Posts

Showing posts from July, 2023

महायुग by स्वप्नील सोनवडेकर

Image
पुस्तक : महायुग   लेखक : स्वप्नील सोनवडेकर पृष्ठसंख्या : २०३  https://www.amazon.in/-/hi/Swapnil-Sonawdekar/dp/1685099653 ब्रह्माच्या एका दिवसाला “कल्प” असे म्हणतात. एक कल्प उलटले की महाविनाश घडतो. ब्रह्माचा हा एक दिवस एक हजार महायुगांचा मिळून बनलेला असतो. या एक हजार युगातच चौदा मन्वंतरे घडतात. प्रत्येक महायुग हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा चक्रातून जाते. सत्ययुग चार हजार वर्षांचे, त्रेतायुग तीन हजार वर्षांचे, द्वापारयुग दोन हजार वर्षांचे तर कलियुग एक हजार वर्षांचे असते. याशिवाय यातील सत्य आणि त्रेता, त्रेता आणि द्वापार अशा प्रत्येक दोन युगात मध्यंतरीची काही वर्षे असतात. हा मधला काळ एकूण दोन हजार वर्षांचा असतो. त्यामुळे प्रत्येक महायुग एकंदर बारा हजार वर्षांचे असते आणि ब्रह्माच्या एका दिवसात अशी तब्बल एक हजार महायुगे असतात. म्हणजे ढोबळपणे सांगायचे तर एका मन्वंतरात ४ महायुगे असतात. सद्यकाळातील कल्प हे वराहकल्प किंवा श्वेतवराह कल्प म्हणून ओळखले जाते. ही सगळी माहिती मी का सांगतेय?  तर स्वप्नील सोनवडेकर यांची महायुग कादंबरी  वाचण्याआधी पुराणांची थोडी तोंडओळख असेल तर ही का

Trip Planning for Delhi & Agra

  Trip Planning for Delhi & Agra जातानाची ट्रेन : MAO NZM RAJDHANI (22413) 11:30 | KUDAL | Sun 12.45  |  Ratnagiri  | Sun 19:35 | VASAI ROAD | Sun 12:30 | H NIZAMUDDIN | Mon Approx 24 hours Total Journey AC 3 Tier (3A)  ₹ 2870 येताना ची ट्रेन :  NZM MAO RAJDANI (22414) 06:16 | H NIZAMUDDIN | Fri / Sat 21:43 | VASAI ROAD | Fri  / Sat 03:40 | Ratnagiri |   Sat  / Sun 05:40 | KUDAL | Sat  / Sun Approx 24 hours Total Journey AC 3 Tier (3A)  ₹ 2870 सोमवार दुपारपासून शुक्रवार रात्रीपर्यंत फिरायला वेळ मिळतो. जर ट्रेन late झाली तर मंगळवार - बुधवार - गुरुवार शुक्रवार ४ दिवस फिरायला मिळतील.   शनिवार दुपार ते शनिवार दुपार - ६ पूर्ण दिवस आणि २ अर्धे दिवस  सोमवारी बरेचसे monument बंद असतात 

शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : २

Image
  शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : २  रविवार, १८ जून २०२३   01140 MAO NGP SPECIAL Train कुडाळ ला (०८.४२pm ) सर काका - रजू आत्ये - स्मिता आत्ये बसले. .  रत्नागिरी ला (१२.४0am) अपूर्वा काकी आणि सुजल   बसले.  कालच्या शनिवार पर्यंत जी ट्रिप आम्ही कॅन्सल करणार होतो, ती finally सुरु झाली होती.  रेल्वे च्या इतर special  / फेस्टिवल ट्रेन प्रमाणेच हि ट्रेन कुडाळला जवळपास दीड तास late आली  रात्रौ १०:३० वाजता , रत्नागिरी पर्यंत तरी बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केलं होत. आता शेगाव ला पोहोचेपर्यंत काय होतं य  ते बघायचं होत. परंतु या ट्रेन चा आधीचा रेकॉर्ड पाहता ही train खूप late पोहोचते (जशी आमची दिवा passenger रखडत जाते),  अशी माहिती मिळाली होती.  नशिबाने आम्हाला lower birth मिळाल्या होत्या. कुडाळ ला ट्रेन रात्रौ १०.३० ला पोहोचल्याने पहिले ३ स्टेशन हुन आलेले प्रवासी आमच्या सीट्स वर झोपून आलेले होते. एक बाई जी झोपली होती तिला रजू आत्ये ने उठवायचा प्रयत्न केला पण ती झोपेतच रजू आत्ये सोबत वाद घालायला लागली. पण आमची रजू आत्ये सुद्धा काही हार मानणारी नव्हती 😜 आमच्या कंपूला आपापल्य