Posts

Showing posts from February, 2021

पाककौशल्य भाग ४

Image
पाककौशल्य भाग ४ Grated Coconut - Condensed Milk - Chocolate Roll Actually Facebook वर वेगळी recipe बघताना हा पदार्थ सुचलाय. आमच्याकडे खोबऱ्याचा सदैव सुकाळ त्यामुळे ते कुठे कुठे वापरायच त्यासाठी आयडिया शोधाव्या लागतात. 😁 खोबरं किसून, भाजून, मिक्सर वर बारीक करून पुन्हा कढई मध्ये काढून घेतलं. मंद आचेवर परतत त्यात condensed milk mix करत गेले. यात पण बरेच उद्योग झालेच म्हणा. नेहमी काहीतरी छोटे-मोठे अपघात होतच असतात माझ्या बाबतीत, त्यातलाच हा एक. Milkmaid चा पत्र्याचा डबा होता. त्यातलं उरलेला ऐवज बोटांनी पुसून घ्यायला(एक थेंब पण सोडत नाही आपण, संसारी ना 😋) आणि आतली sharp edge दोन बोटांच्या मध्ये घुसत हात चिरायला, एकच क्षण. लगेच नळाखाली धरला पण रक्त काही थांबेना. खूप आत घाव गेलेला. बेसिन मध्ये रक्त. मूर्खासारखं त्यावर बर्फ धरला आणि रक्त काळं पडायला लागल. बहिणीने गूगल करून पाहिलं तर बर्फ नाही लावायचा, हळद लावून घाव घट्ट धरायचा(opposite to gravitational force). मग बऱ्याच वेळाने थांबलं रक्त. bandage करून मग पुढची procedure केली 😬 तर हे condensed milk घातलेले खोबरं गॅस बंद करून कोमट झाल्यावर त