Posts

Showing posts from November, 2015

ही वाट एकटीची - व. पु. काळे

Image
'बाबी' - एक विलक्षण, धाडसी, सत्याची कास न सोडणारी मुलगी. आपल्या समाजात अशा अनेक 'बाबी' आहेत, तिचा स्वतः च्याच आयुष्याशी असलेला 'एकटी' चा लढा मांडलाय या पुस्तकात. व. पु. च लेखन नेहमीच मध्यम वर्गीयांचा मनाला हात घालणारच असत. त्यांचा कथेचा शेवट कधीच typical movie style - Happy Ending असलेला कधीच नाही मिळणार. त्यांचा कथेमध्ये नेहमीच practical approach दिसतो. तोच practical approach 'बाबी' च्या कथेतही दिसून येईल. छान पुस्तक. खिळवून ठेवत. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202133832418527&l=cb8ba756a7 BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4975553267887554649?BookName=Hi-Vat-Ekatichi

बकुळा - सुधा मूर्ती

Image
करियर आणि सत्तेच्या मागे धावणारा 'श्री' आणि आपलं करियर बाजूला ठेवून नवऱ्याची सावली बनून राहिलेली 'श्रीमती'. या दोघांची कहाणी. श्रीकांत आणि श्रीमती - दोघंही शालेय जीवनापासून अत्यंत हुशार आणि महात्वाकांशी. त्या दोघांची प्रेमाच साक्षीदार असतं दारातलं 'बकुळी'चं झाड. परंतु लग्न झाल्यावर सगळ चित्रच पालटत. आपल्या स्वप्नांवर पाणी सोडून नवऱ्याचा स्वप्न पुर्ण करणारी श्रीमती. जी सासूच्या प्रेमळ शब्दांची भुकेलेली आहे, नवऱ्याने आपल्यासाठी थोडा वेळ काढावा , थोडे कौतुकाचे शब्द बोलावेत एवढीच माफक इच्छा आहे, आपल्याला मूल असावं अशी इच्छा आहे. परंतु काही काळानंतर जेव्हा तिला कळून चुकत कि आपल्या या त्यागाला नवऱ्याचा लेखी काही किंमत नाही, तेव्हा ती सगळ सोडून आपली स्वप्न पुर्ण करायला (डॉक्टरेट करायला) घराबाहेर पडते. तेव्हा श्री च्या लक्षात येत कि आपल्या हातातलं 'बकुळी' च फुल स्वतःच्याच चुकीने निसटून गेलेलं आहे. करियर च्या मागे धावणाऱ्या जोडप्यांच्या डोळ्यांत अंजन घालणार पुस्तकं आहे. नक्की वाचा. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=102021338368

निलांगिनी

Image
महाभारत - द्रौपदीच्या नजरेतून… कादंबरीच्या सुरुवातीला कदाचित लेखिकेचे विचार पटतीलच असे नाही. परंतु त्यानंतर कथेवरचि पकड मजबूत केलेली आहे. अजूनपर्यंत महाभारत - युध्द झाल्या नंतर, पांडवांचा ग्रुहस्थाश्रमापर्यन्तचा काळ सर्व ग्रंथ-कादंबरी मध्ये वाचावयास मिळतो. 'निलांगिनी ' मध्ये पांडवांचा वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाचा काळ सुद्धा वर्णन केलेला आहे. अग्निशिखेच्या सुडपुर्ती ची कहाणी खूपच छान रंगवली आहे लेखिकेने. वाचकाला कुरुवंशाची सर्व माहिती मिळण्यासही मदत होते. Good Read. Good treat for महाभारत lovers  heart emoticon From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202355050748847&l=a3444bdecb BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5183085253113074337?BookName=Nilangini

मनात - अच्युत गोडबोले

Image
In one word - "Mind" Blowing. It's सबकुछ about Brain. या पुस्तकात मेंदू आणि मनोविश्लेषणाच्या इतक्या बारीक छटा वाचायला मिळतील, की सामान्य वाचक अचंबित होऊन जातो. गोडबोले नि केलेला detailed अभ्यास नक्कीच वाचकांच्या नजरेतून सुटणार नाही. आणि एवढे details कोणत्याच पुस्तकात (तेही मराठी मध्ये) मिळणार नाहीत. पुस्तक वाचल्यावर आपोआप आपल्या सभोवतालच्या लोकांच आपण मन जाणायचा प्रयत्न कर ू लागतो. प्रत्येकाचा स्वभावाचं scientific observation करायला लागतो. खूपच छान पुस्तक(खरं तर ग्रंथ/Reference बुक म्हणायला हवं). नक्कीच वाचा. Happy Reading. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202911033408066&l=53b779db68 BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4903653491135472526?BookName=Manat

प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे

Image
पुस्तकाबद्दल मी काय बोलणार. आदिवासींमध्ये जाऊन त्यांची सेवा करण्याच ध्येय बाळगायला तेवढी हिम्मत लागते. पुस्तकामध्ये प्रकाश आमटे यांचा आदिवासीनच्या सान्निध्यातला जीवनप्रवास उलगडतो. तसेच अरण्यात राहताना आलेल्या प्रोब्लेम्स वर कशी मात केली ते पण अगदी सध्या सरळ सोप्या भाषेत वर्णन केलेलं आहे. आवर्जुन वाचाव असा पुस्तक. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203389900219437&l=85c44ead3a BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350687220296285742?BookName=Prakashvata

समिधा - साधना आमटे

Image
हे पुस्तक वाचून, बाबा आमटे यांच्या जीवन कार्याला वाहून घेतलेली अर्धांगिनी यापलीकडे साधना आमटे यांची ओळख व्हायला मदत होते. त्यांच अलंकारिकलिखाण 'इंदू' ताईं मधल्या लेखिकेची साक्ष देते. पुस्तकामध्ये आमटे परिवाराच्या समाजकार्याचा 'आंखो देखा हाल' पाहून वाचक नतमस्तक होईल, यात शंकानाही. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203520388521563&l=7a464ee6f4 BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4630245432039232071?BookName=Samidha-(-Marathi)

आनंदवन प्रयोगवन - डॉ . विकास आमटे

Image
सहा कुष्ठ रोग्यांना घेवून बाबांनी सुरु केलेलं आनंदवन पुढे डॉ . विकास आमटे अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कस वाढवत नेलं (आणि अजूनही वाढत आहे, असचवाढत राहो), याचा हा आढावा… केवढा तो आवाका. सगळच अद्भुत. आम्हा सामान्य माणसांच्या कल्पना पलिकडचं … प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं प्रेरणादायी पुस्तक आहे. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203615671423576&l=0f7d1c425c BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4961057730949409558?BookName=Anandvan-Prayogvan

नेगल भाग १ - विलास मनोहर

Image
हे पुस्तक म्हणजे प्राणी मित्रांसाठी मस्त खाद्य आहे. नेगल - नेगली ची love - story तर छानंच! डॉ. प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांचे प्राण्यांवरचे प्रेम अचंबित करणारे. आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203961750555338&l=08ffa68cec BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5456420284595823541?BookName=Negal-1

नेगल २ : हेमलकशाचे सांगाती - विलास मनोहर

Image
परत एकदा, प्राण्यांच्या भाव विश्वात खेचून नेणार अजून एक भावनिक पुस्तक. 'नेगल १' संपवतानाच 'नेगल २' ची उत्सुकता होती, आणि पुस्तक वाचताना ती उत्सुकता कोठेही कमी होत नाही. 'नेगल १' आणि 'नेगल २' , दोन्ही भाग संपवताच एक गोष्ट जाणवते, हिंस्त्र प्राण्यांकडे (आता हिंस्त्र नक्की कोणाला म्हणाव - आपल्यासारख्या माणसांना कि प्राण्यांना हा प्रश्न नक्कीच आहे) पाहण्याचा दृष्टीकोण नक्कीच बदलतो. प्राणी आणि निसर्गामित्रांनी नक्की वाचावं असं पुस्तक. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204037653652868&l=d1e21f632f BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4848250632198610287?BookName=Negal-2

लग्नाविना - मंगला सामंत

Image
'Live-In Relationship'… काहीशी उच्चभ्रू आणि उच्च - मध्यम वर्गीयान्मध्येच "प्रसिद्ध" असलेली कल्पना. तीच कल्पना उचलून तयार झालेलं हे पुस्तक. सध्या स्त्रिया-मुलींवरील हल्ले, बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार, भृणहत्या अशा अस्वस्थ करणाऱ्या घटना आपल्या भोवताली घडतायेत. एवढी पुरुषी मानसिकता विकृत का होत जात आहे? कदाचित याला आपणच जबाबदार आहोत, आपली पितृसत्ताक परंपरा, वंशा च्या दिव्यासाठी चाललेली धडपड, स्त्रियांविषयी अनादर, पुरुषी मत्सर हे जबाबदार आहे. अतिप्राचीन भारतीय संस्कृती चा जर आढावा घेतला तर तेव्हा अशा घटना का होत नव्हत्या? कारण तेव्हा मातृप्रधान संस्कृती होती, मुक्त संबंधाना मान्यता होती, स्त्री-पुरुष दोघांना समान न्याय देणारी नैतिक व्यवस्था होती. त्यानंतर हळु - हळु पुरुष प्रधान संस्कुती उदयास येऊ लागली, तिने विवाह बंधानास जन्म दिला आणि नैतिक-अनैतिकते च्या चष्म्यातून आपण समाजाकडे, in fact स्त्रियांकडे पाहायला सुरुवात केली. आपल्याला आवडलेली स्त्री फक्त माझीच असायला हवी, दुसऱ्या कोणाचा हक्कच असू शकत नाही या भावनेतून स्त्रियांच्या चेहऱ्याची विटंबना होऊ लागली

मी, मिसेस इव्हा हिटलर - मंदा खापरे

Image
हे पुस्तक म्हणजे इव्हा च्या story पेक्षा, इव्हा च्या नजरेतून 'Adolf Hitler' ची story आहे. इव्हा ही Adolf वर नितांत प्रेम करणारी निष्ठावंत प्रेयसी. तर Adolf Hitler हा आपल्या देशावर प्रेम करणारा निष्ठावंत देशप्रेमी. त्याला जर्मनी बद्दल आस्था होती, प्रेम होतं, अभिमान होता. यासाठीच तो सारं काही करत होता. देशासाठी त्याने आपलं सारं आयुष्य वेचलं. लग्न नाही केलं, संसार  नाही मांडला. त्याच्या 'ज्यू' विरोधी भूमिकेमुळे तो वाईट ठरला. परंतु जर्मनी मधील नागरिकांना तो हवा होता. त्याला जगात फक्त आर्यवंशीय लोकांचीच वस्ती बसवायची होती. त्याला संपूर्ण जग एका छत्राखाली घेवून सुंदर बनवायचं होतं, त्याच्या चित्रकारीतून ते जाणवायचं सुद्धा. निर्व्यसनी असलेला Adolf उत्तम चित्रकार होता. त्याची वक्तृत्व शैली खिळवून ठेवणारी होती. आजही आपण हुकुमशाही वृत्तीला 'हिटलर' असंच संबोधतो. अजून पर्यंत त्याच्या विरुद्धच ऐकत आलेलो आहोत. या पुस्तकातून Adolf ची बाजू समजते. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204374851002591&l=5ac59a138a BookGanga : http://www.bookga

मनश्री - सुमेध वडावाला (रिसबूड)

Image
मनश्री सोमण. जन्मतः च दृष्टिहीन. देव सुद्धा अशा काही चुका करतो कि मानवाचं science ही त्या सुधारू शकत नाही. आठव्या महिन्यातच जन्माला आली ती. premature, with cleft lips, न जुळलेल्या vertebrae मुळे जन्मतः च आखूड मान,… तिला जन्म दिलेल्या तिच्या माउली वर काय आघात घडले असतील तीच जाणो. अशा सगळ्या दिव्यातून मनश्री 'जगली', खर आयुष्य जगली. स्पर्शातून तिने जग 'पाहिलं'. एवढ अ सूनही ती म्हणते - "आपण किती 'लक्की' आहोत कि इतरांना विचारत - विचारत, हाताच्या अंदाजाने आपल्याला चालता तरी येतय." प्रत्येक गोष्टीत तक्रार करणाऱ्या डोळस माणसांनी शरमेने मान खाली घालावी, असा तिचा 'दृष्टीकोन'. खरतर तिच्या प्रत्येक यशात खरा वाटा तिच्या आई-वडिलांचा तसेच बहिण आणि आजी-आजोबांचा पण आहे. त्यांनीच तिला स्वतः च्या पायावर उभं राहायला, त्यांच्या दृष्टीतून जग पाहायला शिकवलंय. अशा या 'बालश्री' मिळवलेल्या मनश्री ची कहाणी वाचताना थक्क व्हायला होतं, ऊन - पावसाचे खेळ वाचकाच्या चेहऱ्यावर दिसतात. आणि मनश्री चं आवडतं गाण आपल्या कानात गुणगुणू लागतं - 'या जन्मावर, या जगण्यावर

समुद्र - मिलिंद बोकील

Image
समुद्र' आणि माणसाचं 'मन' यात बरचसं साम्य आहे. समुद्राचा तळ गाठणं कठीण, तसंच मनाचं ही… त्या तळाचा ठाव घेणारी ही कथा… त्यांत पती-पत्नीच्या नात्याची सुरेख गुंफण. एका क्षणाला आवडेनाशी झाली होती ही कथा मला, कदाचित social ethics आड येत होते. परंतु ज्या तऱ्हेने लेखक या कथेची गुंफण करत गेला आहे ना, Mind Blowing! जसे-जसे तुम्ही मनाच्या तळाला (कथेच्या शेवटाला) जाऊन पोहोचता,आपोआप एक आंतरिक समाधान मिळत जातं. आणि स्वच्छ - नितळ 'समुद्र' डोळ्यासमोर येऊ लागतो…. आता या कथेवर आधारित नाटक पहायची खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204643517759092&l=bea93fd41f BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5728199081339729998?BookName=Samudra

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

Image
गौरी देशपांडे याचं लिखाण सहज, सोप्प अस नक्कीच नाहीये. ते पचनी पडायला वेळ लागतोच.  'एकेक पान गळावया' हे मी वाचायला घेतलेलं गौरी च पाहिलंच पुस्तक. पहिल्या प्रकरणातच गौरी ही लेखिका म्हणून काय असामी आहे याची खात्री पटली. प्रकरण १: कारावासातून पत्रे - निम्म्याहून अधिक गोष्ट वाचेपर्यंत सगळ 'डोक्यावरून'च जात होतं, हे मी प्रामाणिकपणे काबुल करेन. परंतु जेव्हा लेखाच्या शेवट ला पोहोचतो, तेव्हा नक्की 'कारावासातून पत्रे' हे शीर्षक का दिलंय याचा उलगडा होतो. प्रकरण २: मध्य लटपटीत - आयुष्यात नक्की काय हरवलंय याचा शोध घेता-घेता जेव्हा कथेच्या शेवटी आपणच आपल्याला गवसतो, तेव्हा मनात तरळत राहतो एक चिरंतन आनंद. प्रकरण ३: एकेक पान गळावया - आयुष्यातले बंध; म्हटले तर सोपे, म्हटले तर क्लिष्ट; तेही लेखिकेने इतक्या सहजतेने उलगडलेले आहेत. घरातल्या प्रत्येक सदस्याने वाचावी अशी ही कथा. आई-वडील-मुलं यांच्यातील भावनाबंध exact मांडले आहेत. ही कथा वाचताना लेखिका प्रत्येकाला त्या-त्या जागी उभं राहून विचार करायला लावते. तळ टीप: वाचकांनी 'कारावासातून पत्रे ' सर्वात शेवटी वाचण्यास घ्याव

रथचक्र - श्री. ना. पेंडसे

Image
आपल्या पोटच्या मुलांनी शिकावं, त्यांना समाजात मानाने जगता यावं; यासाठीच केवळ आपलं आयुष्य वाहून घेणाऱ्या 'आई' ची ही कहाणी.  संन्यासी नवरा, त्रासदायक दीर - जावा या सगळ्या कचाट्यातून एकटी बाहेर पडून ती मुलाला शिक्षण देते परंतु खस्ता खाऊनही आयुष्याच्या शेवटी आत्महत्येशिवाय तिचाकडे कोणताच पर्याय उरत नाही. कादंबरी ही नेहमी खऱ्या आयुष्याचं प्रतिनिधित्व करते हे माहित असूनसुद्धा चित्रपटाप्रमाणे HAPPY ENDING ची सवय लागलेल्या मनाला 'रथचक्र' चा शेवट चटका लावून जातो.  'गारंबीच्या बापू'स तोडीस तोड कादंबरी म्हणता येईल. From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204839525499163&l=9e0032b9ba BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5450274793712697998?BookName=Rathchakra

Rose Gardens and Minefields

Image
A Literary Bhel Puri.. I never came across such type of collection, so I was quite excited. Its a collection of Poems and Stories. Though I am not that much fond of poems, poems by author will left you with mixed emotions. I personally love scientific fantasies / stories, so I love the scientific short stories. These stories really keep you thinking ab out current conditions. Essays on Maoist, terrorism, patriotism, women, AMCHI Mumbai are really very good. All in all, This is such a collection where you don't have to start reading from first page. You can anywhere, anytime open a book and start reading. Its a best witty collection I can say. (This book reminds me of Marathi book - वपुर्झा). I read this book while traveling to my hometown in one sitting and it kept me thinking all the subjects touched by this 'A Literary Bhel Puri'.... Special Note: feeling lucky to get author's autograph.. It's the benefit working in same organization  🙌 🙏 From My Book S

नित्य निरंजन

Image
आयुष्य म्हणजे घनदाट जंगल. त्यात प्रकाशवाट आपण शोधायची... भोंदू बुवा-बाबांची आणि मठ-पंथवाल्यांची गर्दी उदंड आहे. खर वैराग्य असलेले सदगुरू त्यात सापडणार नाहीत... गुरू शोधण्यासाठी गरज नाही. वेळ आली की, तो समोर येतोय... प्रपंचात राहूनही साधना करता येते.. अगदी सहजतेने... हे सगळ कस साध्य करायच, याचा अनुभवसिद्ध साधनामार्ग सांगणार हे कथन... रूढ कल्पनाना धक्का देणार 'नर्मदे हर हर' आणि 'सधनामस्त' नंतर जगन्नाथ कुंटे यांनी सांगितलेली साधनामार्गावरच्या प्रवासाची , त्यातील विलक्षण अनुभवांची ही रसाळ, वेधक आणि मार्गदर्शक कहाणी. कर्मयोगी याची exact definition हे पुस्तक वाचल्यावर कळेल… From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=1432333499565&l=8b36160152 BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5328841903747834741?BookName=Nitya-Niranjan

नर्मदेऽऽ हर हर

Image
हे पुस्तक आहे जगन्नाथ कुंटे यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेबद्दल. या माणसानं आतापर्यंत ३ वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे. नर्मदा परिक्रमेचा मार्ग अतिशय खडतर समजला जातो. पहिल्या तीन परिक्रमेच्या अनुभवांवर आधारित असे हे पुस्तक आहे. एकूणच हे पुस्तक वाचणं एक विलक्षण अनुभव होता. जगन्नाथ कुंटे याचं हेय पहिल पुस्तक मी वाचल. अप्रतिम अनुभव होता तो. या पुस्तकामुळे जगन्नाथ कुंटे अणि नर्मदा माई दोघांना भेटायची ओढ लागली आहे. From My Book Shelf :  https://www.facebook.com/photo.php?fbid=1415649762482&l=9b04b4c4ed BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5270458415334165588?BookName=Narmade-Har-Har

|| साधनामस्त ||

Image
नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जाणार श्री जगन्नाथ कुंटे यांच हे दुसर अनुभवकथन... १९९९ पासून फक्त नर्मदा परीक्रमा करीत राहिलेल्या साधकान 'माइच्या आद्न्येन' चौथी परीक्रमा केली, तिची ही कहाणी.. बाह्य प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाची... साधनेतील अनुभवांची... जीवनचिंतनाची... साधनेत मस्त असलेल्या साधकान केलेली... त्याला लाभलेल्या सुगंधी आनंद चांदण्याची सुखद शीतल पाखरण करणारी ही भावयात्रा... हे चौथ्या परिक्रमेच वर्णन. मार्ग तोच, परिक्रमा तीच; तरीही हे वर्णन ' नर्मदेऽऽ हर हर ' सारखच पुस्तकाला खिळवून ठेवतं. From My Book Shelf :  https://www.facebook.com/photo.php?fbid=1421885838380&l=50d533ec91 BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5275733444709957796?BookName=Sadhanamast

पोकळी

आपल्या भोवतालच्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात एक जागा तयार केलेली असते... आणि ती व्यक्ती अचानक 'नाहीशी' झाली कि आपल्या मनात एक पोकळी निर्माण होते... भयानक पोकळी... छोटंसं विवर वाटावं अशी.. अशी पोकळी कमीही नाही होत आणि दुसरी व्यक्ती भरूही नाही शकत.. त्या पोकळीवर जळमट चढायला लागतात, हळू हळू..  दिवस ढकलत असताना आपण त्या पोकळीकडे दुर्लक्ष करायला लागतो... कधी जाणतेपणी.. कधी अजाणतेपणी.. जळमट वाढतच असतात.. कधी अशाच एकट्या संध्याकाळी विचारांची गर्दी झाली की, मन ती जळमट साफ करण्याचं काम हाती घेत..  आणि पुन्हा जाणवायला लागते ती - पोकळी..

अस्तित्व

कसं ना, व्यक्ती संपली की सगळंच संपतं.. त्या व्यक्तीचे विचार, talent,.. अस्तित्व.. अस्तित्वातच सगळं आलं ना.. काहीच उरत नाही पाठी.. कोणी म्हणेल आठवणी आहेत ना.. त्या काय जिवंत माणसाच्या पण असतातच की.. आपली व्यक्ती थोडीशी नजरेआड झाली की आठवण येतेच ना..! परत त्यात विश्वास असतो की ती व्यक्ती पुन्हा भेटणार.. त्याच्या अस्तित्वासकट.. आणि अस्तित्वच संपलं तर??? ... काहीच उरत नाही पाठी.