1st Day for Office After Lockdown




महिलांसाठी लोकल्स चालू झाल्या त्यामुळे आता ऑफिस ला जाणं क्रमप्राप्त होतंच. गेले आठ महिने पंचक्रोशी च्या बाहेरही न पडलेली मी सीमोल्लंघन करत ऑफिस ला पोहोचणार होती. कालच्या शुक्रवारी अगदी शाळेतला पहिला दिवस असल्यासारखी उत्सुकता. 👧 बाहेर अजूनही कोरोना प्रभाव कमी न झाल्याने स्वतःच्या शरीराची बांधाबांध करून आम्ही लोकल वर स्वार होण्यास तयार ⚔️ 

तशीही यापूर्वी सुद्धा घरातून बाहेर पडताना अशीच pack होऊन निघायचे म्हणा, आता फक्त त्यात hand gloves ची भर पडली 🤷

किर्ती एक आठवडा अगोदर पासून ऑफिस ला जायला लागून जुनी झाली होती, त्यामुळे माझी कौतुकं तिला याची डोळा पहावी लागत होती 🤦

नंदू सरांना लांबूनच पाय लागू करत, त्यांना follow करत, जबरदस्ती किर्ती कडून स्वतःचा निघताना एक फोटो काढून घेतला 🙆😋😜

station ला पोहोचल्यावर लक्षात आलं, आपणच घरात बसून होतो तर, सगळं जग बाहेर फिरतंय 😁

मग एकेका बायकांचे varieties of masks बघत, आपण बांधलेल्या scarf ची लाज वाटायला लागली, आणि अजूनही मी fashion जगतात खूपच मागासलेली असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली 😝😷👻 तरी नशीब किर्ती ने नवीन style चे मास्क घेऊन ठेवले होते म्हणून, मी तर अजूनपर्यंत घरातून बाहेर पडताना ते ८ महिने जुन्या style चे हिरवे मास्क वापरायचे 🙎🤦

किर्ती ने घरातून निघताना मला अगदी पढवून पाठवलं होतं - "अकरा च्या आधी ट्रेन मध्ये चढू नको. पहिली भरलेली ट्रेन असेल ती सोडून दे. भुयारी मार्ग बंद आहेत, bridge एकच चालू ठेवलाय(तरीही हे वाक्य मी विसरलेच होते आणि गोल गोल फिरत बसले स्टेशन ला 😒). तिकीट काढायला विसरू नको नाहीतर पळशील तशीच. महत्वाचं म्हणजे खोकू/शिंकू नको, लगेच सगळे संशयाने बघतात 😆"

😃😄😅

परंतु आता खरंच भीती वाटते, कोण जाणो आपल्या शेजारी कोणी carrier बसली असेल. 😟आपल्यामुळे घरातल्यांना त्रास नको 😞 प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे म्हणा, कामं थांबवून कशी चालतील??!! 😐

आजही प्रवास करताना Contagion मधला dialogue आठवतोय -

""Don’t talk to anyone, don't touch anyone. Stay away from other people.""

😷😷😷


#MaskUpIndia #indiafightscovid19together

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन