बकुळा - सुधा मूर्ती



करियर आणि सत्तेच्या मागे धावणारा 'श्री' आणि आपलं करियर बाजूला ठेवून नवऱ्याची सावली बनून राहिलेली 'श्रीमती'.

या दोघांची कहाणी.

श्रीकांत आणि श्रीमती - दोघंही शालेय जीवनापासून अत्यंत हुशार आणि महात्वाकांशी. त्या दोघांची प्रेमाच साक्षीदार असतं दारातलं 'बकुळी'चं झाड.

परंतु लग्न झाल्यावर सगळ चित्रच पालटत.

आपल्या स्वप्नांवर पाणी सोडून नवऱ्याचा स्वप्न पुर्ण करणारी श्रीमती. जी सासूच्या प्रेमळ शब्दांची भुकेलेली आहे, नवऱ्याने आपल्यासाठी थोडा वेळ काढावा , थोडे कौतुकाचे शब्द बोलावेत एवढीच माफक इच्छा आहे, आपल्याला मूल असावं अशी इच्छा आहे.

परंतु काही काळानंतर जेव्हा तिला कळून चुकत कि आपल्या या त्यागाला नवऱ्याचा लेखी काही किंमत नाही, तेव्हा ती सगळ सोडून आपली स्वप्न पुर्ण करायला (डॉक्टरेट करायला) घराबाहेर पडते.

तेव्हा श्री च्या लक्षात येत कि आपल्या हातातलं 'बकुळी' च फुल स्वतःच्याच चुकीने निसटून गेलेलं आहे.



करियर च्या मागे धावणाऱ्या जोडप्यांच्या डोळ्यांत अंजन घालणार पुस्तकं आहे. नक्की वाचा.


From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202133836818637&l=56ab3e275c

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4829331925639437819?BookName=Bakula


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर