पंचतारांकित

#२०१९ कधी नव्हे ते आज return ट्रेन मिळाली. मस्त window seat, अजून काय हवं. आज बसून पुस्तक वाचायला मिळणार 🤓 पण एवढं कुठलं नशीब चांगलं. पुढच्या स्टेशन ला एक पोरगी येऊन बसली. एवढ्या मोठ्याने boyfriendशी फोनवर बोलत होती की थोड्या वेळात त्यांच्या दोघांमधले प्रॉब्लेम solve करायला बसू शकले असते मी, एवढी इत्यंभूत माहिती मिळाली मला. 🤦 तिचा एवढा loudspeaker कानाशी चालू असताना मला पंचतारांकित (📖) बाजूला ठेवून डोकं टेकावं लागलं. मला headphones वापरायची सवय नाहीये, आणि त्यात पुढचा अजून एक तास अजिबात मला तिचे आणि तिच्या bf चे प्रॉब्लेम्स ऐकायचे नव्हते. तेवढयात एक आयडिया ची कल्पना आली डोक्यात 💡 एका friend ला message type केला, मला कळलं की ती माझ्याच मोबाईल मध्ये बघतेय 😁 message sent झाल्यावर पुन्हा डोकं टेकवून मी गप्प बसले, आणि तो msg अगदी पथ्यावर पडला 😆 आपोआप आवाज कमी झाला. शेवटचं बोलणं ऐकलं - "अरे ती शेजारी बसली आहे ना तिला आपल्या बोलण्याचा त्रास होतोय, कोणालातरी msg केला तिने.. पुस्तक वाचतेय ना.." 😁 तिच्या bf ने अखंड शिव्यांची लाखोली वाहिली असेल मला. 😅 anyways who cares.....