकाळी फिरून परत आलो की शॉपिंग साठी जास्त लांब नाही जावं लागणार याची खात्री झाली 😛
परंतु या एवढ्या एरिया मध्ये एकही मेडिकल स्टोर दिसलं नाही. एवढ्या मोठ्या चिकपेटीत गूगल वर २ च मेडिकल दिसली, त्यातल्या एकात आम्हाला हवी ती औषध ही नव्हती. बंगळुरू ला येऊन बऱ्याच बाबतीत आमचा हिरमोड झाला होता त्यातलं हे एक होतं 😔
कुडाळ-रत्नागिरी-मुंबई मिलाप :
दुपारी कुडाळ-रत्नागिरी चा लॉट यशवंतपुर ला उतरला. यशवंतपुर ला प्रीपेड auto ची facility असूनही वापरात नव्हती त्यामुळे या चौघांना २ रिक्षा करून ₹६००/- मोजून चिकपेट ला यावं लागलं. आमच्यासारखा गोंधळ नको उडायला म्हणून मी आधीच गल्लीच्या तोंडावर येऊन थांबले होते.
Lodge वाल्याने विनंतीवरून पिण्याचं आणि अंघोळीच गरम पाणी उपलब्ध करून दिलं. 😇
परंतु हाय रे कर्मा, सर काका भयंकर सर्दी घेऊन आले होते. सांगितलं का नाही आधी. आधी माहिती असतं तर ही ट्रिप च कॅन्सल केली असती. ☹️ म्हणूनच त्यांनी सांगितलं नाही म्हणा 😓 आम्ही त्यांना काही आयुर्वेदिक औषधांचे दिवसाला ३ डोस घ्यायला लावले, मग कुठे रात्रीपर्यंत त्यांची सर्दी आटोक्यात आली 🙌
सगळे फ्रेश होऊन स्थिरस्थावर झाल्यावर, कुठे कुठे कसं फिरायचं यावर चर्चा झाली. 'Mysuru Road मेट्रो स्टेशन' बद्दल पुन्हा बोलणं झालं. या स्टेशन पासून आपलं म्हैसूरू च lodge किती लांब आहे ते पाहणं महत्वाचं होतं. गूगल मॅप वर distance अडीच तासांच दाखवायला लागलं 😮 काहीतरी गडबड आहे. आम्ही म्हैसूरू च्या गार्डन सिटी lodge च्या मालकांना कॉल लावला आणि ही शंका बोलून दाखवली. त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली - 'Mysuru Road मेट्रो स्टेशन' हे बंगळुरू हुन म्हैसूरू ला येणाऱ्या रोड वर आहे, म्हैसूरू मध्ये नाही. अरे देवा मग यायचं कसं. श्रुती ने suggest केल्याप्रमाणे मॅजेस्टिक डेपो मधून बस पकडायची, बऱ्याच बसेस असतात म्हैसूरू ला जायला, रोड ट्रिप वरचं निसर्गसौंदर्य पाहायला छान आहे. गार्डन सिटी चे मालक बोलले ट्रेन ने या, दर अर्ध्या तासाने ट्रेन्स आहेत. असो, थोडक्यात मेट्रो ने तर जायचं नव्हतं. आज बंगलोर जमेल तेवढं फिरू उद्या बघू कसं जायचं म्हैसूरू ला ते, बस की ट्रेन ने .
Lunch :
दुपारचे २ वाजून गेले होते, अर्धा दिवस तर असाच गेला होता. श्रुती ने meal साठी MTR किंवा विद्यार्थी भवन suggest केलं होतं. कर्नाटक मधल्या authentic meal साठी इथे भेट द्याच असं ती बोलली होती. MTR अर्थात Mavalli Tiffin Rooms च्या बऱ्याचशा शाखा बंगळुरू ला आहेत (http://www.mavallitiffinrooms.com/about).
चिकपेट पासून जवळ गांधीनगर ची MTR (https://g.co/kgs/mEuUHz) शाखा गूगल वर मिळाली आणि आम्ही ऑटो करून तिथे पोहोचलो. तिथलं Special Mini Meal आम्ही try केलं. पोट आणि आत्मा तृप्त झाला 😇 इडली - डोसा सोडून दुसरं काहीतरी खाल्लं याचं जास्त समाधान होतं 🤪
Tipu's Summer Palace :
Vlog आमच्या नजरेतून : https://youtu.be/0GWc_17R8Cc)
श्रुती ला सकाळीच विचारलं होतं कोणी सिटी टूर करून देणारी agency वगैरे आहे का ओळखीची तर तिने सांगितलं की ती फॅमिली सोबत जाते तेव्हा ते Ola Rental ने फिरतात शक्यतो. चलो हा सुद्धा ऑपशन छान आहे. आम्ही MTR मधून जेवून बाहेर पडलो ४pm ला. ८ वाजेपर्यंत तरी फिरू असा विचार करून ४ तासांसाठी ओला रेंटल बुक केली. आम्ही ६ जण होतो म्हणजे आम्हाला SUV ची गरज होती.
एकाने ACCPET करून कॅन्सल केली. हा प्रॉब्लेम समस्त ओला उबेर वाल्यांचा आहे 😠 मग तुम्ही मुंबई मध्ये असा की बंगळुरू मध्ये 😏
दुसर्याने accept केली परंतु त्याची छोटी कार होती, त्यात आम्ही 6 जण बसलो नसतो. एकतर SUV ऑपशन आम्ही select केलेला असताना त्याने का का ride accept केली हा प्रश्न आम्हाला पडला होता 🤔 त्यात आम्ही ६ जण समोर दिसत असूनही तो कन्नड भाषेत आम्हाला बसा सांगत होता. मान्य, त्याला हिंदी कळत नव्हत, पण समोर माणसं तर दिसत होती. त्याला आम्हीच म्हटलं जा बाबा तू 🙏
तिसऱ्या प्रयत्नात SUV मिळाली. पण त्या ड्राइवर ने एक चालुगिरी केली म्हणे app वरून कॅन्सल करतो, तुम्ही मला एवढेच पैसे द्या मी तुम्हाला फिरवतो हवं तिथे. परंतु आमची एक चुकी झाली. म्हणजे आम्ही सुद्धा तेवढा विचार नाही केला की आताच ४ वाजले आहेत, एक palace बघण्यात २ तास सहज जातील. ८ वाजेपर्यंत काय बघायला मिळणार होतं देव जाणो.
एकदाची गाडी मिळाली म्हणून आम्ही बसलो आणि आधी Tipu's Summer Palace (Location Link : https://g.co/kgs/7y6w8u) ला पोहोचलो. Well maintained archeological reserved place आहे. प्रवेश फी ₹२०/- आहे.
आमच्यात ३ डोकी ५५+ age ची आहेत त्यामुळे चालत फिरताना थोडे restrictions येतात. तसेही आम्ही बाकी below ४० असलो तरी मोठे तीर मारतो असं काही नाही 🤪🤣
तरी १- दीड तासांत समर पॅलेस बघून काढला आणि बंगळुरू palace बघावा म्हणून लगेच गाडीत बसलो.
या ड्राइवर ला सुद्धा आम्ही विचारून घेतलं म्हैसूरू ला कसं जाणं सोयीस्कर ठरेल. याने तर सांगितलं की ट्रेन ने ५ तास लागतील, क्रॉससिंग असतं म्हणून. आणि बस ने सुद्धा ५ तास लागतील, रस्त्याची कामं आहेत म्हणून. 🤔
अरे पण ट्रेन अडीच तासात पोहोचेल अशी timings दिसतायेत IRCTC वर? 🤔 पण तो आपलाच मुद्दा रेटवत होता 😒 आम्हाला का कुणास ठाऊक त्याच्यावर doubt आला, कदाचित त्याची अपेक्षा होती की याची गाडी करूनच आम्ही म्हैसूरू ला जावं. आम्ही विषय तिथेच संपवला 🤐
बंगळुरू palace ला पोचलो आणि तिथल्या security ने gate वरच अडवलं. म्हणे बंद झाला पॅलेस उद्या या. आज हे एक ठिकाण बघून झालं असतं तर उद्या म्हैसूरू ला जाण्या आधी बंगळुरू मधलं दुसरं एखादं ठिकाण बघता आलं असतं असा आमचा मानस होता. पण तो security काही केल्या आम्हाला आत सोडेना. झालं आता काय. ड्राइवर ला म्हटलं आम्ही येऊ उद्या इथे आता दुसरं ठिकाण बघू, तर हा महाभाग म्हणतो आता सगळं बंद झालं असणार. 😯 अरे मग मगाशी गाडी ठरवतानाच हे बोलायचं ना 😡 आमचीच चुकी झाली होती, वेळ कमी आहे हे बघून आम्हीच Rental ठरवायला नको होती. ₹१७००/- देऊन आम्ही फक्त टिपू च समर पॅलेस च बघून आलो होतो. Rental पेक्षा one way trip किंवा 2 auto करून गेलो असतो तरी स्वस्त पडलं असतं. असो, वाईट अनुभवातून शिकायला मिळतं असं बोलायचं, द्राक्ष कितीही आंबट असली तरीही 🦊🍇 😄
Shopping :
Driver ला आम्ही चिकपेट चौकात सोडायला सांगितलं. बंगळुरू पॅलेस पाहायला मिळाला नव्हता म्हणून हिरमोड झाला होता, असो उद्या बघू. आता त्यावर उतारा म्हणून शॉपिंग करून घेऊ 😜 काकांना सर्दीचा त्रास होतोय म्हटल्यावर त्यांना आम्ही lodge वर जाऊन आराम करायला सांगितलं. तसंही त्यांना काही शॉपिंग मध्ये इंटरेस्ट नव्हताच 😄 मग आम्ही ५ बायका आमच्या मिशन वर निघालो 😎🛍️ आधी मी, किर्ती, सुजल ने Black Current Softy खाल्ली. सॉरी icecream चा सीजन नसतो 🤪🍦
मग Pothy (https://g.co/kgs/zK2u8h) मध्ये शिरलो. मस्त काचेचं मोठं दुकान आणि महत्वाचं म्हणजे DISCOUNT Sale शब्द दिसले बाहेर. 🤩 Discount हा शब्द समस्त स्रीजातीसाठी किती आपुलकीचा आहे हे मी वेगळं सांगायला नको.
Santacruz च्या Seasons (https://g.co/kgs/NRBYn5) च्या बाहेर ऑगस्ट मधल्या discount sale मध्ये काय मोठी line असते ती फक्त बघत राहावी 🤣
तर... Pothy मध्ये साडी च्या प्रत्येक variety चे वेगवेगळे counter होते. अगदी साध्यातल्या साड्यांपासून महागातल्या साड्यांपर्यंत सगळे प्रकार. त्या साध्या साड्या सुद्धा मला इतक्या आवडल्या होत्या, ऑफिस ला रोज जर मला साडी नेसावी लागली असती तर यातल्याच साड्या घेऊन गेले असते असं वाटायला लागलं. Ready-made blouse ची सुद्धा छान variety आहे. हे blouse मुंबई ला मिळतात त्याच rate ने होते. मी आणि किर्ती ची साड्यांची खरेदी "चांगलीच" झाली. 😝 एवढी चांगली की मला Pothy कडून Lifetime Membership Card मिळालं 💳 😂 आता ते कार्ड वापरण्यासाठी बंगळुरू ला जावं लागेल ही गोष्ट वेगळी 😁
रूम वर येऊन श्रुती आणि माझी अजून एक मैत्रीण तसंच ex-colleague अश्विनी, दोघीना शॉपिंग चे फोटो पाठवले 😀 शेवटी बायकांनाच याचं कौतुक 😆
तेव्हा मला अश्विनी कडून कळलं की Pothy हे बंगळुरू मधलं famous outlet आहे, आमचा अजून एक सहकर्मचारी Saravanan तो इथलाच, त्याने तिला सांगितलं होतं या पोथी बदद्दल.
अरे वाह, म्हणजे अनायासे आमची शॉपिंग इथल्या एका famous outlet मधून झाली होती तर 😎💃
बंगळुरू मधले रेस्टॉरंट :
दुपारचं MTR च जेवण तसंही जास्त झालं होतं. रात्री काहीतरी हलकं खाता येईल का तो आम्ही विचार करत होतो. शॉपिंग संपवून रूम वर बॅग्स टाकेपर्यंत संध्याकाळचे ०७.३० वाजून गेले होते. मी, किर्ती आणि सुजल ने ठरवलं पुन्हा राघवेंद्र मध्येच जाऊ. इथली दुकानं उशिरा उघडतात हे सकाळी अनुभवलं होतं, तशीच रात्री लवकर बंद झाली तर बोंबला. आम्ही झपाझप पावलं टाकत राघवेंद्र ला पोहोचलो, ०७.४५pm झाले होते आणि त्यांनी restaurant बंद केलं होतं 😨 अरे मेट्रो सिटी ना ही, आणि इतक्या लवकर कसले हॉटेल बंद करता 😰 आमच्यासारख्या लोकांना भूक लागली तर आम्ही काय करायचं 😱 आमची रत्नागिरी परवडली, छोटी सिटी असेल पण रात्रीच भुकेल्या जीवांना जेवायला तरी मिळेल 😦
आता काय?? Street food??.. 😦 अनोळखी ठिकाणी Street food खायचं म्हणजे अजून भीती वाटते 😵
एका दुकानात खूप गर्दी दिसली. डोसे, उत्तपे होते. आता काय दुसरा ऑपशन नव्हता. आम्ही तिघी आशाळभूत नजरेने त्या दुकानासमोर उभ्या होतो. म्हणजे इथे खायचं की नाही अशी चलबिचल. काउंटर वरच्या माणसाने खूप वेळ बघितलं आणि शेवटी विचारलंच काहीतरी कन्नड मध्ये. Try करायचं म्हणून आम्ही २ प्लेट सेट डोसे मागवले, कारण बरचसं पब्लिक तेच खात होतं. जर चांगलं वाटलंच तर अजून २ प्लेट रूम वर काका, आत्ये आणि काकी साठी घेऊन जाणार होतो.
एका प्लेट मध्ये ३ डोसे येतात. काय चव त्याची.. अहाहा 🥰 त्यावर सोडलेल्या तुपाच्या धारेची चव अजूनही जिभेवर आहे 🤤 कितीही खाल्लं तरी कमीच वाटत होतं.
मगाशीच आम्ही बोलत होतो की दुपारच्या जेवणाने पोट भरलं, आता जास्त खायचं नाही. पण या सेट डोस्यांवर आम्ही जो काही ताव मारला होता. कुठून भूक उत्पन्न झाली होती काय माहिती. कदाचित राघवेंद्र बंद बघून अवसान गळल होतं आणि भूक लागली असेल 😆😅
पार्सल घेऊन निघालो तर मध्येच पाणी पुरीचं दुकान लागलं. आणि आम्ही तिघीही मंतरल्यासारखे त्या दुकानासमोर थांबलो 🤣😂 अरे भूक नव्हती ना??!! 😂 पण असंच.... खायचं आहे 😆
एकच प्लेट पाणी पुरी घेतली. त्याने त्या प्लेट मध्येच एकत्रच पुऱ्या सजवून दिल्या, side ला कांदा-सलाड सारखं काहीतरी आणि आमचा परत हिरमोड झाला, हा काय प्रकार पाणी पुरी वाढायचा 🤔 चव तर इतकी बेक्कार 😖 कानाला खडा परत कधी कर्नाटकात येऊन पाणी पुरी नाही खायची 🥴
असं पहिल्याच दिवशी, आमचे बऱ्याच बाबतीत हिरमोड झाले होते - ऑटो/ओला वाले, न मिळणारे मेडिकल शॉप्स, , रेस्टॉरंट timings आणि कहर म्हणजे ही पाणी पुरी.. 😭
आज तर ट्रिप चा पहिला दिवस 🥺, एवढा मोठा का वाटतोय....
उद्याच प्लांनिंग :
रूम वर येऊन पुन्हा 'उद्याच प्लांनिंग' यावर पुन्हा गहन चर्चा सुरू झाली. किर्ती, सुजल आणि मी म्हैसूरू ला एवढ्या बॅग्स उचलून कसं जायचं याच टेन्शन मध्ये होतो. सर्वात मोठी तर सुजल ची बॅग. कशी ती रत्नागिरी हुन घेऊन इथवर आली देव जाणो 😱 त्यात आज च्या शॉपिंग बॅग्स वाढल्या. ओला चे rate चेक केले किती होतील. जवळपास ₹४०००. 😨 त्यापेक्षा ट्रेन किंवा बस नेच जाऊ असा विचार केला.
उद्या सकाळी लवकर उठून बंगळुरू पॅलेस पाहायचा होता, तो security बोलला होता १०.३०am ला ओपन होईल. मग त्या आधी लवकर काही ओपन होणारं असेल तर ते बघून घेऊ. म्हणून ठरलं इस्कॉन मंदिर. मंदिरं सहसा लवकर उघडतात. ठरलं तर मग आधी इस्कॉन मग बंगळुरू पॅलेस.
(क्रमशः)
~ सुप्रिया घुडे
यापुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
Comments
Post a Comment