Posts

Showing posts from December, 2021

दत्तजयंती २०२१

 💮 दत्तजयंती २०२१ 🛐 ।। श्री गुरुदेव दत्त ।। बऱ्याच महिन्यांनी 'बऱ्याच' कामातून मोकळी झाले. विचार केला थोडं लिहायला बसू, कुठेतरी नवीन जागी भेट सुद्धा देता येईल. त्यासाठी दत्तजयंती चा छान मुहूर्त जुळून आला. २ दिवस अगोदर पासूनच तब्येत नरम - गरम वाटत होती. मनात आलं दत्त महाराज या उत्सवाला माझ्याकडून सेवा करून घेतायेत की नाही! आश्चर्य म्हणजे दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी, संध्याकाळपासून एकदम फ्रेश - प्रसन्न वाटायला लागलं. म्हटलं चला, मस्त बेत आखू. नैवेद्य काय करायचे ती सगळी तयारी करून ठेवली. दत्तगुरूंची आवडती संख्या सात. ७ प्रदक्षिणा घालाव्यात. फुलं ७ संख्येत वाहावीत. तसेच दत्तगुरूंचे ५ अवतार. म्हणून यावर्षी ५ अवतारांच्या आवडीचे ७ पदार्थ करायचे ठरवले ~ 🕉️श्री दत्त : केशरी गोड भात, केशरी दूध 🕉️श्रीपाद श्रीवल्लभ : गव्हाच्या पिठाचा शिरा 🕉️श्री नृसिंह सरस्वती : घेवड्याच्या शेंगांची भाजी 🕉️श्री स्वामी समर्थ : कांदा भजी 🕉️श्री गजानन महाराज : ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा खरं सांगायचं झालं तर दत्त महाराजांनीच माझ्याकडून हे सर्व करवून घेतले 😇 वसई मधील जवळपास सर्व ठिकाणांना specially मं