शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : २

 शेगाव : कारंजा लाड : माहूर :
लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : २ 

रविवार, १८ जून २०२३ 


01140 MAO NGP SPECIAL Train


कुडाळ ला (०८.४२pm ) सर काका - रजू आत्ये - स्मिता आत्ये बसले. . 
रत्नागिरी ला (१२.४0am) अपूर्वा काकी आणि सुजल बसले. 
कालच्या शनिवार पर्यंत जी ट्रिप आम्ही कॅन्सल करणार होतो, ती finally सुरु झाली होती. 
रेल्वे च्या इतर special  / फेस्टिवल ट्रेन प्रमाणेच हि ट्रेन कुडाळला जवळपास दीड तास late आली रात्रौ १०:३० वाजता
, रत्नागिरी पर्यंत तरी बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केलं होत. आता शेगाव ला पोहोचेपर्यंत काय होतंय ते बघायचं होत. परंतु या ट्रेन चा आधीचा रेकॉर्ड पाहता ही train खूप late पोहोचते (जशी आमची दिवा passenger रखडत जाते), अशी माहिती मिळाली होती. 

नशिबाने आम्हाला lower birth मिळाल्या होत्या. कुडाळ ला ट्रेन रात्रौ १०.३० ला पोहोचल्याने पहिले ३ स्टेशन हुन आलेले प्रवासी आमच्या सीट्स वर झोपून आलेले होते. एक बाई जी झोपली होती तिला रजू आत्ये ने उठवायचा प्रयत्न केला पण ती झोपेतच रजू आत्ये सोबत वाद घालायला लागली. पण आमची रजू आत्ये सुद्धा काही हार मानणारी नव्हती 😜 आमच्या कंपूला आपापल्या सीट्स मिळाल्या शेवटी. 

दुसऱ्या दिवशी जेव्हा ती सहप्रवासी बाई उठली तेव्हा स्मिता आत्ये ला सांगायला लागली -."  एवढी गाढ झोप लागली होती, मला वाटलं मी घरीच आहे. म्हणून मी झोपतेच ओरडले. मी नाही उठणार तुम्ही जा तिथे जाऊन झोपा " 😂😆😅

तिला वाटलं तिचा नवराच आलाय तिला उठवायला 😝😆 

असो.. प्रवासात काहीतरी गमती जमाती घडायच्याच 😋


Unprofessional Behavior of Ola Driver 

मी आणि किर्ती दुसऱ्या दिवशी कल्याण स्टेशन ला चढणार होतो ट्रेन मध्ये.. माझ्या घराकडून कल्याण लांब आहे त्यामुळे  मी रात्री किर्ती कडे राहायला जायचा निर्णय घेतला. घरातली कामं आटोपून  लवकर निघायचं आणि ट्रेन पकडून दुपारी जेवायलाच किर्ती कडे पोहोचायचं असा विचार केला होता. 

मग लक्षात आलं, आज रविवार. आज मेगाब्लॉक. त्यात मला आवरून घरातून निघायलाच दुपारचा एक वाजला. तरी नाही म्हणायला पाठीवर एक ट्रेकिंग बॅग आणि हातात एक खाऊने भरलेली पिशवी होती.



तरी या २ बॅग्स उचलून ट्रेन मधून जायला जाम कंटाळा आला होता त्यामुळे ओला बुक करायची ठरवली. 

नेहमीप्रमाणे पहिली एक ride समोरून ड्राइवर नेच कॅन्सल केली. दुसऱ्या ride ला ड्राइवर ला कॉल करून विचारलं, जाणार आहे कि कॅन्सल करणार आहेस आधीच सांग. उगाच माझा timepass नको.
पण तो बोलला - "जायेंगे ना, उसमे क्या हैं". 



जून मध्ये पाऊस सुरु होईल असा विचार करून आम्ही या महिन्यात ट्रेन बुकिंग केली होती. परंतु दर वर्षी पाऊस लांबणीवरच चालला आहे. भर दुपारी ओला ची वाट बघत स्किन करपायला लागली होती. मी पुणेकर मुलींसारखा चेहरा झाकून घेतला आणि ओला कार ची वाट पाहत उभी राहिले. याच उष्णतेत विदर्भात आम्ही जाणार होतो, या विचाराने आताच धडकी भरली होती. 😐 आता काय, जायचं ठरलं आहेच, बघू काय होतं ते.. 

कार मध्ये बसल्यावर आधी ड्राइवर ने मला विचारलं कॅश देणार ना. म्हटलं हो देईन. मग बोलतो - "आप ride कॅन्सल करदो, वैसे हमे कंपनी को commission नही देना पडता, हमारा फायदा होता है."
मी काही ride कॅन्सल नाही केली, करायची तर त्याला करू देत.मी का Rs. ५०/- cancellation फी देऊ.. आणि ride कॅन्सल केली आणि काही प्रॉब्लेम झाला तर कंपनी कडे क्लेम सुद्धा नाही करू शकत. त्यामुळे मी एकटी प्रवास करत असताना तरी असले प्रकार करत नाही. 

कार मध्ये बसल्या-बसल्या या ड्राइवर च्या तोंडाचा पट्टा चालू झाला. अरे गाडी चालवायचं काम करा ना, का कस्टमर च्या पर्सनल गोष्टींची माहिती हवी असते.
मी आधी किर्ती ला कॉल लावला आणि कार मिळाल्याचं कळवलं, मग सर काकांना कॉल लावला, त्यानंतर स्मिता आत्ये ला कॉल लावला .. मी मराठीत बोलतेय बघून त्याचे अजून वर प्रश्न - "आप मराठी हो? मराठी मोमेडिअन हो? वो आपने  दुपट्टासे चेहरा ढक लिया है  ना इसलिये पूछा .. " 😰

अरे काय प्रॉब्लेम आहे ह्या माणसाला??? नाही दाखवायचा मला माझा चेहरा ... 😖😠😡

त्याने मला पूर्ण प्रवासात दोनदा पाणी पिणार का विचारलं. मी म्हटलं आहे माझ्याकडे.
तो कार अक्षरशः ४० च्या स्पीड ने चालवत होता. म्हटलं असो, इथे ट्रॅफिक आहे त्यामुळे हळू चालवत असेल.
२-अडीच तसंच रास्ता अशा स्पीड ने कधी संपणार होता काय माहिती..
मध्ये पेट्रोल भरण्यासाठी कार थांबवली आणि त्याने मला request केली कि ७००/- रुपये द्या मग भाड्यातून वळते करा. कार च भाडं १२००/- दाखवत होत. म्हटलं ठीक आहे. मी पेट्रोल पंप वर ७००/- दिले.पुन्हा आमची गाडी निघाली. आता रस्ता बऱ्यापैकी रिकामा झाला होता, आता तरी स्पीड वाढवं. शेवटी त्याला विचार
च - "तुमची गाडीची स्पीड ४० च्या वर जात नाही का??!!"
 त्यावर त्याच काहीही उत्तर नाही. 

मी मॅप लावून च ठेवला होता, हे ड्राइवर ला हि माहिती होतं . माझी live लोकेशन मी  किर्ती ला व्हाट्सएप्प वर share करून ठेवली होती. आता पोहोचायला ३३kms  उरले होते तेव्हा त्याने मला विचारलं, किती किलोमीटर दाखवतोय मॅप मध्ये. म्हटलं ३३kms, तर म्हणतो -  "पोहोच जायेंगे फिर जल्दी"

आणि पुढे जाऊन त्याने गाडी थांबवली. बॉनेट उघडून काहीतरी खाडखूड केली आणि म्हणाला - गाडी बंद पडली आहे पुढे नाही जाऊ शकत. 

मला वाटलं माझाच नशीब खराब. 😞 त्याची कार अशा ठिकाणी बंद पडली होती highway ला कि मला पटकन दुसरी ride मिळणं सुद्धा शक्य नव्हतं. 😟

मी माझ्या बॅग्स highway ला बाजूला काढून ठेवल्या आणि ऑटो मिळते काय बघायला लागले. तोपर्यँत तो ड्राइवर तंबाखू मळत मला दुसरी गाडी मिळतेय काय ते बघत होता आणि त्याची कार बॉनेट उघडून आ वासून उभी होती 😠

तेवढ्यात एक रिक्षावाला थांबला. त्याने सांगितले  ४००/- होतील. म्हटलं तू मला घरापर्यंत सोड. बस्स एवढीच अपेक्षा आहे. माझा लवाजमा घेऊन मी रिक्षात बसले आणि त्याला बोलले त्याची कार बंद पडली म्हणून ... 
तर तो रिक्षावाला लगेच बोलला - "लगेच त्याची कार चालू होईल बघा. चालू असतात हि लोक. त्याला पुढे जायचं नाहीये म्हणून त्याने तुम्हाला इथे मध्येच सोडलं असणार. तुम्हाला आता इथे दुसरी गाडी सुद्धा मिळाली नसती ... "
😧😧😧😧
मग मला सगळी लिंक लागली. 
सुरुवातीला बसल्यावर तो मला ride कॅन्सल का करायला सांगत होता.. 
आपल्याकडचं पाणी देऊ केलं.. 
आधीच ७००/- रुपये पेट्रोल साठी मागून घेतले, कारण मध्ये वाटेत सोडलं कि कस्टमर पैसे नाही देणार, मग जेवढे मिळतायेत तेवढे घेऊन ठेवायचे. 
३०kms अंतर राहिलेलं असताना त्याने मला विचारलं किती डिस्टन्स बाकी आहे, मॅप तर त्याच्याकडे सुद्धा चालू होता... 
😰😰😰😰😰😰
ohh my god ... ओला उबेर ने सुद्धा फिरायची सोय राहिलेली नाहीये. ही बाहेरची लोक इथे पैसा कमवायला येतात.. त्यांना काय कुठे माणुसकी पडलेली आहे.. 
😯😯😯😯
एक वाजता मी घरातून निघाले होते.. आता साडे तीन वाजत आले होते, तरीही मी अनोळखी ठिकाणी भरकटत होते. 😕😔
एवढा राग डोक्यात गेला होता.. त्या ड्रायव्हर चा कि स्वतःचा.. काय माहित..
मेगाब्लॉक म्हणून ओला ने यायचं ठरवलं होत. काय झालं असतं जास्तीस्त जास्त, ट्रेन late म्हणून स्टेशन ला माणसांच्या गर्दीत बसून राहिले असते, अशी अनोळखी ठिकाणी भरकटत तरी नसते राहिले .. 😠
अक्षरशः पुढील अर्धा ते पाऊण तास मी शांत बसून जेवढं डोकं शांत ठेवता येईल तेवढा प्रयत्न करत होते. 😡😡😡
डेस्टिनेशन ला पोहोचल्यावर त्या रिक्षा वाल्याना  ५००/ - रुपये देऊ केले. तसेही १२००./- ओला कार च्या भाड्याचे जायचे होतेच. परंतु महत्वाचं म्हणजे हे रिक्षा वाले दादा वेळेवर देवासारखे समोर आले आणि त्यांनी घरपर्यंत सुखरूप सोडलं. 
😞
परंतु यावरून परत विचार करण्यासारखी गोष्ट जाणवली - खरंच एकटी बाई सुरक्षित आहे का? प्रत्येक वेळी कोणी सोबत नाही असू शकत. अशा वेळी कोणावर विश्वास ठेवणार आणि कोणावर नाही ???!!! 
😷

(क्रमशः)
~सुप्रिया घुडे 

भाग : १ https://supriyaghude.blogspot.com/2023/06/blog-post.html

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे