Posts

ही वाट एकटीची - व. पु. काळे

Image
'बाबी' - एक विलक्षण, धाडसी, सत्याची कास न सोडणारी मुलगी. आपल्या समाजात अशा अनेक 'बाबी' आहेत, तिचा स्वतः च्याच आयुष्याशी असलेला 'एकटी' चा लढा मांडलाय या पुस्तकात. व. पु. च लेखन नेहमीच मध्यम वर्गीयांचा मनाला हात घालणारच असत. त्यांचा कथेचा शेवट कधीच typical movie style - Happy Ending असलेला कधीच नाही मिळणार. त्यांचा कथेमध्ये नेहमीच practical approach दिसतो. तोच practical approach 'बाबी' च्या कथेतही दिसून येईल. छान पुस्तक. खिळवून ठेवत. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202133832418527&l=cb8ba756a7 BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4975553267887554649?BookName=Hi-Vat-Ekatichi

बकुळा - सुधा मूर्ती

Image
करियर आणि सत्तेच्या मागे धावणारा 'श्री' आणि आपलं करियर बाजूला ठेवून नवऱ्याची सावली बनून राहिलेली 'श्रीमती'. या दोघांची कहाणी. श्रीकांत आणि श्रीमती - दोघंही शालेय जीवनापासून अत्यंत हुशार आणि महात्वाकांशी. त्या दोघांची प्रेमाच साक्षीदार असतं दारातलं 'बकुळी'चं झाड. परंतु लग्न झाल्यावर सगळ चित्रच पालटत. आपल्या स्वप्नांवर पाणी सोडून नवऱ्याचा स्वप्न पुर्ण करणारी श्रीमती. जी सासूच्या प्रेमळ शब्दांची भुकेलेली आहे, नवऱ्याने आपल्यासाठी थोडा वेळ काढावा , थोडे कौतुकाचे शब्द बोलावेत एवढीच माफक इच्छा आहे, आपल्याला मूल असावं अशी इच्छा आहे. परंतु काही काळानंतर जेव्हा तिला कळून चुकत कि आपल्या या त्यागाला नवऱ्याचा लेखी काही किंमत नाही, तेव्हा ती सगळ सोडून आपली स्वप्न पुर्ण करायला (डॉक्टरेट करायला) घराबाहेर पडते. तेव्हा श्री च्या लक्षात येत कि आपल्या हातातलं 'बकुळी' च फुल स्वतःच्याच चुकीने निसटून गेलेलं आहे. करियर च्या मागे धावणाऱ्या जोडप्यांच्या डोळ्यांत अंजन घालणार पुस्तकं आहे. नक्की वाचा. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=102021338368...

निलांगिनी

Image
महाभारत - द्रौपदीच्या नजरेतून… कादंबरीच्या सुरुवातीला कदाचित लेखिकेचे विचार पटतीलच असे नाही. परंतु त्यानंतर कथेवरचि पकड मजबूत केलेली आहे. अजूनपर्यंत महाभारत - युध्द झाल्या नंतर, पांडवांचा ग्रुहस्थाश्रमापर्यन्तचा काळ सर्व ग्रंथ-कादंबरी मध्ये वाचावयास मिळतो. 'निलांगिनी ' मध्ये पांडवांचा वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाचा काळ सुद्धा वर्णन केलेला आहे. अग्निशिखेच्या सुडपुर्ती ची कहाणी खूपच छान रंगवली आहे लेखिकेने. वाचकाला कुरुवंशाची सर्व माहिती मिळण्यासही मदत होते. Good Read. Good treat for महाभारत lovers  heart emoticon From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202355050748847&l=a3444bdecb BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5183085253113074337?BookName=Nilangini

मनात - अच्युत गोडबोले

Image
In one word - "Mind" Blowing. It's सबकुछ about Brain. या पुस्तकात मेंदू आणि मनोविश्लेषणाच्या इतक्या बारीक छटा वाचायला मिळतील, की सामान्य वाचक अचंबित होऊन जातो. गोडबोले नि केलेला detailed अभ्यास नक्कीच वाचकांच्या नजरेतून सुटणार नाही. आणि एवढे details कोणत्याच पुस्तकात (तेही मराठी मध्ये) मिळणार नाहीत. पुस्तक वाचल्यावर आपोआप आपल्या सभोवतालच्या लोकांच आपण मन जाणायचा प्रयत्न कर ू लागतो. प्रत्येकाचा स्वभावाचं scientific observation करायला लागतो. खूपच छान पुस्तक(खरं तर ग्रंथ/Reference बुक म्हणायला हवं). नक्कीच वाचा. Happy Reading. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202911033408066&l=53b779db68 BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4903653491135472526?BookName=Manat

प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे

Image
पुस्तकाबद्दल मी काय बोलणार. आदिवासींमध्ये जाऊन त्यांची सेवा करण्याच ध्येय बाळगायला तेवढी हिम्मत लागते. पुस्तकामध्ये प्रकाश आमटे यांचा आदिवासीनच्या सान्निध्यातला जीवनप्रवास उलगडतो. तसेच अरण्यात राहताना आलेल्या प्रोब्लेम्स वर कशी मात केली ते पण अगदी सध्या सरळ सोप्या भाषेत वर्णन केलेलं आहे. आवर्जुन वाचाव असा पुस्तक. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203389900219437&l=85c44ead3a BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350687220296285742?BookName=Prakashvata

समिधा - साधना आमटे

Image
हे पुस्तक वाचून, बाबा आमटे यांच्या जीवन कार्याला वाहून घेतलेली अर्धांगिनी यापलीकडे साधना आमटे यांची ओळख व्हायला मदत होते. त्यांच अलंकारिकलिखाण 'इंदू' ताईं मधल्या लेखिकेची साक्ष देते. पुस्तकामध्ये आमटे परिवाराच्या समाजकार्याचा 'आंखो देखा हाल' पाहून वाचक नतमस्तक होईल, यात शंकानाही. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203520388521563&l=7a464ee6f4 BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4630245432039232071?BookName=Samidha-(-Marathi)

आनंदवन प्रयोगवन - डॉ . विकास आमटे

Image
सहा कुष्ठ रोग्यांना घेवून बाबांनी सुरु केलेलं आनंदवन पुढे डॉ . विकास आमटे अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कस वाढवत नेलं (आणि अजूनही वाढत आहे, असचवाढत राहो), याचा हा आढावा… केवढा तो आवाका. सगळच अद्भुत. आम्हा सामान्य माणसांच्या कल्पना पलिकडचं … प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं प्रेरणादायी पुस्तक आहे. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203615671423576&l=0f7d1c425c BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4961057730949409558?BookName=Anandvan-Prayogvan