Posts

Showing posts from 2018

धन्य ती Gynaec कला - डॉ. मीना नेरुरकर

Image
धन्य ती Gynaec कला - डॉ. मीना नेरुरकर डॉ. मीना नेरुरकर यांच्या विषयी सांगावं तेवढं कमीच आहे. Gynecologist, actor, director, author, playwright, dancer and choreographer, एकच व्यक्ती आयुष्यात एवढे सारे role करू शकते, हे बघून कमाल वाटते आणि अभिमान सुद्धा. http://www.meenanerurkar.com/about.html दादर, महाराष्ट्रात शिकून सध्या अमेरीकास्थित लेखिकेच as a Gynecologist म्हणून अनुभव कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. अमेरिका आणि भारतातील cultural difference, आचार-विचार याचं लीलया वर्णन लेखिकेने केलेलं आहे. लहानपणी स्वतःच्या सावळ्या रंगाबद्दल असलेला न्यूनगंड अमेरिकेत गेल्यावर कसा कमी झाला, तिथे तुमच्या कामाला कसं प्राधान्य दिलं जातं, याबद्दल लेखिकेने सांगितले आहे. अमेरिकन lifestyle चा एक मंत्र आहे - You have one life to live. So do whatever you want. As long as you do not hurt others, go ahead and live your life to the fullest. They take complete pride in whatever work they do. आणि अमेरिकेच्या उन्नतीचं हेच मुख्य कारण आहे. लेखिकेचे अमेरिकेतील डॉक्टरी पेशातील patients handle ...

मार्जारगाथा - रुपाली पारखे - देशिंगकर

Image
मार्जारगाथा - रुपाली पारखे - देशिंगकर जेव्हा don एक dialogue बोलतो - I love wild cats,मुझे जंगली बिल्ली बहोत पसंद हैं.. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक रानमांजर येतं नेहमी. परंतु त्या रान मांजरात सुद्धा अजून प्रकार आहेत, ते मार्जारगाथा वाचून कळलं. मी एक hardcore मांजरप्रेमी असल्या कारणाने हे पुस्तक घेतलं, आणि त्यात बरीच रंजक माहिती मिळाली. मांजरांचे विविध प्रकार, त्यांचं राहणीमान, जीवनशैली,  एकूणच मार्जारकुळाची माहिती या पुस्तकात मिळेल.  Discovery Tai चं लिखाण मी नेहमी Day To day nature मधून वाचत आलेली आहे, ताई ची लेखनशैली जबरदस्त आहे, त्यामुळे तीच मार्जारगाथा हे पुस्तक सुद्धा माहिती देण्याच्या बाबतीत अजिबात निराश करत नाही. लहानथोर सर्वांनी वाचावं अशी ही मार्जारकुळाची महितीपुस्तिका आहे. साप्ताहिक विवेक च्या Sub-Editor - शीतल खोत यांनी पुस्तक माझ्या पर्यंत पोचण्यासाठी खूप मदत केली, त्यांना मनापासून धन्यवाद!

Wall Panting - Warali Painting

Image
गेले एक दीड वर्षं फक्त मातीच्या रंगाचं background भिंतीवर रंगवून ठेवलं होतं. येता-जाता पावणे-रावळे सगळे विचारायचे, काय करायचं ठरवलंय इथे.. सगळंच गुलदस्त्यात.. त्यात घरात असे प्रसंग घडत होते की हातात brush घ्यायची इच्छा ही होत नव्हती.. या आधी एक wall painting हातात घेतलं होतं, तेव्हा brush तसंच ठेवून दिलं, त्यानंतर कधी आई आली तेव्हा रंगाने कडक झालेलं brush बघून खूप रागावली, म्हणे वडिलांकडून फक्त कला घेतली, थोडी अक्कल पण घ्यायची, बाबा बघ काम झालं की कसे रंग-brush, सगळ्या जागच्या जागेवर वस्तू.. मागच्या वर्षी बाबांच्या वर्ष श्राद्धाला घरच्या garden wall वर wall painting केलं होतं. रस्त्यावरून जाणारे सगळे विचारायचे आई ला, कोणाकडून करून घेतलं, आईला माझं कौतुक - "माझ्या मोठ्या लेकीने केलंय.." . . शेवटी काल ठरवून हे रखडलेलं काम पूर्ण करायचं ठरवलं.. 4 festivals of india in Warali ( वारली ) painting.. सलग चार तास लागले पूर्ण करायला.. . . . सगळं काम झाल्यावर रंग, स्वच्छ केलेलं brush जागच्या जागेवर.. आता आवरून देणारं कोणी नाहीये.. आणि कौतुक करणारं माझं माणूस पण राहिलेलं ...

घर - अंगण : दीपाली पाटवदकर

Image
घर - अंगण : दीपाली पाटवदकर स्त्री कितीही careeristic असली तरी घरातली कामं काही तिचा पिच्छा सोडत नाहीत. म्हणजे मला आठवतं, मी आई ला नेहमी बोलायचे, तुला कंटाळा नाही येत घरात एकसारखं राबायला, मी तर अजिबात अशी घरातली कामं नाही करत बसणार, एखादी कामाला बाई लावेन हवं तर. त्यावर आई चं उत्तर ठरलेलं असायचं, आपल्या घरातली कामं करायला कसला कंटाळा. आणि या गोष्टीचं प्रत्यय मी स्वतः घर घेतल्यावर आला. वर वरच्या कामाला जरी बाई लावलेली असली, तरीही माझी घरातली कामं काही चालूच असतात. स्वतःचा संसार म्हणून आपोआप घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आवड निर्माण व्हायला लागते.. अशाच छोट्या छोट्या गोष्टींचं अनुभव कथन केलेलं आहे लेखिकेने या पुस्तकात. त्यामुळे आपसूकच या गोष्टींशी आपण नकळत जुळले जातो.. दुसरं घराचं प्रत्यंग म्हणजे - अंगण. सध्याच्या flat संस्कृतीत अंगणाच रूपांतरण gallery मध्ये झालेलं आहे म्हणा. पण अंगण म्हटलं की आमची आधीची कौलारू घरं आठवतात (typical कोकणी 😇). त्यासमोरच ऐसपैस अंगण, तिथे मांडलेले खेळाचे डाव, गप्पागोष्टी, सहभोजन, काय आणि काय.. अर्ध आयुष्य त्या अंगणातच गेलं असेल.. लेखि...

वास्तव रामायण - डॉ. प. वि. वर्तक

Image
वास्तव रामायण - डॉ. प. वि. वर्तक रामायण - महाभारत म्हटलं की आजच्या पिढीला त्यातल्या गोष्टी अतिशयोक्ती वाटू लागतात. लढाईत होणारे बाणांचे वर्षांव, जादू वाटावी असे निरनिराळे होणारे चमत्कार, वानर किंवा पक्षी कसे काय माणसांत मिसळून लढाई करू शकतात. आजच्या पिढीला या सगळ्या गोष्टी अतर्क्य वाटू लागतात, मग वाटत आपणही इतके वर्षं या अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास कसा काय ठेवला?? परंतु रामायणा वर practical approach ठेवून डॉ प. वि. वर्तक यांनी लिहिलेला 'वास्तव रामायण' हा शोधनिबंध वाचून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतात -- ∆ खगोलशास्त्राचा अभ्यास करून निश्चित केलेला रामायणाचा कालखंड (** तरीही यावर बर्याच लोकांची दुमत आहेत) ∆ रावण हा खरंच दहा तोंडाचा नसून ते ek machine असावं जे machine लढाई मध्ये रावण स्वतः वापरत असावा ∆  हनुमान, वाली सुग्रीव - जटायू हे प्राणी नसून प्राणी-पक्ष्याचा वेष धारण करणारी जमात असावी, कारण अजूनही अशा आदिवासी जाती - जमाती जगात अस्तित्वात आहेत. ∆ पाताळ म्हणजे दक्षिण अमेरिका असावी, राक्षस हे विषुववृत्तीय प्रदेशातील लोक असावेत. सिलोन किंवा श्रीलं...

तुंबाडचे खोत श्री. ना. पेंडसे

Image
तुंबाडचे खोत - जगबुडी नदीच्या च्या किनाऱ्यावर वसलेली खोत घराण्याची चार पिढ्यांची द्विखंडी कहाणी. पेशवाईच्या उत्तरार्धा पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या कालखंडांत खोतांचा सगळा जीवनपट पुरा होतो. या कादंबरीतील एकमेव भारावून टाकणारं व्यक्तिमत्व वाटलं मला ते म्हणजे - नरसु खोत. क्षुद्र बुद्धीच्या लोकांना त्याने कधीच भाव दिला नाही. दिलदार माणूस, चुलत भावंडं नेहमी जळत, कुरघोडी करत राहिले त्यावर, तरी त्याने त्याकडे लक्ष दिला नाही, त्यांना तो अक्षरशः खेळवत राहिला. परंतु हीच लोकं संकटं आल्यावर नरसु कडे धाव घेत, आणि मदत मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्याने कधीच माघारी पाठवलं नाही. हा नरसु जगला त्यात शान होती! परंतु आयुष्यात चढ-उतार असायचेच. अशा राजस प्रकृतीच्या माणसाला आयुष्याच्या उत्तरार्धात अपमान, चरित्र्यावरचे उडालेले शिंतोडे सहन करावे लागले. तरी त्याचा मृत्यू 'शान से' व्हायचा होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा तो काळ. नरसुने मामलेदार काचेरीवर काँग्रेस चा झेंडा फडकवला आणि घोषणा दिल्या - "इंग्रजानो चालते व्हा - छोडो हिंदुस्थान-" आणि पोलिसांनी आदेश दिला - ...

विकास

Image
(वरील photo Flavours Restaurant, Ratnagiri येथील आहे) आपण किती भले मोठे शब्द वापरत असतो. विकसनशील भारत, देशाचा विकास, वगैरे वैगैरे.. परंतु हे सगळं करताना, आपण समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चाललोय का?? ∆१४-नोव्हेंबर-२०१८∆ माया लेकाला-संयोग ला घेऊन सकाळी आली घरात कामाला. संयोग शाळेच्या गणवेशात नव्हता. म्हटलं "काय ग, आज colourful day आहे काय ग शाळेत?" माया - "काय तरी बाल दिन आहे म्हणे, त्यासाठी" <काय तरी बाल दिन>??!! 🙄😑 तिला विचारलं - "तुम्हाला महित आहे, बाल दिन काय आहे?" "माहित नाय, संयोग ला शाळेत नवीन कपडे घालून यायला सांगितलंय.." तिला तरी काय बोलणार म्हणा.. आदिवासी पाड्यातली पोरं शाळेत जायला लागली हीच मोठी गोष्ट आहे.. . . समोरच्या idot box वर आरक्षणावरून गदारोळ चाललेला दिसतोय. आणि कीर्ती माझी तंद्री भंग करायला विचारतेय - "खरं आरक्षण तर या आदिवासी लोकांना मिळायला हवं ना ताई??!" मी - "....." ∆पुन्हा एकदा अशीच घाई गडबडीची सकाळ∆ सकाळी tv वर बातम्या सुरू केल्या शिवाय माझा दिवस सुरू होत नाही. का...

आयुष्यात काय कमावलं?

Image
"किशोर घुडे यांची मोठी लेक बोलतेय का? sorry हा, तुमचा आवाजच नाही ओळखला मी." "sorry काय त्यात, तेवढं रंगाचं काम..." "रंगाचं काम होऊन जाईल, साफ-सफाई पण सगळी करून ठेवतो, तुम्ही येण्या अगोदर" "पैशांचं कसं करू सांगा, कोणाकडे transfer करायचे.." "पैशांचं काय घेऊन बसलात. तुमच्या आई बाबांशी खूप चांगले संबंध होते आमचे, तुम्ही आल्यावर बघू, कामाचं काही टेन्शन घेऊ नका, ते सगळं करतो मी.." काय बोलावं पुढे तेही सुचेना मला. आई-वडिलांची पुण्याई म्हणजे काय याची पदोपदी जाणीव होतेय हल्ली. आई बोलायची, माणसं ओळखायला शिक, नेहमी चांगली माणसं जोडावी. बाबा माझे सरळ माणूस, त्यामुळे कोणालाही जवळ करायचे. अनावधानाने वाईट माणसांना जवळ करून बरेच 'चांगले' अनुभव आले आम्हाला, तो विषय वेगळा 😣 पण आई - बाबांनी बरीच माणसं जोडली. कधी विचित्र वागलेच तर आई बडबडायची - "आई-वडिलांनी जेवढं कमवलंय ते टिकवायचं आणि वाढवायचं बघा" आता त्याचा अर्थ समजायला लागलाय. आता कोणी येऊन बोललं - "तुमच्या आई-वडिलांचे खूप उपकार आहेत आमच्यावर, खूप मदत केली त्य...

गणेश चतुर्थी २०१८

Image
या माणसाने आमचा जीव टांगणीला लावला होता, गणेश आगमनाच्या दिवशी, चतुर्थी ला.. संयोग - मायाचा लेक. १२-सप्टेंबर-२०१८ माया नेहमीप्रमाणे सकाळी आली कामाला माझ्याकडे.  माया ची कामं आटोपेपर्यंत नेहमी खेळत राहणारा तिचा लेक आज गपचूप खुर्चीत बसून झोपलेला बघून आश्चर्य वाटलं, तिला विचारलं तर कळलं ताप येतोय. मग माझंच अंथरूण घालून दिलं त्याला, झोपलं लेकरू. १३-सप्टेंबर-२०१८ सुट्टी नव्हती आम्हाला ऑफिस मधून त्यामुळे रत्नागिरी न जाता गणेशोत्सव इथेच होता, म्हटलं माया आली तर बाकी कामं आटोपेल, मी मोदक करायला घेईन. पण ११ वाजले तरी काही तिचा मागमूस नाही, वाटलं लेकाला बरं नाहीये म्हणजे येणार नाही बहुतेक. आता तब्येतीचं कारण काढून उपयोग नव्हता, खायला हवं तर आचारी बनायची तयारी हवी 😀  डाळ - भात - बटाट्याची भाजी केली आणि मोदकाची तयारी सुरू केली. तेवढ्यात माया लेकाला घेऊन दारात हजर. म्हणते तुम्ही आवरलं का सगळं, संयोग ला बरं नाही तर सकाळीच dr कडे जाऊन आले. आता माझं काम आटोपलं होतं, पण बाकीच्या घरात जायचं होतं, लेकाला बरं नसताना कुठे घेऊन फिरणार म्हणून दिवसभर संयोग ची baby sitting माझ्याकडे, म्...

THREE THOUSAND STITCHES - Sudha Murty

Image
THREE THOUSAND STITCHES - Sudha Murty ORDINARY PEOPLE, EXTRAORDINARY LIVES Book consists of 11 short stories of real life experiences of Chairperson of the Infosys Foundation. Three thousand stitches : writer wanted to help Devasasis to come out of their miserable life, but instead; those devadasis unwelcomed her with chappals and tomatoes, but after much efforts writer got successful to rescue and rehabilitate 3000 devadasis of Karnataka and in return those women gift her a unique gift - a quilt embroidered by each one of the women, i.e. with THREE THOUSAND STITCHES How to beat the boys : it's writers own story of her engineering college days. That time no girl used to go for these stream, but writer took admission as she was the only girl in that college, survived with taunts and problems faced by other students and finally completed the course. She had told that how this experience helped her in future. Food for thought : writer went to one of h...

रोज, काहीतरी नवं

(क्रमशः) ०० लग्न करायचं?? का? लग्न करायचं,... ते इच्छा अपेक्षांचं ओझं एकमेकांवर लादयचं, आयुष्यभर.. त्या अपेक्षा आणि संशयांमध्ये मारुन टाकायचं एकमेकांना.. लग्न करायचं म्हणे.. लग्न करून पुन्हा एक नवीन जीव जन्माला घालायचा? का? त्या जीवाला सुद्धा या यातना सहन करायला? त्या जीवाला जन्माला घालायचं; दुःख हाल अपेष्टा टक्के टोमणे सहन करायला? पुन्हा मनुष्ययोनीत जन्माला घालायचं त्या नवीन जीवाला? ०० कधी पाहिलाय, काही घटकांचा खेळ.. मी पाहिलाय.. काही घटकांचं आयुष्य मोजताना पाहिलंय.. काही क्षणांत आयुष्य बदलताना पाहिलंय.. माणसंही बदलताना पाहिलीयेत, काही क्षणांत.. काही क्षणांत आयुष्य संपताना पाहिलंय.. तुम्ही पाहिलाय..., असा.... काही क्षणांचा खेळ..... ०० हाच तो क्षण. या क्षणाला तू श्वास घेतेय, कदाचित याच क्षणी दुसरीकडे कोणीतरी शेवटचा श्वास घेत असेल. तर, आता आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची तक्रार करणं सोडून दे. हा क्षण आनंदानं जगून घे.. कदाचित हा क्षण शेवटचा असेल.. कदाचित तुझा.. कदाचित माझा.. ०० ती रडतेय, म्हणे माझी मुलगी 8 महिन्याची असताना गेली, माझ्या लेकाला बही...

भिन्न - कविता महाजन

Image
भिन्न - कविता महाजन 'एड्स' हा गाभा, या गाभ्याभोवती फिरणाऱ्या 'भिन्न' व्यक्तिरेखांच्या नजरेतून साकारलेली ही कादंबरी. भिन्न वाचून मन सुन्न नाही झालं तर नवल. एड्स या आजाराविषयी आधीच एवढे समज-गैरसमज आहेत, कि या बद्दल खुलेपणाने चर्चा होणं दूरची गोष्ट. २००५ च्या आकडेवारीनुसार जगात आजपर्यंत एकूण ३ कोटी ८६ लाख HIV ग्रस्त आहेत, आणि २८ लाख लोक एड्स ने मरण पावले आहेत. ही आकडेवारी आटोक्यात आणण्यासाठी एकमेव उपाय आहे, समाज प्रबोधन आणि HIV ग्रस्त रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचं आहे. HIV च्या प्रसारणाचं मूळ जातं वेश्या आणि तृतीयपंथीयांकडे त्यामुळे साहजिकच समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकूणच वाईट आहे. पण खरंच त्यांना या आजाराविषयी काहीच माहित नाहीये का, का ही लोकं आपल्यासारखे चांगली कामं करून पोट भरू शकत नाहीत, याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण लेखिकेने या कादंबरीत केलेलं आहे. कादंबरी वाचून झाली कि आपोआप समाजाच्या या घटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. वेश्या असोत, तृतीयपंथीय असोत, समलिंगी संबंध ठेवणारे असोत, drug addict असोत... त्यांच्य...

विंचूर्णी चे धडे - गौरी देशपांडे

Image
विंचूर्णी चे धडे - गौरी देशपांडे विंचूर्णी - फलटण, साताऱ्याच्या जवळील एक छोटंसं गाव. माळरान असल्याने विंचू खूप, म्हणून तसं नाव. लेखिकेची बहीण- मेहुणे तिथे राहायला असल्याने ती सुद्धा तिथे एक छोटंसं घर बांधते. आणि हळू हळू मांजर, कुत्रे, मेंढ्या, छोटे मोठे प्राणी यांच्यासोबत, नवरा, मुलं, नातवंड, पावणे - रावळे सांभाळत; विंचूर्णी - पुणे - मुंबई - हॉंगकॉंग प्रवास, तसेच लेखन काम सांभाळत; लेखिका तिथलीच एक होऊन जाते.  विंचूर्णी ला राहायला असताना, घरातली/बाहेरची काम करायला येणाऱ्या तिथल्या गावातीलच व्यक्ती आणि वल्लींच्या कथा/व्यक्तिरेखा या पुस्तकात वाचायला मिळतात.  मला खास आवडलेल्या व्यक्तिरेखा - बॉन्स बिलाबॉंग, गोरखची गोष्ट, नानींची नवलकथा, आणि बाकी पण सगळ्याच ☺️ पुस्तकांत अध्ये-मध्ये असलेली रेखाचित्रे कथेला खास उठाव आणतात. गौरी देशपांडे च्या इतर पुस्तकांपेक्षा हे एक वेगळ्या पठडीत बसतं, आणि कदाचित याचं लेखन आयुष्याच्या पन्नाशीत वगैरे केलेलं असावं. पुस्तक वाचताना, लेखिकेने तिथल्या गावात बदल घडवून आणण्यासाठी केलेले छोटे - छोटे प्रयत्न, in general सरकारी...

माया

Image
माया Compulsory bed rest म्हटल्यावर घरात काही काम करण्याचा प्रश्नच उरत नव्हता. मी स्वतः आता कुठे जेवण बनवायला शिकलेय, त्यामुळे किर्ती कडून चपात्या वगैरे बनवण्याची अपेक्षा करणं तर दूरची गोष्ट 🙊  आई-वडिलांनी केलेल्या लाडाचे दुष्परिणाम आता आम्हा दोघींना भोगावे लागणार आहेत, हे कळून आम्ही चुकलेलो होतो 😧 आता खरी शोधमोहीम सुरू होणार होती - mission कामवाली बाई 💃 शेजारीपाजारी, society committee members सगळ्यांना आधीच whatsapp messages धाडून मोकळी झाले होते - urgently in need of housemaid. 🙏 तरीही लवकरात लवकर घरी पोहोचणं गरजेचं होतं, नाही म्हटलं तरी दुसर्याच्या शोध मोहिमेवर किती अवलंबून राहणार. Discharge मिळताच काही दिवसात; मी सर काका, आत्ये, काकी, किर्ती, सुजल अशा सगळ्या लवाजम्या सकट घरी पोहोचले. बाई कशी शोधायची यावर आमच्यात बरीच खलबत सुरू झाली.  आत्ये आणि कीर्ती ने तर ठरवलं होतं, समोर येईल त्या स्त्री ला विचारायचं - "तुमच्याकडे बाई येते का कामाला??! " 😑 जवळच आदिवासी पाडे आहेत, तिथे जाऊन विचारून यायचं का असा पण विचार मांडला गेला. सुदैवाने दुसऱ...

तेरुओ आणि कांही दूरपर्यंत

Image
गौरी देशपांडे च्या प्रत्येक कथेमध्ये प्रेमाचे निरनिराळे कंगोरे पाहायला मिळतात.  तेरुओ  आणि कांही दूरपर्यंत २. कांही दूरपर्यंत मृत्यू हेच एक अखेरचं सत्य. मरण जवळ येताना आयुष्याचे बांधलेले ठोकताळे. '...आयुष्याच्या शेवटीच स्वार्थत्याग फोल वाटतात, सुटलेल्या संध्या सोनेरी वाटतात आणि घडलेले मुर्खपणे महामुर्खपणे वाटतात...' ' कांही दूरपर्यंत' कथा आहे नात्यांची. नात्यातल्या आपलेपणाची. आपलेपणाने आपल्या जवळच्या व्यक्तीला होऊ घातलेल्या सुरक्षिततेच्या कवाचाची. कथा  एकदा वाचली .. धागा मिळेना, का असं शीर्षक.. पुन्हा.. पुन्हा वाचली.. मग काहीतरी गवसलं खरं.. कथा संपताना विचारात येणारं अवघडलेपण, आदर्शस्थानाला गेलेला तडा, त्यामुळे विखुरलेले मनाचे तुकडे, सांडलेले तुकडे ओंजळीत गोळा करण्यासाठी केलेली धडपड कांही.. कांही दूरपर्यंत... १. तेरुओ.. नवरा - 'जनक'  सोबत 'ती' जपान ला येते. तिथे कथा २ समांतर रेषेवर सरकते - 'जपान व संस्कृती' आणि 'जपानमध्ये भेटलेला तेरुओ'. जपान मधील थंडी, तिथल्या बार मधील वरिष्ठ 'ममासान', हि...

नक्षत्रांची फुले

Image
नक्षत्रांची फुले आकाश आणि प्रकाशाच्या गोष्टी लेखिका : दीपाली पाटवदकर आकाशदर्शन इतक्या सहज सोप्या भाषेत कोणीच समजावलं नसेल. लेखिकेची विषय समजावण्याची सहज पद्धत चित्र ज्ञानेश्वरी च्या वेळीच लक्षात आली होती. परंतु आकाशदर्शन सारखा गहन विषय day to day life मधील examples शी निगडित असू शकतो हे 'नक्षत्रांची फुले' वाचून च लक्षात येत. मुखपृष्ठावरील स्वतः भोवती असंख्य तारका लपेटून स्वतः मध्येच मग्न होऊन नाचणारी आकाशगंगा पाहून, 'बदन पे सितारे लपेटे हुए' गाण्याची आठवण होते (किंबहुना हे गाणं ऐकलं तर मला लेखिकेच्या आकाशगंगेची आठवण होईल यापुढे नेहमी...). लेखिकेने २७ निरनिराळ्या उदाहरणातून आकाशाशी निगडित माहिती समजावलेली आहे. त्यातल्या मला जास्त आवडलेल्या कथा - चंद्रा तुझी कोर कशी, समुद्र मंथन, उत्तर आकाश, हर हर गंगे (गंगा आणि आकाशगंगा यांची घातलेली सांगड तर उत्तम), हृदयी हरी नांदतो, आशिर्वाद(टिळकांच्या संदर्भात असल्यामुळे असेल कदाचित 😊). आई मुळे मला आकाश निरीक्षणाची आवड लागलेली होती, आता या पुस्तकामुळे अजून गोष्टी clear झाल्या आहेत. आई नाहीये आता, तीला हे पुस्तक व...

भरलेल्या मिरच्या

Image
ओलं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट भरलेल्या मिरच्या It happens, when you are a Kokani but try to follow Marathwada Receipe from the internet 😝 So I finally settled with my own Receipe ✌😎 सारण : ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, बेसन पीठ, हळद, गरम मसाला, हिंग, जिरं, ओवा, धणे, मीठ - सुप्रिया घुडे

१. चतुर लाली मांजर २. बकरीचं पिल्लू ३. कोकलू कोल्हा ४. बेडूक काका ५. सामसूम वाघ

Image
लोककथेंवर आधारित असलेली बालचमुंसाठी,  कविता महाजन यांच्याकडून ५ पुस्तकांची ही खास भेट. १. चतुर लाली मांजर - चिनी लोककथेवर आधारित २. बकरीचं पिल्लू - छत्तीसगढ मधील लोककथेवर आधारित ३. कोकलू कोल्हा - आफ्रिकेमधील लोककथेवर आधारित ४. बेडूक काका - व्हिएतनाम मधील लोककथेवर आधारित ५. सामसूम वाघ - आफ्रिकेमधील लोककथेवर आधारित आजकाल मराठी वाचन करणारी लहान पिढी सापडणं थोडं कठीणच आहे. परंतु पालकांना या गोष्टी Bedtime Stories म्हणून आपल्या मुलांना वाचून दाखवता येतील. प्रत्येक पुस्तकात त्या-त्या प्राण्यांची वैशिष्ट्य आणि वैविध्यपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, त्यामुळे मुलांसोबत पालकांच्या ही सामान्य ज्ञानात बरीच भर पडेल. पुस्तकांच्या शेवटी; origami, मुखवटे, रेखा चित्रांची कृती सुद्धा दिलेली आहे.  त्यामुळे लहान मुलांना gift देण्यासाठी उत्तम पुस्तकांचा संच आहे हा! 👍 - सुप्रिया घुडे

खजूर - खोबऱ्याचे लाडू

Image
🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄 ...स्त्री चे सौंदर्य जसे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते, तसं तिचे सुगरणपण तिच्या हातापेक्षा खाणार्याच्या जिभेवर असतं, असं म्हणायला हरकत नाही. खाणारा जर कौतुक करून खाणारा असेल आणि चूक सुद्धा प्रेमाने पोटात घालणारा असेल, तर तिला उत्तमोत्तम करून खाऊ घालावेसे वाटेल. मग ती उपजत नसली, तरी प्रयत्नाने सुगरण होईल!... - पुस्तक : घर - अंगण (खवैय्या पृ. क्र. २४)  लेखिका : Deepali Patwadkar 🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄🔄 खजूर - खोबऱ्याचे लाडू १. १०० ग्रॅम किंवा २० ते २५ खजुराच्या बिया काढून खजूर एका कढईत मॅश करून घेणे. २. ४ वाट्या सुके खोबरे किसून ठेवावे. ३. १ वाटीभर (आवडीनुसार प्रमाण ठरवावे) गूळ किसून घ्यावा. ४. कढईत २ चमचे गायीचे शुद्ध तूप गरम करून, मंद आचेवर खजुराचा गर गरम करावा, त्यात किसलेले सुके खोबरे थोडे थोडे मिक्स करत काविलत्याने ढवळत राहावे. ५. ड्रायफ्रूटस चे बारीक तुकडे (बदाम, काजू, बेदाणे, इतर.) मिश्रणात घालावे आणि पुन्हा ढवळत राहावे. ६. मिश्रण एकजीव झाले की कढई आचेवरून काढून मिश्रण थंड होऊ द्यावे. ७. तयार मिश्रणाचे छोटे लाडू बनवून त्यावर द...

नामशेष

खरंच देव आहे?? कदाचित देव सुद्धा नामशेष झालाय कधीच,.. dinosaurs सारखा.. Dinosaurs नामशेष होण्यास बरीच कारणं होती, उल्कापात, हिमयुग वगैरे.. देवाला नामशेष तर माणसानेच केलं आहे.. - सुप्रिया घुडे १४-एप्रिल-२०१८

बदल

"बदल" Local train मधील संवाद - बाई १ - लहानपणापासून काम कारत्येय.. जीवाला सुख काय त्ये बा न्हाई. बाई २ - माझं पन काय त्येच बाई.. यत्ता सहावी नापास.. पाचवी पास झाल्यावर माय ने शेतात कामावर धाडायला सुरुवात केली. मग कसली सहावी पूर्ण करत्येय मी.. बाई १ - कुटे न्हाय काम केलं विचार. पडेल ती कामं केली. धुणी भांडी केली. आता जीव थकला.. बाई २ - खरंच, मी पण ब्यांकेत साफ सफाई ला होते. आता ठरवलं. लेकीला माज्यासारकी जिंदगी नको. तिला खूप शिकवनार. पंधरावी तरी करायला लावनार. बाई १- अक्षी खरं बोलली बाई तू... ता. क. - बदल घडतोय 😇😇😇 12-APR-2017 ©SKG - City Through My Eyes

Today's ज्ञान #1

Image

कुठेतरी वाचलेले - २

Image
भूतकाळाच्या उदारातच भविष्यकाळ जन्माला येत असला तरी भविष्यकाळाच भवितव्य भूतकाळाला ठरविता येत नाही. कालचक्र कधीच थांबत नाही. घटना घडत जातात. वर्तमान काळातून भूतकाळाकडे पाहताना गतगोष्टी चूक की बरोबर ठरवू पाहतो. पण जी गोष्ट आपणाकडून घडविली जाते ती दुरुस्त पण करता येत नाही. समजतं, पण उमजत नाही. आपण सारे जगत असतो. समाधान किंवा पश्चाताप करत राहतो. काळ पुढे सरकत असतो. उद्याचा भविष्यकाळ आजचा वर्तमानकाळ होतो आणि आजचा वर्तमानकाळ भूतकाळात जमा होतो. मनुष्यप्राणी बदलाच्या अपेक्षेने भविष्यकाळाची वाट पाहात असतो... - चिरंजीव... अश्वत्थामा पृष्ठ क्र.५५ (लेखक - शंकर टिळवे)