Posts

अंथरूण पाहून पाय पसरावे

अंथरूण पाहून पाय पसरावे Scene 1 : ऐका ना, मला थोडी पैशांची गरज होती. या महिन्यात थोडे देऊ शकता का? तरी ₹10,000/- हवे होते. मी पुढच्या काही महिन्यांमध्ये देऊ शकेन. मी माझा एका मित्राला पैसे दिले होते आणि तो आता मला पैसे परतच करत नाहीये, म्हणून तुमच्याकडे मागतोय.. 🤔🤔🤔🤷🤷🤷 Scene 2 : 📞  Hello, ऐक ना, एक काम होतं तुझ्याकडे. लग्न ठरलंय ते तुला सांगितलं आहेच. खर्च हाताबाहेर जातोय थोडा. तशी सगळी व्यवस्था केली आहे. तरी पण emergency म्हणून थोडे हाताशी पैसे ठेवायचं म्हणतेय. तुला माहीत आहे ना, आपली मुलीकडची बाजू, आयत्या वेळी वर पक्षाकडून काय मागण्या येतील माहीत नाही. तर... तू थोडी मदत करू शकते का.. तरी ₹50,000/-.. बघ जेवढं जमत असेल तेवढं.. 🤷🤷🤷🤷🤔🤔🤔🤔 (बरं, हे love marriage होतं 🤦) Scene 3 : आमच्याकडे कामाला एक बाई येते - माया. ती आमच्या society मधल्या अजूनही काही ठिकाणी घरकाम करते. अशाच एका सुखवस्तू घरच्या मालकिणीला नेहमी हातात पैसे खेळवत ठेवत, shopping करायचा छंद(?!) आहे. नवऱ्याच्या पैशांवर मजा मारायची हौस. आणि हातचे पैसे संपले की त्या मालकिणीला काही सुधारेनासं होत...

Budgie 🐦

Image
Budgie 🐦 08-मे-2019 नेहमीप्रमाणे रात्रौ ०९.३० वाजता ऑफिस मधून मी घरी पोचले. floor च्या passage मध्ये आमच्या दरवाच्या बाजूला एक खिडकी आहे. त्यात काहीतरी निळ्या रंगाची वस्तू लांबूनच अडकवलेली दिसली. जवळ जातेय तर चिमणी सारखं छोटंसं काहीतरी. आधी वाटलं, बाजारात खोट्या stuffed चिमण्या असतात त्यातलं एखादं कोणीतरी अडकवून ठेवलंय. जवळ गेल्यावर हलत तर नव्हतं. दरवाजा उघडायला गेले तर त्या आवाजाने थोडी हालचाल झाल्यासारखी वाटली. अरे देवा, म्हणजे हा खरा पक्षी आहे तर. आणि अजूनही जिवंत आहे. मान अडकल्यामुळे हलू शकत नाहीये. काही सुचेना, करायचं काय. आयुष्यात कधी कोणत्या पक्ष्या जवळ गेले नाही. आपली मजल कुत्र्या- मांजरपर्यंत.  बरं आधी याची मान तरी सोडवायला पाहिजे, नाहीतर हे मरुन जायचं.  दरवाजा उघडून बॅग घरात ठेवली आणि किर्ती ला बोलावलं. म्हटलं मी खिडकी उघडते, तू खाली वर्तमानपत्र धरून ठेव. कितपत injured आहे माहीत नाही, पडलं खाली तर जमिनीवर तरी नाही आपटणार. हळूच खिडकीचा flap open केला आणि ह्या पिल्लूची मान व्यवस्थित मोकळी झाली, आणि पिल्लू काचेवरच बसलं. बरं बसलं ते तिथेच बस...

Happy Wedding Anniversary

Image
Happy Wedding Anniversary मी - "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..." 💃🕺 बाबा - "आज १० तारीख आहे?? बरोबर... हाच तो माझ्या आयुष्यातला काळा दिवस.. माझ्या आयुष्याची वाट..." आई - "हो वाट लागली म्हणे.. मी होते म्हणून तुमचा संसार केला " (जगातील समस्त बायकांचा typical dialogue).. 😋 अशी चेष्टा मस्करी करत २९ वर्षं सहजीवनात काढली दोघांनी. मग ३० वा लग्नाचा वाढदिवस साजरा करायला बाबा नाही राहिले. पण बाबा कितीही काही बोलले तरीही बाबांचा आईवर स्वतःहीपेक्षा जास्त विश्वास होता. गेल्या दहा वर्षांत ऑफिस सोडून कुठेही एकटे गेले नसतील, नेहमी आई सोबत. माझी आजी (म्हणजेच उषाताई) शी नेहमी बाबांचे वाद चालू असायचे ☺️. नेहमी काहीतरी माय-लेकरांची भांडणं सुरू. 😋 एकदा असेच वैतागून बोलले - "हे यासाठीच ना मला तूझ्यापेक्षा जास्त शितल(माझी आई) आवडते" 🙃 झालं.. 🤦 आपल्या मुलाने तोंडावर आपल्यापेक्षा बायको जास्त आवडते म्हणणं म्हणजे.. 🙆 यावर काय महाभारत झालं असेल हे सांगायला नकोच 🏃 अशी ही दोघ, आधीसुद्धा एकत्र होते, आजही एकत्र आहेत..... . . ....

मी, आई आणि ICU

मी, आई आणि ICU १२- फेब्रुवारी - २०१८ माझ्या डोळ्यासमोर चितेत “ती” भस्मसात होतेय.. कोणीतरी माझ्या खांद्यावर मडकं ठेवून त्यावर ‘अश्म’ ने भोक पाडतय आणि मी ते मडकं मागल्या - मागे टाकून बोंब मारतेय. मोठी मुलगी म्हणून आईला मुखाग्नी देण्याची वेळ आली आहे माझ्यावर.. गेले महिनाभर पोटच्या पोराप्रमाणे लेकीने आईची आजारपणात सेवा केल्याच पुण्य(?!) म्हणे.... १२-जानेवारी-२०१८ गेले आठवडाभर माझी तब्येत ठीक नव्हती, आणि मला बरं नसलं की आईची धावपळ सुरू होते. एकसारखे फोन करून सांगेल, हे कर, ते खा. पण यावेळी आईचा फोन नाही, त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. मध्येच एकदा व्यवस्थित बोलली पण आवाज ठीक नव्हता. माझ्या आजारपणासाठी मात्र घरगुती उपचार सांगायचे विसरली नाही. आई ही शेवटी आईच असते..स्वतः कितीही आजारी असली तरी, तिच्यापासून लांब राहणारं तिचं लेकरू आजारी आहे म्हटल्यावर, आपलं लेकरू खाऊन पिऊन औषधं घेतंय की नाही ती काळजी करत बसेल पण स्वतः तोंडाला चव नाही म्हणून घोटभर चहा सुद्धा घेणार नाही.. किर्ती ला विचारलं - खरं सांग आई ला काय होतंय. ती बोलली माहीत नाही पण झोपून राहतेय, BP वाढलंय बहुतेक. माझी तब्येत बरी...

माझे छंद

Image
माझे छंद छंद म्हणजे काय, तर फावल्या वेळात करण्याचे उद्योग. आपल्या नेहमीच्या कामाच्या रगाड्यात जोपासलेली आवड. आता मुंबईकर म्हणतील, फावला वेळ इथे आहे कुणाकडे. फावला वेळ मिळतो तो प्रवासात, ऑफिस साठी जाता-येताना. प्रवासात लोकल मध्ये मिळतो तेवढाच काय तो दिवसभरातील me - time. प्रवासात सहप्रवासी बायका अनेक छंद जोपासताना दिसून येतात. कोणी विणकाम - भरतकाम करतंय, कोणी वाचन करतंय, कोणी गप्पा मारतंय (गप्पा मारणे हा सुद्धा छंद आहे बरं का, भयंकर ऊर्जा भरलेली असते त्यात).. आता हा लेख सुद्धा मी माझ्या फावल्या वेळेत तर लिहून काढतेय - प्रवासात. 😁 एखादा छंद जोपासताना मिळणारा उत्साह अगणित असतो, निर्माण होणारी ऊर्जा आपल्याला नेहमीच्या कामात उत्साह आणते. माझी ऊर्जा वाढवणारा आवडता छंद म्हणजे वाचन, मग ते पुस्तकांचं असो की माणसांचं. मला वाचायला खूप आवडतं. वाचनाने माणूस समृद्ध होतो, भाषा समृद्ध होते, नव-नवीन भाषा शिकायला मिळतात, दुसऱ्याचे अनुभव ऐकायला मिळतात, त्या अनुभवांचा उपयोग आपल्या आयुष्यात करता येतो. लेखिका कविता महाजन त्यांचा 'ब्र' या कादंबरीत म्हणतात त्या प्रमाणे - "आपले सगळ...

धन्य ती Gynaec कला - डॉ. मीना नेरुरकर

Image
धन्य ती Gynaec कला - डॉ. मीना नेरुरकर डॉ. मीना नेरुरकर यांच्या विषयी सांगावं तेवढं कमीच आहे. Gynecologist, actor, director, author, playwright, dancer and choreographer, एकच व्यक्ती आयुष्यात एवढे सारे role करू शकते, हे बघून कमाल वाटते आणि अभिमान सुद्धा. http://www.meenanerurkar.com/about.html दादर, महाराष्ट्रात शिकून सध्या अमेरीकास्थित लेखिकेच as a Gynecologist म्हणून अनुभव कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. अमेरिका आणि भारतातील cultural difference, आचार-विचार याचं लीलया वर्णन लेखिकेने केलेलं आहे. लहानपणी स्वतःच्या सावळ्या रंगाबद्दल असलेला न्यूनगंड अमेरिकेत गेल्यावर कसा कमी झाला, तिथे तुमच्या कामाला कसं प्राधान्य दिलं जातं, याबद्दल लेखिकेने सांगितले आहे. अमेरिकन lifestyle चा एक मंत्र आहे - You have one life to live. So do whatever you want. As long as you do not hurt others, go ahead and live your life to the fullest. They take complete pride in whatever work they do. आणि अमेरिकेच्या उन्नतीचं हेच मुख्य कारण आहे. लेखिकेचे अमेरिकेतील डॉक्टरी पेशातील patients handle ...

मार्जारगाथा - रुपाली पारखे - देशिंगकर

Image
मार्जारगाथा - रुपाली पारखे - देशिंगकर जेव्हा don एक dialogue बोलतो - I love wild cats,मुझे जंगली बिल्ली बहोत पसंद हैं.. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक रानमांजर येतं नेहमी. परंतु त्या रान मांजरात सुद्धा अजून प्रकार आहेत, ते मार्जारगाथा वाचून कळलं. मी एक hardcore मांजरप्रेमी असल्या कारणाने हे पुस्तक घेतलं, आणि त्यात बरीच रंजक माहिती मिळाली. मांजरांचे विविध प्रकार, त्यांचं राहणीमान, जीवनशैली,  एकूणच मार्जारकुळाची माहिती या पुस्तकात मिळेल.  Discovery Tai चं लिखाण मी नेहमी Day To day nature मधून वाचत आलेली आहे, ताई ची लेखनशैली जबरदस्त आहे, त्यामुळे तीच मार्जारगाथा हे पुस्तक सुद्धा माहिती देण्याच्या बाबतीत अजिबात निराश करत नाही. लहानथोर सर्वांनी वाचावं अशी ही मार्जारकुळाची महितीपुस्तिका आहे. साप्ताहिक विवेक च्या Sub-Editor - शीतल खोत यांनी पुस्तक माझ्या पर्यंत पोचण्यासाठी खूप मदत केली, त्यांना मनापासून धन्यवाद!