Posts

Showing posts from November, 2020

जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर

Image
जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर Middle class किंवा upper middle class कथेच्या नायिकांभोवती रेंगाळणार्या कथा. पहिली कथा आवडली, नंतरची २-३ प्रकरणं वाचल्यावर वाटायला लागलं कथा अर्धवट सोडलेल्या का वाटतायेत?! तरीही पुढच्या कथा वाचत राहिले.. एक ध्यानात आलं खरं.. कथा अर्धवट नाही सोडल्या आहेत, तिथूनच तर खरी कथेला सुरू होणार आहे.. प्रत्येक कथेच्या शेवटाला तो धागा तसाच मोकळा सोडलाय, वाचकांसाठी, विचार करायला.. खरं पाहिलं तर हाच realistic approach नाही का?! नाहीतरी आपल्या आयुष्यातही आपली कथा चालतच तर आहे.. आपण जिवंत असेपर्यंत.. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तिपूरता तो धागा संपतो.. आपला धागा तर आयुष्यभर चालतच असतो..  मला या कथासंग्रह मधल्या ४ कथा खूप आवडला - ●मारियाची बहीण जेन ●नव्या कोऱ्या पांढऱ्या साडीचे एक टोक ●आई नावाची बाई ●मात कथांच्या शेवटचे twist एकदम जबरदस्त आहेत.  ~ सुप्रिया घुडे

1st Day for Office After Lockdown

Image
महिलांसाठी लोकल्स चालू झाल्या त्यामुळे आता ऑफिस ला जाणं क्रमप्राप्त होतंच. गेले आठ महिने पंचक्रोशी च्या बाहेरही न पडलेली मी सीमोल्लंघन करत ऑफिस ला पोहोचणार होती. कालच्या शुक्रवारी अगदी शाळेतला पहिला दिवस असल्यासारखी उत्सुकता. 👧 बाहेर अजूनही कोरोना प्रभाव कमी न झाल्याने स्वतःच्या शरीराची बांधाबांध करून आम्ही लोकल वर स्वार होण्यास तयार ⚔️  तशीही यापूर्वी सुद्धा घरातून बाहेर पडताना अशीच pack होऊन निघायचे म्हणा, आता फक्त त्यात hand gloves ची भर पडली 🤷 किर्ती एक आठवडा अगोदर पासून ऑफिस ला जायला लागून जुनी झाली होती, त्यामुळे माझी कौतुकं तिला याची डोळा पहावी लागत होती 🤦 नंदू सरांना लांबूनच पाय लागू करत, त्यांना follow करत, जबरदस्ती किर्ती कडून स्वतःचा निघताना एक फोटो काढून घेतला 🙆😋😜 station ला पोहोचल्यावर लक्षात आलं, आपणच घरात बसून होतो तर, सगळं जग बाहेर फिरतंय 😁 मग एकेका बायकांचे varieties of masks बघत, आपण बांधलेल्या scarf ची लाज वाटायला लागली, आणि अजूनही मी fashion जगतात खूपच मागासलेली असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली 😝😷👻 तरी नशीब किर्ती ने नवीन style चे मास्क घेऊन ठेवले होते म्हणू