पंचतारांकित
पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या - प्रिया तेंडुलकर. परंतु याहीपलीकडे तिने स्वतःची ओळख निर्माण केली ललितलेखन करणारी अभिनेत्री म्हणून. चित्रकला, मॉडेलिंग, 5 स्टार हॉटेल मधली receptionist आणि अभिनेत्री असा प्रवास करताना स्वतःचं घडत गेलेलं व्यक्तिमत्त्व तिने 'पंचतारांकित' मध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. वडिल विजय तेंडुलकर हे प्रियाचे सर्वात जवळचे मित्र. वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन, प्रत्येक कामात त्यांचा असलेला पाठिंबा, त्यांनी वेळोवेळी केलेले उपदेश तिच्या प्रत्येक लिखाणात जाणवतात. प्रिया तिच्या मित्रासोबत वेश्यावस्तीतून सोडवून आणलेल्या २ बाल वेश्यांची कहाणी सांगते, ती खरंच हृदय पिळवटणारी आहे. एका पंचतारांकित हॉटेल मध्ये receptionist च काम करताना आलेले कटू-गोड अनुभव खूप छान वर्णन केले आहेत. अशा हॉटेल्स मध्ये काम करणाऱ्या बायका या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेल्या शोभेच्या बाहुल्या असतात. कधी कधी त्यांना शरीर विक्रीसाठी भाग पाडलं जातं, कधी त्या स्वतः त्या क्षेत्रात उतरतात, परिस्थितीमुळे म्हणा. यात बरेच हात गुंतलेले असतात...