Posts

Showing posts from 2020

आज रविवार. आज मस्त आराम करायचा..

Image
 आज रविवार. आज मस्त आराम करायचा.. ... असं शनिवारीच ठरवलं होतं. तो रविवारची पहाट उजाडलीच ती हवेत गारठा घेऊन. मस्त त्या दुलई तुन अंग बाहेर निघत नव्हतं. पण बहिणीला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे तिला सोडायला मला उठणं क्रमप्राप्त होतं. असो, तीला सोडून आल्यावर पुन्हा रजईत शिरायचं असं ठरवून बाहेर पडले. बाहेर जमीन ओली दिसली, अरे एवढं दव पडलंय?? मग लक्षात आलं, दवबिंदू नाही पावसाची रिपरिप आहे ती. 🤦 पण थंडी जशी हवी तशीच 🤗🌨️ घरी येताना वर्तमानपत्र घेऊन आले, नेहमी त्या tv/ मोबाईल वर बातम्या वाचून/पाहून कंटाळा आला होता.  गॅलरी समोर बसून, इत्यंभूत पेपर वाचत, हातातल्या ऊन ऊन चहाचा घोट रिचवत रविवार सकाळची सुरुवात झाली 😍 तासा - दीड तासाने बहिणीचा इच्छित स्थळी पोहोचल्याचा कॉल येईलच तेवढ्यात एक झोप काढून घेऊ म्हणून पुन्हा रजई गुंडाळून घेतली. पण म्हणतात ना, गाढवाला ओझं वाहायची एवढी सवय झालेली असते की एखाद्या दिवशी ओझं कमी झालेल असेल तरी त्याला त्रास होतो 😅 तशी परिस्थिती आहे माझी 😜 जरा स्वस्थ बसलं की कामांची लिस्ट डोळ्यांसमोर दिसायला लागते. घरातली कामं करायला रविवारच तर मिळतो. पण निक्षून

जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर

Image
जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर Middle class किंवा upper middle class कथेच्या नायिकांभोवती रेंगाळणार्या कथा. पहिली कथा आवडली, नंतरची २-३ प्रकरणं वाचल्यावर वाटायला लागलं कथा अर्धवट सोडलेल्या का वाटतायेत?! तरीही पुढच्या कथा वाचत राहिले.. एक ध्यानात आलं खरं.. कथा अर्धवट नाही सोडल्या आहेत, तिथूनच तर खरी कथेला सुरू होणार आहे.. प्रत्येक कथेच्या शेवटाला तो धागा तसाच मोकळा सोडलाय, वाचकांसाठी, विचार करायला.. खरं पाहिलं तर हाच realistic approach नाही का?! नाहीतरी आपल्या आयुष्यातही आपली कथा चालतच तर आहे.. आपण जिवंत असेपर्यंत.. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तिपूरता तो धागा संपतो.. आपला धागा तर आयुष्यभर चालतच असतो..  मला या कथासंग्रह मधल्या ४ कथा खूप आवडला - ●मारियाची बहीण जेन ●नव्या कोऱ्या पांढऱ्या साडीचे एक टोक ●आई नावाची बाई ●मात कथांच्या शेवटचे twist एकदम जबरदस्त आहेत.  ~ सुप्रिया घुडे

1st Day for Office After Lockdown

Image
महिलांसाठी लोकल्स चालू झाल्या त्यामुळे आता ऑफिस ला जाणं क्रमप्राप्त होतंच. गेले आठ महिने पंचक्रोशी च्या बाहेरही न पडलेली मी सीमोल्लंघन करत ऑफिस ला पोहोचणार होती. कालच्या शुक्रवारी अगदी शाळेतला पहिला दिवस असल्यासारखी उत्सुकता. 👧 बाहेर अजूनही कोरोना प्रभाव कमी न झाल्याने स्वतःच्या शरीराची बांधाबांध करून आम्ही लोकल वर स्वार होण्यास तयार ⚔️  तशीही यापूर्वी सुद्धा घरातून बाहेर पडताना अशीच pack होऊन निघायचे म्हणा, आता फक्त त्यात hand gloves ची भर पडली 🤷 किर्ती एक आठवडा अगोदर पासून ऑफिस ला जायला लागून जुनी झाली होती, त्यामुळे माझी कौतुकं तिला याची डोळा पहावी लागत होती 🤦 नंदू सरांना लांबूनच पाय लागू करत, त्यांना follow करत, जबरदस्ती किर्ती कडून स्वतःचा निघताना एक फोटो काढून घेतला 🙆😋😜 station ला पोहोचल्यावर लक्षात आलं, आपणच घरात बसून होतो तर, सगळं जग बाहेर फिरतंय 😁 मग एकेका बायकांचे varieties of masks बघत, आपण बांधलेल्या scarf ची लाज वाटायला लागली, आणि अजूनही मी fashion जगतात खूपच मागासलेली असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली 😝😷👻 तरी नशीब किर्ती ने नवीन style चे मास्क घेऊन ठेवले होते म्हणू

काळेपाणी ~ स्वातंत्र्यवीर सावरकर

Image
 काळेपाणी ~ स्वातंत्र्यवीर सावरकर 'मला काय त्याचे' अथवा 'मोपल्यांचे बंड' या पहिल्या कादंबरी नंतर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' हा आपल्या आत्मचरित्राचा भाग लिहिला होता. ह्या आत्मचरित्रात अंदमानात काळ्या पाण्यावर सश्रम कारावासाची भयानक शिक्षा भोगणार्या राजबंद्यांचे जीवन दिलेले आहे. औट घटकेचे टीचभर हिंदू राज्य ही संकल्पना 'माझी जन्मठेप' मध्ये आलेली आहे. ह्या पुस्तकाचे गुजराती भाषांतर झाल्यानंतर काही राजकारण्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे 'माझी जन्मठेप' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याप्रमाणे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 'माझी जन्मठेप' पुस्तकावर दि. १७ एप्रिल १९३४ ला बंदी घातली. म्हणून सावरकरांनी 'काळे पाणी' ही दुसरी कादंबरी लिहिली. यात त्यांनी अंदमानच्या बंदीगृहातील अत्यंत कष्टकारक, तापदायक, अमानुष गुंडगिरीचे जीवन कसे जगावे लागते होते, ते दर्शविले आहे. हे कथानक एका बंदिवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे. रफीउद्दीन, योगानंद, मालती आदि नावे काल्पनिक असली तरी त्या अभियोगांतील मूळच्या नावाशी   मिळतीजुळती च आहेत. सुप्रसिद्ध गायक

Lockdown मधील पाककृती भाग ३

Image
 Lockdown मधील पाककृती भाग ३ 🍱 भाकरी आणि वांग्याचं भरीत आजची foodstory खास भाकरी साठी आहे 😉 lockdown मुळे कामाला बाई यायची बंद झाली त्यामुळे आमचं चपात्या / पोळ्या खायचं बंद झालं. त्यात आम्ही कोकणातली कायम भात खाणारी माणसं. करायला पण सोयीस्कर. पण डॉक्टरना आमचं ते सुख काही पाहवलं नाही 😁 भात बंद आणि पोळी/ भाकरी खायला सुरू करा म्हणे. झाली का पंचाईत. इथे चपात्या नाही बनवता येत मग भाकरी तर लांबची गोष्ट.  आता वेळ मिळतोच आहे तर थोडाफार जेवण बनवायला शिकूनच घेऊ म्हटलं. आधी चपात्या बघू, घडीच्या नाही फुलके तरी. एक आठवड्यात नाही म्हटलं तरी जम बसला. आणि गेले २-३ महिने मस्त पोळ्या बनायला लागल्या 🤗 या महिन्यात दळण घेताना विचार केला की multigrain पीठ वापरून पाहू. तसं आमच्या चक्की वाली ला सांगितलं, प्रमाण काय ते तुम्ही बघा. पीठ घरी आणलं खरं, पण चपात्या काही व्यवस्थित होईनात. काहीतरी गडबड झाली खरी. पोळी पेक्षा भाकरी च पीठ जास्त वाटतंय. कॉल केला तिला, नक्की कसलं पीठ दिलंत, प्रमाण काय. तर म्हणजे ज्वारी-बाजरी-नाचणी ९०% आणि गहू १०%. 🤦 अहो, मग हे भाकरी च पीठ नाही का झालं. आता काय बोलून उपयोग. चला आता भाक

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर

Image
 बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर विषयदृष्ट्या विचार करता; प्रेमभावना, सामाजिक परिस्थिती, व्यक्तिजिवन, कल्पकता प्रधान कथा, हलकी-फुलकी विनोदपर कथा असे विषय दृष्टीसमोर ठेवून या कथांचे संकलन केलेले दिसते. यातील प्रेमकथेतील नायिका या सामान्य घरातल्या, दुर्दैवी, दारिद्र्यात पिचणार्या, क्वचित अशिक्षित आहेत, परंतु त्यांच्या प्रेमाची जात उंच आहे.  कुसुमाग्रज यांनी अगदी हळुवारपणे प्रेमकथांचे भावकाव्यांशी असलेले ऋणानुबंध दर्शविले आहेत.  समाज जीवनातील परिवर्तनाचा व्यक्तिमनावर होणारा परिणाम दर्शवणारी, मनोविश्लेषण व वास्तव दर्शन यांचा मेळ साधून सामाजिक आशय प्रकट करणारी कथा, हा कुसुमाग्रज यांच्या कथांचा महत्वाचा भाग आहे.  एका ठराविक रिंगणात कथा फिरवत न ठेवता कुसुमाग्रजांनी यांत आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाजूनी विविधता व नावीन्य आणले आहे. कुसुमाग्रजांची ही व्यक्तिचित्रणे निष्ठा मानणारे आणि जपणारे असामान्य माणसे आहेत, आणि यांत पुरुष पात्रांपेक्षा स्त्री पात्रेच अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत, हे खास नमूद करावेसे वाटते.  काव्यमय भाषाशैली हे कुसुमाग्रजांचे सामर्थ्य आहे.  "स्त्रीत्व म्हणजे मानवी जीवन सुगंधि

आम्ही मांजरप्रेमी

 आम्ही मांजरप्रेमी दिवेलागणीला दिवाबत्ती करायला पुढचा दरवाजा उघडायला आणि ही समोर यायला 🐈 गावाला ठीक पण इथे buildings मध्ये देशी मांजर क्वचितच कोणी पाळत असेल, त्यांना त्या विदेशी मांजारांसारखं घरात डांबून नाही ठेवू शकत ना.  ही अचानक पाहुणी कुठून आली कोण जाणो. तिचं म्याव - म्याव सुद्धा घसा बसल्यासारखं वाटलं.  शेजाऱ्यांचा दरवाजा उघडा होता, त्यांना विचारलं - तुमचं आहे काय ओ हे?  ते पण बोलतात - नाही ओ, तिला दूध दिलं तर नाही तोंड लावलंन. मी बिस्कीट दिलं खायला. म्हणजे आमच्याकडे मांजर होतं, तिला आई न चुकता मारी बिस्कीट द्यायची. ठरलेला शिरस्ता. ती आणि तिचं पोर 'चिंगू' चट्टा- मट्टा करायचे. पण हिने नाही खाल्लं. पुन्हा माझ्याकडे बघून - म्याव - म्याव. दुपारची कच्च्या केळ्यांची shallow fry केलेली कापं होती ती दिली. ते सुद्धा नको झालं त्या बाईला, म्हणजे मांजरीला. 🐱 बहीण बोलली - कदाचित non vegetarian असेल. आता तिचा कोणता आवडीचा पदार्थ काय माहीत. आमच्या जुन्या घरात एक मांजर आहे - 'जितू' त्याला टोमॅटो खूप प्रिय. आम्हाला टोमॅटो नेहमी फ्रीज मध्ये ठेवावे लागतात त्यामुळे. बाहेर एखादा चुकून

Baby Sitting

Image
 Baby Sitting आज आम्हा दोघींकडे साधारण ३ तासांसाठी baby sitting च काम होत. म्हणजे तसंही आम्ही कुठेही असलो; इथे किंवा रत्नागिरीत म्हणा, तर जवळपासची लहान पोरं आमच्या घरात असतात. आज आमच्या शेजारील(दांपत्य) घरातलं समान आणण्यासाठी DMart ला जायचे होते. दोघा लहान मुलांना घेऊन या covid परिस्तिथी त बाहेर पडायचं टेन्शन आलेलं त्यांना. त्यामुळे मोठ्या तन्मय ला आमच्याकडे २-३ तासांसाठी सोडून त्यांचं जाऊन यायचं ठरलं. मग तन्मय school ला जातो तसं खाऊ-पाणी घेऊन आमच्याकडे दाखल झाला 😀 माझं तर ऑफिस च काम चालू होतं. माझ्या बहिणीसोबत त्याचं Ludo, साप शिडी, housie खेळून झालं. मग शाळेतल्या- building मधल्या गप्पा गोष्टी झाल्या.  लहान मुलांसमोर काही महत्वाचं बोलू नये, कुठे काही पचकतील सांगू नाही शकत 😀 दुसऱ्या एका शेजारच्या घरातल्या गोष्टी, ज्या त्याच्या आईसमोर बोलून झाल्या असतील, त्या त्याने आम्हाला सांगून टाकल्या 😂 तो आहे north indian परंतु हिंदी, गुजराती, मराठी, इंग्रजी सगळ्या भाषा सरमिसळ बोलतो. आणि आमच्या बहिणीची हिंदी तर इतकी भयानक 😄 त्या दोघांचा चेष्टामस्करी संवाद चालला होता - ती - कोनसे स्टॅण्डर्ड मे ह

पाखरमाया - मारुती चितमपल्ली

Image
पाखरमाया - मारुती चितमपल्ली पुस्तकाच्या नावावरून असं वाटलं होतं की फक्त पक्ष्यांची माहिती असेल. वाचायला सुरू केल्यावर लक्षात आलं; पक्षीच नव्हे तर जलचर, उभयचर, प्राणी, कीटक, आकाश, पर्जन्य, वृक्षसंपदा, अशा कितीतरी गोष्टी आणि त्यासोबत त्यांचे विणलेले अनुभव, या सगळ्यांचा एकत्रित मिलाप म्हणजे 'पाखरमाया' आहे.  मला कॉलेज मध्ये असताना Botony आणि zoology चा अभ्यास करताना nursery आणि poultry च डोळ्यांसमोर यायची, आणि त्यात ते लॅटिन biological नावं लक्षात ठेवायची म्हणजे... चितमपल्ली यांचे हे दुसरं पुस्तक वाचतेय मी, त्यांचे अनुभव वाचताना त्यापालिकडच्या जिवंत निसर्गाची ओढ लागते. महत्वाचं म्हणजे प्राणी पक्षी, वृक्षांची त्यांनी दिलेली मराठी किंवा आदिवासी बोली भाषेतील नावं इतकी साजेशी वाटतात, म्हणजे उगाचच आपण इंग्लिश नावं शोधत असतो असं वाटतं.  आपल्या पूर्वजांना असलेलं विस्तृत, सखोल आणि अचूक ज्ञान आणि त्याचा चितमपल्ली यांनी केलेला अभ्यास श्लोकासाहित दिलेला वाचताना अचंबित व्हायला होतं. चितमपल्ली हे साक्षात वनऋषीच. म्हणतात ना एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात तासभर रहा, सतत नवीन शिकायला मिळतं. तश

गरज

Image
 गरज कपड्यांचं कपाट उघडलं - 'बायकांना नेहमी असं वाटतं, आपल्याकडे कपडे कमीच आहेत. जरी कपाट overflow होत असेल तरीही' - तसंच आता झालं माझं. सहज विचार आला मनात - 'खरंच आपल्याला एवढ्या साऱ्या कपड्यांची गरज आहे काय??' असंच होतं आपलं, कधी कुठे थांबायचं तेच कळत नाही. साठवणूक करत राहतो आपण. मग ती एखादी गोष्ट/वस्तू असो, पैसे असो नाही तर माणसं. या सगळ्याच गोष्टी मोजक्याच ठेवल्या तर नाही का चालणार? तुमचं अस्तित्व संपलं की कुठे हे सगळं तुमच्यासोबत जाणार आहे? नाही कोणती वस्तू, नाही पैसे, नाही माणसं.... माझ्या आई बाबांना नव नवीन वस्तूंचा संग्रह करायची खूप हौस होती. मार्केट मध्ये आलेली प्रत्येक नवीन वस्तू/machine आमच्याकडे  असायची. गरज नसली तरी गरज निर्माण केली जायची. माझा मावस भाऊ आलेला एकदा घरी. आमच्या घरातल्या machines पाहून तो माझ्या आई ला म्हणतो - मावशी तुझाकडे जगातल्या सगळ्या मशीन्स आहेत बहुतेक 😃  popcorns बनवायचं machine, grill sandwich/chicken बनवायचं machine,fruit juice काढायचं machine, घरघंटी, बाजारात आलेली प्रत्येक नवीन भांडी..  माझ्या आईच स्वयंपाक घर म्हणजे एक उत्कृष्ट mus

RIP

Image
  किती सहज झालंय हे रिप रिप (RIP) करणं.. हे असं कुठेतरी RIP लिहायचं आणि मग पुढे स्क्रोल करायचं.. मग पुढच्या पोस्ट ला laughing react केलं तरी चालेल..  वाईट वाटू शकतं, आणि कोणाचंही आयुष्य कोणासाठी थांबत नाही हेही मान्य.. परंतु श्रद्धांजली स्टेटस ला डकवण्यासाठी जी घाई गडबड केली जाते त्याने मन विषणण होतं..  सेलेब्रिटी लोकांसाठी च का, अगदी जवळच्या-घरातल्या व्यक्तीसाठी ही लगेच स्टेटस ला लावायची घाई होते लोकांना.. म्हणजे मला आठवतंय, माझें आई बाबा गेले त्याबद्दल मी कोणाला स्वतःहून काहीही कळवलं नव्हतं.  आता या घटनांना ३-५ वर्षं झालीत, परंतु माझ्यासाठी सगळं कालच घडल्यासारखं आहे. माझ्यासाठी काळ कधीचाच थांबलाय. ज्यांनी स्वतःहून चौकशी केली, माझा खूप दिवस कॉन्टॅक्ट नाही म्हणून ज्यांनी माझी विचारपूस केली होती, त्यांना कळवलं.  ज्यांना दुसरीकडून कुठून कळलं ते बोलले, अगं तू कळवलं नाही आम्हाला!!! मला कमाल वाटते असे प्रश्न विचारणाऱ्यांची सुद्धा. असं कोण broadcast करून सांगतं??  सांगणारे सांगतही असतील. असो, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण समाज कुठेतरी असंवेदनशील होत चाललाय याची राहून राहून खंत वाटतेय.. त्य

Lockdown मधील पाककृती भाग २

Image
Lockdown मधील पाककृती भाग २  • सोयाबीन(chunks) बिर्याणी   • दडपे पोहे  • मलई पेढा  • मालपोहे  • भरलेलं कारलं  • अंडा खांडोळी (कोल्हापुरी street food) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~  • सोयाबीन(chunks) बिर्याणी  मी MTR चा हैद्राबादी बिर्याणी मसाला घेऊन ठेवलाय. कोणताही rice item करायचा म्हटला की १-२ चमचे यातला मसाला घातला की मस्त aroma येतो 🤤 पाणी उकळून घेऊन त्यात वाटीभर सोया chunks टाकले. थंड झाल्यावर पिळून घेऊन, पुन्हा एकदा थंड पाण्यातून काढून पिळून घेतले. त्यांना मीठ चोळून बाजूला ठेवले.  कांदा उभा चिरून तळून घेतला, त्यावर पण थोडं मीठ शिंपडून घेतलं. असा तळलेला कांदा बिर्याणी वर वरून भुरभुरवला  की मस्त चव येते. साधा कोलम rice कूकर ला लावून घेतला. आधीच हवं तेवढं मीठ टाकून घेतलं की मग बिर्याणी बनवताना मीठ वरून टाकायची गरज नाही भासत. एक चमचा तेल टाकलं की भात थोडा मोकळा पण होतो. कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, कढीपत्ता;  सुके मसाले ~ काळीमिरी, वेलची, दालचिनी, लवंग, दगडफुल (अजूनही कोणते घरात available असतील तर ते पण वापरण्यास हरकत नाही 😄); थोडे खलबत्त्यात कुटून घेतलेले;  हळद, मोहरी,

Lockdown मधले पाककौशल्य भाग १

Image
Lockdown मधले पाककौशल्य भाग १ या आठवड्यातले काही पदार्थ, कामामुळे उसंत मिळत नव्हती त्यामुळे फक्त फोटो काढून ठेवले, विचार केला करू नंतर upload. बरं फोटो वाढतच चालले आहेत तर म्हटलं आजतरी photostory टाकू 🙂  • चैत्रान्न ~ पालक पराठा/ठेपले ~ काकडी  • मटार पालक उसळ ~ कोबीची फोडणी घालून पचडी/कोशिंबीर  • कैरीचं लोणचं  • डाळ-भात-लोणचं-बटाट्याची भाजी ~ घरात बनवलेलं आमरस ~ Readymade  • साबुदाणा खिचडी  •  शेवयाची खीर  • चैत्रान्न ~ पालक पराठा/ठेपले ~ काकडी यावर्षी कैऱ्या मिळतील असं काही वाटत नव्हतं. त्यामुळे दरवर्षी चा चैत्रान्न चा नेम चुकणार असाच मनात विचार येत होता, तेवढ्यात इथल्या भाजीवाल्याने कैऱ्या आणल्या. चैत्रान्न साठी ~ हिरव्या मिरच्या, लाल सुकी मिरची, लवंग, काळीमिरी, हिंग, हळद, चमचा भर उडीद डाळ, असतील तर शेंगदाणे किंवा काजू, आल्याचे छोटे तुकडे यांची फोडणी दिली.  त्यात जेवढं आंबट सोसेल तेवढ्या कैऱ्या किसून mix केल्या. त्यात आधी बनवलेलं भात घातला. आणि सगळं छान मिक्स करून गॅस बंद करून झाकून ठेवला. तो aroma आतल्या आत मुरायला हवा. पालक ठेपले ~ एक जुडी पालक चे ३ भाग केले, एकभाग पालक ठेपले बनवण

Work From Home

Image
Work From Home "असं जेवण माया(आमची बाई) रोज बनवेल तर..."  🤤 आज egg बिर्याणी बनवली होती मी, तर ती खाऊन माझ्या बहिणीचे हे उद्गार 🤓 मी - "ती सकाळी येते hardly तासभारसाठी. आपली ऑफिस ला जायची गडबड. ती तेवढयात चपाती, भाजी, कधीतरी आमटी, झाडू-पोछा, भांडी घासणार की जेवण टेस्टी होतंय की नाही ते बघत बसणार.. वेळेअभावी तिच्याकडूनही जास्त अपेक्षा नाही ठेवू शकत" दोन एक वर्षांपूर्वी मीच सगळी कामं करायचे. तेव्हा वेळेत ऑफिस ला येणं-जाणं पण होतं म्हणा. आता जबाबदाऱ्या वाढल्या, तसं वेळेत घरी येणं जमेनासं झालं . त्यात आजारपणामुळे कामाला बाई ठेवणं भागच होतं. तब्येत बरी झाल्यावर तिला काढायचं पण जीवावर आलं, कोणाचं आपल्यामुळे घर चालतंय तर उगाच का ना. त्यात बिचारीचा स्वभाव चांगला, gossiping नाही करत बसत, मग काय, केलं तिला continue. अध्ये मध्ये स्वतःच्या घरचे, लेकाचे lockdown मधले फोटो मला व्हाट्सअप्प वर पाठवत असते ती 😀 पण मुद्दा असा की तिने बनवलेल्या पदार्थांना taste कशी आणायची? 😃 तर सगळीच आम्ही work from home करतोय तर माझ्या बहिणीच मत की "तिलाही तू work from home दे

लेण्यांच्या देशा - रवींद्र गोळे

Image
लेण्यांच्या देशा - रवींद्र गोळे राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।। कवी गोविंदाग्रज यांच्या गीतातील या २ ओळी. महाराष्ट्र ज्यांनी 'पाहिलाय' त्यांनाच उमजतील. लेण्यांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील अग्निजन्य खडक  उपयुक्त आहे. देशात एकूण बाराशे लेणी आहेत. त्यापैकी ८०% म्हणजे ८०० लेणी महाराष्ट्रात आहेत. यावरच लेखक रवींद्र गोळे यांचं हे पुस्तक - 'लेण्यांच्या देशा'. या पुस्तकात महाराष्ट्रातल्या सर्व लेणी समूहाची दखल घेतली आहे. लेखक वाचकाला ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, कलात्मक पार्श्वभूमी देऊन लेण्यांकडे पाहण्याची दृष्टी विकसित करतात.  • लेणी म्हणजे बौद्ध भिक्षूंची विश्रामगृह होती, त्यांना संस्कृतमध्ये लयनम् व प्राकृतमध्ये लेणं म्हणतात. भारतातील पाहिलं ज्ञात लेणं 'बाराबार' हे बिहार राज्यात आहे आणि महाराष्ट्रातील 'भाजे लेणं' हे सर्वांत जुनं आहे.  • लेण्यातील शिल्प, मांडणी यांच्या आधारे लेण्यांची विभागणी ३ गटांत होते - बौद्ध, जैन आणि हिंदू (ब्राह्मणी)  • बौद्ध लेण्यांचे पुन्हा २ प्रकार - विहार आणि चैत

आर्यभट्ट - दीपाली पाटवदकर

Image
आर्यभट्ट - दीपाली पाटवदकर भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन तर्फे 'चित्रमय भारत भारती' हा संकल्प हाती घेतलेला आहे. त्यात काही महान दार्शनिक व आधुनिक शास्त्रज्ञांची चरित्रे चित्रमय स्वरूपात वाचकांसमोर सादर केलेली आहेत. त्यातील एक - आर्यभट्ट. या पुस्तकात माहिती मिळते ती खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ, ५ व्या शतकातील पाहिले आर्यभट्ट यांची. आपल्याला माहीत आहेच की भारताने पहिला उपग्रह अवकाशात सोडला त्याला आर्यभट्टांचे नाव देण्यात आले होते. पुण्यातील IUCCA मध्येही त्यांचा पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो. नैनिताल मधील खगोलशास्त्र संशोधन केंद्रालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. अशा या महान व्यक्तीच्या कार्याची माहिती या पुस्तकात मिळते. आजकालच्या पिढीला भारतीय शास्त्रज्ञांची माहिती क्वचितच असते. त्यामुळे मुलांना वाचण्यासाठी हे उत्तम पुस्तक आहे. आर्यभट्टीय ग्रंथातील  काही मोजके गणितविषयक श्लोक - formulae/theorems खूप छान रीतीने मांडले आहेत. लेखिका दीपाली पाटवदकर यांची प्रत्येक गोष्ट सहजरित्या उलगडून दाखवायची हातोटी त्यांच्या आधीच्या पुस्तकांमध्ये आणि लेखांमध्ये मी पाहिलेली आहे, त्

रोझलिंड फ्रँकलिन - द डार्क लेडी ऑफ डी एन ए

Image
रोझलिंड फ्रँकलिन - द डार्क लेडी ऑफ डी एन ए अनुवाद - वीणा गवाणकर प्रगत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत काय किंवा युरोपीय देशांत काय, स्त्रियांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडले गेल्यावर त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं समान हक्क, समान संधी मिळाल्या असं नाही. अगदी आतापर्यंत स्त्रियांना त्यासाठी झगडावं लागलंय. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तरी हा झगडा तीव्र जीवघेणा कसोटी पाहणाराच होता. विज्ञान क्षेत्रात - विशेषतः गणित आणि भौतिकी - 'पुरुषवर्गाची'च मक्तेदारी होती. गणिती, भौतिकाच्या अभ्यासाने, संशोधनाने स्त्रिया पुरुषी होतात, अशी त्यावेळची सामाजिक धारणा. अशा वेळी स्वतःला शास्त्रज्ञ म्हणून सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञ स्त्रियांना अथक मेहनत घ्यावी लागली. अनेकींच्या बाबतीत तर त्यांचं संशोधन त्यांच्या मालकीचं न ठरता त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या किंवा विभाग प्रमुखांच्या मालकीचं ठरलं; त्यामुळे काहीजणी उच्च श्रेणीच्या पुरस्कारांना मुकल्या. त्यातलीच एक - रोझलिंड फ्रँकलिन (१९२०-१९५८) कोळसा, DNA, RNA, विषाणू या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधक. विज्ञान - जगतापलिकडे ती फारशी कुणाला माही

चकवाचांदण (एक वनोपनिषद) - मारुती चितमपल्ली

Image
चकवाचांदण (एक वनोपनिषद) - मारुती चितमपल्ली एका वन अधिकाऱ्याचे अरण्य कथन म्हणजे चकवाचांदण, हे मारुती चितमपल्ली यांचं आत्मकथन आहे. चकवाचांदण म्हणजे घुबड, म्हणूनच मुखपृष्ठावर घुबडाच चित्र दिसून येतं. एका पारध्याला विचारलं असता तो बोलला होता - "ते पाखरू कलमूहा हाय. रानात सांजेला ते बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो. आमची रानभुल होते. आभाळात शुक्राची चांदणी दिसली की चकवा निघून जातो." - म्हणून चकवाचांदण 🦉 ग्रंथाच्या सुरुवातीला लेखकाने त्यांच्या कुटुंबियांशी ओळख करून दिलेली आहे, ती माहिती महत्वाची ठरते कारण तिथून त्यांना वन्यजीवनाच्या अभ्यासाची प्रेरणा मिळालेली आहे. अम्मा (आई ची आई - आजी) तिला रंगाची चांगली पारख होती. अम्माने रंगांविषयी दिलेल्या ज्ञानाचा फुलांच्या आणि पाखरांच्या रंगाचं हुबेहूब वर्णन करायला उपयोग झाला. अम्माला लिहिता वाचता येत नव्हतं पण पशुपक्ष्यांविषयी तिला खूप गोष्टी माहिती होत्या. त्यामुळे लेखकाच्या ज्ञानात खूप भर पडली. रानाविषयीच लेखकाचं प्रेम अम्मा, माळकरिण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामाने जपलं. शिक्षणात सतत आलेलं अपयश, नैराश्याने आयुष

The Devotion Of Suspect X

Image
The Devotion Of Suspect X 🕵️ अजून एक master peice लेखक  Keigo Higashino. या series मधलं नंतरच novel जे मी आधी वाचलं होतं - The Salvation Of Saint यापेक्षा The Devotion Of Suspect X ची stoty जास्त खिळवून ठेवणारी वाटली मला. A perfect murder thriller. Suspence नाही म्हणू शकत, कारण दोन्ही novels मध्ये suspect आपल्याला पहिल्या chapter मध्येच कळतो. कथा बेतलेली आहे ती murder कसा होतो आणि detectives ही mystery कशी solve करतात यावर. So you may say it'a psychological thriller. हळू हळू प्रत्येक प्रकरणाचे कंगोरे उलगडलेले वाचताना खूप मजा येते. कथेच्या शेवटचा twist तर अफलातून. novel संपूच नये असं वाटतं. It is so great reading when puzzle come together. कथेचा थोडासा जरी plot इथे दिला तर कोणी वाचणारे असतील तर त्यातली मजा निघून जाईल, त्यामुळे मुद्दाम काही mention करत नाहीये. मूळ Japanese Novel आहे. 2017 मध्ये The Devotion Of Suspect X वर चित्रपट सुद्धा release झालाय म्हणे. कथेतली नावं जपानी असल्याने पात्रं लक्षात ठेवायला थोडं जड होतं - युकावा, यासुको, कुसगनी, किषितांनी, इशिगामी, मिसाटो

🙍 अगले जनम मोहे औरत ना किजो 🙅

Image
🙍 अगले जनम मोहे औरत ना किजो 🙅 ♀️♂️♀️♂️♀️♂️♀️♂️♀️♂️ एक पाय injured झाल्याने ती थोडी लंगडतच चालतेय. गपचूप खाली बघत, कारण पुन्हा कुठे धडपडायला नको. हळू हळू ladies compartment जिथे येईल तिथे कूच करत. मुंबई मधलं एक गजबजलेलं स्टेशन असूनही ladies compartment च्या जवळपास थोडा अंधार. त्याचा फायदा त्या विकृत माणसाने नाही घेतला तर नवलच. तिच्या पायाला/ मांडीला त्याचा नकोसा 'स्पर्श'. त्या परिस्थितीतही ती उलटी फिरून त्याच्या त्याच हातावर एक बुक्का मारते. 'त्याला' ते expect नसावं. ती बडबडते. त्या गडबडीत पुन्हा तिचा दुखरा पाय twist होतो. काही दिवसांपूर्वी घेतलेलं women's safety च training ही यावेळी उपयोगी पडत नाही. 'तो' धावत्या ट्रेन ला पकडून पळून जातो. ती फक्त शिव्या देत राहते.. ♀️♂️♀️♂️♀️♂️♀️♂️♀️♂️ 'स्पर्श' - जगातल्या प्रत्येक living creature ला एक दैवी देणगी मिळालेली आहे - स्पर्शज्ञान. प्रत्येक स्पर्शातला फरक आपल्याला कळत असतो - हवासा / नकोसा.. अगदी नजरेतला सुद्धा 'स्पर्श'. त्यातकरून अशा नजरा ज्या तुमचं शरीर चिरून जातात. त्यासाठी बाईचा जन्म