पाककौशल्य भाग ४

पाककौशल्य भाग ४


Grated Coconut - Condensed Milk - Chocolate Roll



Actually Facebook वर वेगळी recipe बघताना हा पदार्थ सुचलाय. आमच्याकडे खोबऱ्याचा सदैव सुकाळ त्यामुळे ते कुठे कुठे वापरायच त्यासाठी आयडिया शोधाव्या लागतात. 😁

खोबरं किसून, भाजून, मिक्सर वर बारीक करून पुन्हा कढई मध्ये काढून घेतलं. मंद आचेवर परतत त्यात condensed milk mix करत गेले.

यात पण बरेच उद्योग झालेच म्हणा. नेहमी काहीतरी छोटे-मोठे अपघात होतच असतात माझ्या बाबतीत, त्यातलाच हा एक. Milkmaid चा पत्र्याचा डबा होता. त्यातलं उरलेला ऐवज बोटांनी पुसून घ्यायला(एक थेंब पण सोडत नाही आपण, संसारी ना 😋) आणि आतली sharp edge दोन बोटांच्या मध्ये घुसत हात चिरायला, एकच क्षण. लगेच नळाखाली धरला पण रक्त काही थांबेना. खूप आत घाव गेलेला. बेसिन मध्ये रक्त. मूर्खासारखं त्यावर बर्फ धरला आणि रक्त काळं पडायला लागल. बहिणीने गूगल करून पाहिलं तर बर्फ नाही लावायचा, हळद लावून घाव घट्ट धरायचा(opposite to gravitational force). मग बऱ्याच वेळाने थांबलं रक्त. bandage करून मग पुढची procedure केली 😬

तर हे condensed milk घातलेले खोबरं गॅस बंद करून कोमट झाल्यावर त्याचे छोटे रोल केले. chocolate spread एका वाटीत घेऊन त्यात काही थेंब दुधाचे टाकले आणि थोडं पातळ करून घेतलं, जेणेकरून ते रोल liquid chocolate मध्ये चांगले लडबडून जातील. मग हे रोल फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे. आणि कधीही गोड खायची इच्छा झाली की ही कोकोनट-chocolate बर्फी गट्टम करायची 🤤🌰🍫

०२~जानेवारी~२०२१


मटार पुलाव



थंडी सुरू झाली की मटार स्वस्त होतात. लगेच फसबुक वर मटार करंजी चे फोटो फिरायला लागतात 😁 विचार केला, आपण सुद्धा बनवायची. पण काही मुहूर्त मिळेना. आणलेले मटार खराब होण्याआधी खाऊन टाकलेले बरे. मसालेदार काही नको म्हणून हिरव्या मसाल्याचा पुलाव करायचा ठरवलं. आत्ये एकदा बोलली होती - "नेहमी ते लाल तिखट वापरण्यापेक्षा कधी एकदा पुलाव मसाला वापरून बघ. लाल मसाला हा पदार्थाची चव मारून टाकतो."  अरे हो, खरच की. पण पुलाव मसाला नव्हता. चला काहीतरी जुगाड करू. 

काळी मिरी, दालचिनी, लवंग, बडीशेप कुटून घेतले. तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, मिरच्या ची फोडणी दिली. त्यात कुटलेला मसाला टाकला. मटार चांगले परतून घेतले या मसाल्यात. मीठ टाकून थोडं अजून परतायचं. मग शिजवलेला भात घालून एक वाफ काढायची. मटार पुलाव तयार 🤤

२३~जानेवारी~२०२१


पनीर मटार पुलाव 



मटार अजूनही उरलेले होते, मसालेदार जास्त खायचं नव्हतं. Recent रत्नागिरी visit मध्ये श्रीकृष्ण गृह उद्योग चे २ उत्तम मसाले मिळाले - ब्राह्मणी गोडा मसाला आणि मसालेभाताचा मसाला. नाचणे रोड ला जाताना चा मारुती मंदिर च्या बस स्टॉप ला एक डेअरी आहे. तिथे छान मराठी / ब्राह्मणी पदार्थ मिळतात. 

आई वडील असले की जेवण बनवायच टेन्शन नसतं. आता दोघेही गेल्यानंतर, एक दोन दिवसांसाठी आलो की काकी कडे हक्काचं पान टाकतो आम्ही. यावेळचा आमचा मुक्काम थोडा जास्त दिवसांचा होता, त्यामुळे घरीच जेवण बनवायचं ठरलं. म्हणून मसाले घ्यायला इथे थांबलो तर तिथली बाई बोलली - "आमचे मसाले try करून पहा, माझी सासूच बनवते." खरच मसाले अप्रतिम. पुन्हा गेले रत्नागिरी ला की तिला compliment देऊन येणार आहे 😊



तर तेच २ मसाले वापरून बनवलेला हा पनीर मटार पुलाव.

२४~जानेवारी~२०२१


केळीचा शिरा 



हे आपलं सहजच. केळी होती, तर केळीचा शिरा खायची ईच्छा झाली, म्हणून 🤤😋

२४~जानेवारी~२०२१


मसाला गूळ



https://fb.watch/32p-BPh90M/

👆 Recipe I referred.

Masterchef Pankaj Bhadouria यांची एक छान रेसिपी मिळाली.

Absolutly healthy Masala Gud, loaded with dryfruits.

त्यात माझे स्वतःचे variation एवढेच की मी त्यात बारीक किसलेले खोबरं टाकलं. (कोकणातल्या लोकांचं खोबर्याशिवाय पान काही नाही हलत 😝) 

कधीतरी असंच तोंडात गोड टाकावंस वाटतं, त्यासाठी हा पदार्थ बनवून ठेवायचा. पौष्टिक.. उगाच ती बिस्कीट खाण्यापेक्षा 👍

०६~फेब्रुवारी~२०२१


Prawns तवा फ्राय



मला seafood खायला आवडतं, पण ते मार्केट मधून घेऊन यायचं, bargain करायचं, त्यात ते ताजे असेलच की नाही ते कळत नाही त्यामुळे मी कधीच जाऊन घेतलं नव्हतं. हल्ली आत्येने याबाबतीत थोडं सांगितलं - माझे कसे ताजे ओळखायचे, मासेवाली कशी ओळख करून ठेवायची म्हणजे ती कधी खराब मासे देणार नाही, वगैरे. धीर करून काल जाऊन चिंगळं आणली, साफ करून स्वच्छ धुतली. मऊ पडलेली नाही, फ्रेश वाटली. लिंबू मीठ लावून फ्रीझर मध्ये ठेवली. आज सकाळी आलं,  लसूण, मिरची, कोथिंबीर paste आणि मसाला, हळद लावून तासभर maronate केली. आणि तवा फ्राय केली, यम्मी 🤤🦐

०७~फेब्रुवारी~२०२१


या महिन्याभरातल्या Food Stories 😊 नुसती रेसिपी सांगण्यात अर्थ नाही, त्यामागची कहाणी महत्वाची 🤗


अशी ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.. 😊☺️

~ सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन