Posts

Showing posts from 2021

दत्तजयंती २०२१

 💮 दत्तजयंती २०२१ 🛐 ।। श्री गुरुदेव दत्त ।। बऱ्याच महिन्यांनी 'बऱ्याच' कामातून मोकळी झाले. विचार केला थोडं लिहायला बसू, कुठेतरी नवीन जागी भेट सुद्धा देता येईल. त्यासाठी दत्तजयंती चा छान मुहूर्त जुळून आला. २ दिवस अगोदर पासूनच तब्येत नरम - गरम वाटत होती. मनात आलं दत्त महाराज या उत्सवाला माझ्याकडून सेवा करून घेतायेत की नाही! आश्चर्य म्हणजे दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी, संध्याकाळपासून एकदम फ्रेश - प्रसन्न वाटायला लागलं. म्हटलं चला, मस्त बेत आखू. नैवेद्य काय करायचे ती सगळी तयारी करून ठेवली. दत्तगुरूंची आवडती संख्या सात. ७ प्रदक्षिणा घालाव्यात. फुलं ७ संख्येत वाहावीत. तसेच दत्तगुरूंचे ५ अवतार. म्हणून यावर्षी ५ अवतारांच्या आवडीचे ७ पदार्थ करायचे ठरवले ~ 🕉️श्री दत्त : केशरी गोड भात, केशरी दूध 🕉️श्रीपाद श्रीवल्लभ : गव्हाच्या पिठाचा शिरा 🕉️श्री नृसिंह सरस्वती : घेवड्याच्या शेंगांची भाजी 🕉️श्री स्वामी समर्थ : कांदा भजी 🕉️श्री गजानन महाराज : ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा खरं सांगायचं झालं तर दत्त महाराजांनीच माझ्याकडून हे सर्व करवून घेतले 😇 वसई मधील जवळपास सर्व ठिकाणांना specially मं

Lockdown मधील पाककौशल्य भाग ८

Image
Lockdown मधील पाककौशल्य भाग ८ Cookpad India मराठी community तर्फे Lockdown मध्ये आयोजित केलेल्या "महाराष्ट्राचे किचन स्टार" स्पर्धे मध्ये मी भाग घेतला होता. आठ आठवडे online स्पर्धा चालली. प्रत्येक आठवड्याला एक challenge, प्रत्येक challenge मध्ये किमान २ पाककृती असं करत सगळे challenges complete केले आणि मेहनतीचं फळ म्हणून माझी TOP १० मध्ये निवड झाली. माझ्यासाठी ही नक्कीच खूप  मोठी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला स्वयंपाकातलं काहीही येत नव्हतं ती महाराष्ट्रातल्या कानाकोपर्या त बनवले जाणारे सगळे पदार्थ करू शकली . या स्पर्धेत सादर केलेल्या सर्व पदार्थांचे फोटो आणि recipe link खाली देत आहे. महाराष्ट्र मधील विविध प्रांतातील पदार्थ ❇कोकण   🔱कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. तांदूळ आणि नारळ हि कोकणातील महत्त्वाची पीकं ! त्यामुळे या दोन्हींचा कोकणी पदार्थात सढळ हस्ताने वापर होतो. तर अशा या दोन घटकांचा वापर करून मी बनवला आहे - नारळी भात. हा मुख्यत्वे श्रावणात नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधन ला बनवला जातो. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून, नारळ देऊन

Lockdown मधील पाककौशल्य भाग ७

Image
 Lockdown मधील पाककौशल्य भाग ७ 🔻Walnut Balls / अक्रोड चे लाडू #walnuttwists अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. विसराळूपणा जास्त जाणवत असेल तर रोज सकाळी ४-५ अक्रोड खावेत. त्यासोबत प्राणायाम व ध्यानधारणा नियमितपणे करावी. यामुळे विस्मरण कमी होऊन बुद्धीवर्धन होते. अशा या अक्रोड चे मी लाडू बनवलेत. लाडू चा बेस म्हणून खोबरं वापरलंय आणि बाईंडींग एजन्ट म्हणून सोबत खजूर चा वापर केला आहे. https://cookpad.com/in-mr/recipes/15027079-walnut-balls-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82-akrod-che-ladoo-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes 🔻मेथांबा https://cookpad.com/in-mr/recipes/15015408-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-methamba-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes 🔻आंब्याचं रायतं  #amr कोकणात आंब्याच्या मोसमात कैरीचे आणि आंब्याचे अनेक पदार्थ केले जातात. त्यातीलच एक "रायतं", चवीला आंबट गोड असतं आणि साध्या जेवणाची लज्जत वाढवणारं म्ह