बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ३

याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

भाग १ 
https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ३

(क्रमशः)

शेवटी तो दिवस उगवला : १३-डिसेंबर-२०२२ 🌄 
मी आणि किर्ती मुंबई - बंगळुरू डायरेक्ट ट्रेन मध्ये बसणार होतो.
काकी आणि सुजल रत्नागिरी ला बसून, कुडाळ ला सर काका आणि आत्ये तीच ट्रेन पकडून मडगाव ला उतरायचे होते. मग ते चौघंही मडगाव हुन दुसरी ट्रेन पकडून बंगळुरू पर्यंत येणार होते. 

सीन १ : 
11301 / UDYAN EXPRESS
मुंबई CSMT (१३ डिसेंबर २०२२ सकाळी ०८:१० वाजता) 
ते 
KSR बंगळुरू (१४ डिसेंबर २०२२ सकाळी ६:०० वाजता)
THIRD AC ECONOMY (3E)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


उद्यान एक्सप्रेस च तिकीट काढल्यावर लक्षात आलं पुन्हा via सोलापूर 😀 
सोलापूर काही पाठ सोडत नाहीये 😂

तर... 

आमच्या दोघींची lower birth होती त्यामुळे आम्ही खुश होतो. बस्स सहप्रवासी senior citizen नसले म्हणजे मिळवली नाहीतरी आमच्या दोघींची रवानगी त्यांनी upper ला केली असती. 😬 senior citizen सोबत असले  की थोडी अडजस्टमेंट करावी लागते त्याला काही करू शकत नाही. असो. बाकी चौघंही सहप्रवासी तरुण पोरं होती त्यामुळे आम्ही एका अर्थी निश्चित झालो. 

या 3rd AC इकॉनॉमी ने यापूर्वी कधी प्रवास केला नव्हता, म्हटलं बघू, यावेळी TRY करू. परंतु चुकी केली हे पुढील २-३ तासांतच लक्षात आलं.  प्रवास सुरु होताच काही तासांत खूपच गरम व्हायला लागलं. माहिती नाही तो प्रॉब्लेम या इकॉनॉमी क्लास चा होता की कोणी temperature वाढवून घेतलं होतं 🤨 अगदी AC sleeper bus मध्ये प्रवास करताना सुद्धा कोणीतरी असे अतरंगी प्रवासी भेटताच जे AC चं temperature वाढवायला सांगतात.  मला हा नेहमी प्रश्न पडतो, असे प्रवासी AC च तिकीट काढतात च कशाला 😏मी तर इथे भर AC मध्ये newspaper चा पंखा करून बसले होते 😐 
अजून या 3E चा drawback असा की legspace खूप कमी असते. आधीच सहप्रवासी आजूबाजूला ऐसपैस बसलेले त्यात या इकॉनॉमी क्लास च्या एवढ्याश्या सीट्स आणि कमी जागा. आरामात बसणं खूपच कठीण होऊन जातं. 
आणि बंगळुरू पर्यंत पोहोचायला जवळपास २३ तासांचा प्रवास करायचा होता 😑 थोड्याच वेळात हा विचार करूनच एवढा वैताग यायला लागला होता. त्या बिगबॉस मध्ये उगाच नाही एकमेकांच्या झिंझ्या उपटत असं वाटलं 😂 continuous किती वेळपर्यंत अनोळखी माणसांना सहन करत बसणार 😀👀👁️👁️‍🗨️
या वैतागाला अजून एक कारण होतं - त्यातला एक सहप्रवासी - "University Of Calicut" 😣
त्याच्या sweatshirt वर University Of Calicut print केलेलं होतं. म्हणून आम्ही दोघीनी त्याचं नाव ठेवलं - University 😒

दिवसभर तसंही कोणी झोपत नाही त्यामुळे आम्ही दोघीनी एक lower birth अडवून टाकली आणि दुसऱ्या lower birth वर बाकी तिघे बसले होते. 

एक तो University. 
दुसरा एक गुज्जू होता तो बिचारा headphone घालून आपल्याच विश्वात होता, मध्येच त्याच्या मुलाचा कॉल यायचा तेव्हा त्याच्याशी बोलत असायचा.
तिसरा आपल्या girlfriend शी च फोन वर लागलेला होता 😀 तो मराठी, हिंदी, इंग्लिश, आणि south ची कोणतीतरी एक भाषा अशा सगळ्या भाषांमध्ये बोलत होता. दिसायला थोडाफार आमच्या यश (cousin) सारखा होता म्हणून आम्ही दोघीनी त्याला यश नाव ठेवलं होतं 😁
आणि चौथा माणूस सकाळपासून जो upper birth ला झोपलेला होता त्याच तोंड आम्ही डायरेक्ट रात्रीच, जेवायला खाली आला, तेव्हाच पाहिलं 😃 
आणि आम्ही दोघी असे आम्ही ६ सहप्रवासी पुढील २३ तास बिगबॉस च्या 3E कंपार्टमेंट मध्ये राहणार होतो 😁

ट्रेन मधलं जेवण काही आम्हाला आवडत नाही म्हणून किर्ती ने येताना शिदोरी बांधूनच आणली होती - अळू वडी, चपात्या आणि लसूण चटणी 🤤 आमचा २ वेळचा नाशता आणि जेवण हेच असणार होतं. पहाटे लवकर घरातून बाहेर पडलो होतो त्यामुळे ९-९:३० ला आम्हाला भूक लागली आणि आम्ही लागलीच आमची शिदोरी उघडली 😋


आम्ही आमची शिदोरी उघडली आणि त्यापासून त्या University ने आमचं डोकं खायला सुरुवात केली 😑 
एकतर त्याला मराठी / हिंदी काहीही बोलता येत नव्हतं. आणि आम्हाला इंग्लिश मध्ये वार्तालाप करण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. परंतु त्याला आमच्या दोघींमध्ये इतका इंटरेस्ट होता की अगदी बारीक-बारीक प्रश्न विचारत बसला होता. 😠 
बंगलोर ला राहता का? शिकताय का? इंजिनिअरिंग करताय का? मग कोणती stream? कोणतं वर्ष? कोणती युनिव्हर्सिटी? बंगलोर ला उतरून कुठे जाणार? कुठे राहणार?  तुम्ही दोघीच आहात का? बाकी सगळे कसे येणार? परत येताना कसे येणार? Via गोवा येणार का??????? 🥵
का एवढी curiosity??? 😡
बाकी तिघे पुरुष आहेत ना गप्प, ते नाही भोचक पणा करत तर या University ला काय प्रॉब्लेम आहे?? आम्ही त्याच्या प्रश्नांना yes / no एवढीच उत्तरं देत होतो 😶
पूर्वी मला सहप्रवाश्यांसोबत गप्पा मारायला आवडायच्या परंतु जसं वय वाढत चाललंय तसं अनोळखी च काय ओळखीची माणसं सुद्धा नको वाटायला लागली आहेत 😆
आम्ही दोघी continue गप्पा मारत बसलेलो होतो, तसंही काय करणार एवढ्या लांबच्या प्रवासात म्हणा. परंतु आम्ही दोघी जरा जरी गप्प बसलो की हा मध्येच काहीतरी आमच्याशी बोलायला सुरुवात करायचा 😵  आम्ही इतका त्याचा धसका घेतला होता की आम्ही दोघी काही ना काही विषय काढून बोलत बसायचो एकमेकींशी, म्हणजे त्याच्याशी बोलायला लागू नये 😬 in fact बाकी ३ सहप्रवाश्याना सुद्धा कळलं होतं एव्हाना की हा खूपच चावायला लागलाय 🤕
बाजूच्या side upper ला कोणीच प्रवासी आलेला नव्हता, रिकामीच होती सीट. त्या सीट वर तो University त्याच्या वेळेत नमाज पढुन यायचा. आम्ही दोघीनी विचार केला हा तिथेच का नाही शिफ्ट होत, आमचं डोकं इथे समोर बसून खाण्यापेक्षा 😤
किर्ती मला बोलली - हा माणूस नक्की आपल्या बाजूला बसायला येणार एकदा तरी. एकदा तो चिकटला की संपला विषय 😰
आणि झालं तसंच, संध्याकाळी हा University बोलला जरा सरकायला, बसायचं आहे बाजूला म्हणून 😨
आम्हाला हे झेंगट अजून जवळ करायचं नव्हतं. त्याला मग बोललेच - ती side upper रिकामी आहे तिथे तुम्ही जाऊन बसा, आरामात पडता येईल एकट्याला. परंतु त्याला बायकांमध्येच बसायचं होतं, आणि पुन्हा तो आमच्या समोर lower birth ला येऊन बसला 😧 काय माहिती, कदाचित जिथे नमाज पढतात तिथे ते झोपत नसतील 🤔 
खरं म्हणजे रेल्वे च्या नियमाप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रवाशाला सीट वर बसायला नाकारू शकत नाही. 
परंतु असा सहप्रवासी असेल तर काय करणार 😣
या University ला आम्ही आमच्या बाजूला बसायला दिलं नाही बघून बाकी दोघांनी ही पूर्ण प्रवासात आमच्या बाजूला बसायची हिम्मत केली नाही, काय माहिती या बायका हकालावून लावतील 😋 तो यश तर बिचारा, जागा नव्हती बसायला म्हणून दुसरीकडे जाऊन बसला पण आमच्या बाजूला आला नाही 😁
तर.. त्या University ला आमची एक lower birth काबीज करायची होती वाटतं 😠 
रात्री सगळ्यांची झोपण्यासाठी पांगापांग व्हायला लागली तसं त्याला स्पष्टच सांगितलं आम्ही - आम्हाला आता आमच्या सीट वर झोपू दे, नाहीतर तो एक lower birth अडवून आमच्या दोघींचं डोकं रात्रभर चावायला तयार होता. 😓 नेमकं बाकीच्या तिघांनाही आमचा प्रॉब्लेम एव्हाना कळला होता आणि त्यांनी या University ची रवानगी सरळ upper birth ला  केली .. हुश्श 😥
त्यात त्या University ने अजून एक वैताग आणला होता तो म्हणजे continue त्याच्या फोन वर headphones न लावता reels बघत होता. अगदी मोठ्या आवाजात 😣 १-२ तास ठीक आहे पण एकसारखं काय. रात्री सगळे झोपल्यावर त्याने तेवढा काय तो फोन बंद केला असेल, बाकी जवळपास ८-९ तास continue त्याचे reels बघणं चालू होतं, तेही मोठ्या आवाजात. अगदी पहाटे उठल्यावर सुद्धा KSR बंगळुरू येईपर्यंत, भूपाळी लावावी तसे याने reels open करून ठेवले होते 😞
 
असे विचित्र सहप्रवासी भेटले की प्रवासाचा आनंद घेता येत नाही. वाचकांना विनंती आहे, तुम्ही असं वागून सहप्रवाश्याना त्रास देऊ नका please 😀 

असा आमचा मुंबई ते बंगळुरू प्रवास त्या University मुळे memorable झाला खरा 🙄

सीन २ :
10103 / MANDOVI EXPRESS
रत्नागिरी (१३ डिसेंबर २०२२ दुपारी ०१.३५ वाजता) 
ते 
मडगाव (१३ डिसेंबर २०२२ संध्याकाळी ७:१० वाजता)

सर काका, आत्ये, काकी आणि सुजल या ट्रेन मध्ये बसणार होते. 
पण मी जेव्हा सकाळी ०८.३० वाजता उद्यान एक्सप्रेस साठी दादर ला थांबले होते, तेव्हाच ही मांडवी दादर लाच १ तास late होती 😑

मडगाव हुन बंगलोर ला जाण्यासाठी त्यांची दुसरी ट्रेन रात्री ११ वाजता होती. आता ही मांडवी distance cover करत वेळेत पोहोचली तर ठीक नाहीतर या चौघांना मडगाव ला पुढची ट्रेन पकडताना धावपळ करायला लागली असती.
 वेळेत पोहोचली च तर रेल्वे च्या प्रतिक्षलयात थांबण्याचा निर्णय घेतलेला होता. 
परंतु व्हायचं तेच झालं. ट्रेन late होत अगदी काठावर रात्री १०.३० वाजता मडगाव ला पोहोचली. आणि लगेच या चौघांनी पुढच्या ट्रेन मध्ये उडी टाकली 😪

(क्रमशः)

~ सुप्रिया घुडे

यापुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर