Posts

The Breadwinner

Image
The Breadwinner by  Deborah Ellis मराठी अनुवाद : अपर्णा वेलणकर Breadwinner - a person who earns money to support their family, typically the sole one. कुटुंबाचा पोशिंदा "... आता तू माझी बेटी पण आहेस आणि बेटा पण, परवाना." - अब्बु तालिबान्यांनी अफगाण काबीज केल्यानंतर, हजारो विस्थापित कुटुंबांपैकी एका कुटुंबातील एक मुलगी - परवाना. सर्वत्र स्त्रियांवर बंधने असताना, ११ वर्षांची लहान मुलगी; केस कापून, मुलांचे कपडे घालून, कमावून आणून स्वतःच्या कुटुंबाला सांभाळणारी. वय वाढलं तरी तिचं शरीर खुरटंच. तालिबान्यांच्या नजरेला खुपेल असं अजून काहीच शरीरावर उभारलं नव्हतं; त्यामुळे बाई असूनही परवाना रस्त्यावर पाऊल ठेवण्याचा गुन्हा करू शकत होती... तालिबानी हे मूळचे अफगाणच. पण देशाचा कारभार कसा करावा याबद्दल त्यांच्या स्वतःच्या काही विकृत कल्पना होत्या. 'तालिबान' या शब्दाचा खरा अर्थ 'धर्मचरणाचं अध्ययन करणारा विद्यार्थी'. धर्म माणसाला उन्नत होण्याची, अधिक चांगला माणूस होण्याची प्रेरणा देतो; दया, करुणा या भावना माणसांमध्ये निर्माण करतो. याउलट तालिबानी अल्लाचं...

जैतापूरची बत्ती - मधु मंगेश कर्णिक

Image
जैतापूरची बत्ती - मधु मंगेश कर्णिक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल या पुस्तकात लेखक श्री. कर्णिक यांनी; विचारपूर्वक, गंभीरपणे, व्यापक दृष्टिकोनातून, सकारात्मक खुल्या मनाने लिहिले आहे. त्यासाठी त्यांनी बराच अभ्यास केलेला दिसून येतो. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांना भेटी देऊन त्याबद्दल सर्व बाजू मांडल्या आहेत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रकल्प नको म्हणणाऱ्यांमध्ये स्थानिक लोक व त्यांना मार्गदर्शन करणारे बाहेरचे म्हणजे प्रकल्पक्षेत्राच्या बाहेरचे लोक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सरकार तर 'प्रकल्प उभारणारच' म्हणते आहे. वैज्ञानिक ही त्यांची सकारात्मक बाजू मांडताहेत. सामान्य माणूस मात्र यामध्ये गोंधळलेला आहे. त्याला चोवीस तास वीज हवी आहे. पण प्रदूषण, किरणोत्सर्ग याला तो घाबरतो आहे. खरे काय आणि खोटे काय याबद्दल तो संभ्रमित आहे. अणुऊर्जा प्रकल्पाची भीती जशी सर्वसामान्य कोकणवासीयांना; जैतापूर, माडबन, साखरी, नाटे येथील ग्रामस्थांना वाटत आहे तशी मला पण वाटते. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ मी खुद्द रत्नागिरीकर. जैतापूर आमच्यासाठी लांब नाही. पण आंदोलन सुरू झाल्यापासून social media वर जे ...

भाज्यांची खरेदी

Image
भाज्यांची खरेदी भाज्यांची खरेदी ही पण एक कला आहे. 😊🌿🥕🥔🍆🌶️ बाजारात गेलं, ४ भाज्या उचलून आणल्या असं नाही होतं. त्या ४ भाज्या सुद्धा विचार करून त्यातल्या त्यात best कोणती ते select करणं, यामागे सुद्धा मोठी तपश्चर्या असते 😋 मी दर शनिवारी अथवा रविवारी आठवडाभरचा जिन्नस/भाज्या घेऊन येते. सुरुवात होते सामानाच्या यादीपासून. कांदे, बटाटे, टोमॅटो, मिरच्या, आलं, कोथिंबीर हे key items संपताक्षणी लागलीच घरात भरावे लागतात. बाकी आठवड्याचे दिवस ७, रविवार सोडून बाकी ६ दिवस टिफिन बनवायचा असेल तर मग ठरवायचं - कडधान्य किती दिवस, फळभाज्या किती दिवस आणि पालेभाज्या किती दिवस बनवायच्या. एकदा हे final झालं की त्याप्रमाणे कापडी पिशव्या घेऊन भाजी बाजारात पाऊल ठेवायचं. 🙅 एकदा संपूर्ण भाजी मार्केट पायी चालून reiki करून घ्यायची. त्यामुळे कोणकोणत्या भाज्या बाजारात आल्या आहेत ते लक्षात येत. कोणत्या भाजीवाल्याकडे कोणती भाजी चांगली आहे ते note down करायचं (मनात 😋). Reiki करता करता किमती पण विचारून घ्यायच्या, त्याप्रमाणे quality, quantity आणि price या सगळ्यांचा ताळमेळ घालून काय घ्यायचं आज, त...

Points to be considered before Tree Plantation

Points to be considered before Tree Plantation 🌱🌳🌱🌳🌱🌳🌱🌳🌱🌳🌱🌳🌱🌳🌱 As soon as rainy season get started everyone plans for tree plantation. The awareness of tree plantation is spreading among the people which is a good sign, That we should take care of our mother nature. From oxygen to breathe, food to eat and clean water to drink... Mother Nature gives so much to us. But in return what we are giving back? Pollution? Disturbing her ecosystem? Of course we can’t stop this kiosk. As we need progress. But at least we may reduce this, by maintaining what we have. If we can’t plant new trees, at least we can take care of old ones. And if you wish to plant new trees, then I would suggest you to go for indigenous plants only. 🌳 Why indigenous plants?? Indigenous means -> Thing originating or occurring naturally in a particular place.  Things produced, growing, living, or occurring naturally in a particular region or environment; Native. Have you observ...

आस्तिक ~ नास्तिक

Image
आस्तिक ~ नास्तिक संध्याकाळी दिवे लावण्याची पूर्वापार परंपरा आहे. पुढच्या दारी लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक, तुळशी पाशी एक आणि मागल्या दारी अवदसा येऊ नये म्हणून एक.. का बरं सुरू केली असेल ही प्रथा.. संध्याकाळची कातरवेळ.. धड दिवस नाही, धड रात्र नाही.. अशी संधीप्रकाशाची वेळ खरं तर पहाटे पण असते, पण संध्याकाळचा तो मनाचा जडावलेपणा पहाटे नाही जाणवत.. संध्याकाळ होत आली की आसमंतात उरून राहते ती एकांतातील अनामिक हुरहूर.. ती मरगळ घालवण्यासाठी दिवेलागणीची प्रथा सुरू झाली असावी.. आणि एखादी गोष्ट धार्मिकतेशी जोडली की लगेच पचनी पडते.. संध्याकाळची घरी असेन तर मी पण लावते दिवे.. लहानपणापासून घरातल्या बायकांना पाहत आल्यामुळे अंगवळणी पडलं असेल, कदाचित. आवड आहे, असंही काही नाही. देवासाठी लावते, अशातलाही काही भाग नाही. कदाचित सवय.. खर तर आई गेल्यावर घरातल्या सगळ्या देवाचं विसर्जन करणार होते मी, पण नाही केलं, का नाही केलं, माहीत नाही. बाबा गेल्यावर आई सुद्धा यंत्रवत देवाची पूजा करायची, दोष देत बसायची (देवाला की नशिबाला, कोण जाणे!), पण तिनेही पूजा नाही सोडली, का नाही सोडली, माहीत नाही. दीड वर्ष झ...

Mangalorean Ripe Mango Curry

Image
Mangalorean Ripe Mango Curry   तयारी   वाटण Final Product 🤤 गेल्या वर्षी आणि या वर्षी, दोन्ही वेळेला लोणचं करायचा काही मुहूर्त मिळाला नाही. यावर्षी तर कैऱ्यांचे वाट पाहून त्यांचे आंबे तयार झाले. आता season चे शेवटचे आंबे न खाता त्याचा दुसरा काहीतरी पदार्थ बनवायचा म्हणजे हिम्मत लागते (का ते अस्सल आंबा प्रेमीनाचं विचारावं). मग मिळाली एक receipe - mangalorean ripe mango curry https://myfoodstory.com/mangalorean-ripe-mango-curry-recipe/ अजून कोणाकडे आंबे राहिले असतील तर try करायला हरकत नाही 😋

Warali painting on earthen pot : 3rd and last from my bucket 😊

Warali painting on earthen pot : 3rd and last from my bucket 😊 This beautiful hand made earthen pot is made by HAS-Studio Pottery And painting on it done by me. A Warli painting contains all the events of the past, the stillness of the present and the possibilities of the future within it. Its greatest attraction is its lack of pretentiousness in conveying the profound: it is done through simple folk symbols drawn with bold, easy strokes and uncluttered with none but the most minimal colors since none is needed to draw attention to their message.