जैतापूरची बत्ती - मधु मंगेश कर्णिक

जैतापूरची बत्ती - मधु मंगेश कर्णिक




जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल या पुस्तकात लेखक श्री. कर्णिक यांनी; विचारपूर्वक, गंभीरपणे, व्यापक दृष्टिकोनातून, सकारात्मक खुल्या मनाने लिहिले आहे. त्यासाठी त्यांनी बराच अभ्यास केलेला दिसून येतो. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांना भेटी देऊन त्याबद्दल सर्व बाजू मांडल्या आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रकल्प नको म्हणणाऱ्यांमध्ये स्थानिक लोक व त्यांना मार्गदर्शन करणारे बाहेरचे म्हणजे प्रकल्पक्षेत्राच्या बाहेरचे लोक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सरकार तर 'प्रकल्प उभारणारच' म्हणते आहे. वैज्ञानिक ही त्यांची सकारात्मक बाजू मांडताहेत.
सामान्य माणूस मात्र यामध्ये गोंधळलेला आहे. त्याला चोवीस तास वीज हवी आहे. पण प्रदूषण, किरणोत्सर्ग याला तो घाबरतो आहे. खरे काय आणि खोटे काय याबद्दल तो संभ्रमित आहे.

अणुऊर्जा प्रकल्पाची भीती जशी सर्वसामान्य कोकणवासीयांना; जैतापूर, माडबन, साखरी, नाटे येथील ग्रामस्थांना वाटत आहे तशी मला पण वाटते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~

मी खुद्द रत्नागिरीकर. जैतापूर आमच्यासाठी लांब नाही. पण आंदोलन सुरू झाल्यापासून social media वर जे उलट सुलट विषय यायला लागले त्यामुळे माझ्यासारख्या science student च सुद्धा मतपरिवर्तन व्हावं, मग बिचाऱ्या त्या गरीब अडाणी राहिवाश्यांच काय.
सर्वांत मोठी भीती - किरणोत्सर्ग ने कोकण भकास होणार.
तेव्हा facebook वर त्याविषयी बरेंच pages ही create झाले आहेत, मी सुद्धा follow करते.
जसे जैतापूर अनुप्रकल्प हटवा - कोकण वाचवा.
कोकणी लोकांची सवय आहे - विरोधाला विरोध.

त्यादरम्यान काही वर्षांत आम्ही असेच रत्नागिरी जिल्ह्यात देवदर्शनासाठी बाहेर पडलो, अशीच एक फॅमिली ट्रिप. सवय होती आम्हाला तशी वर्षातून एकदा रत्नागिरी पुनः पुन्हा फिरून यायची. तेव्हा आमचा नेहमी ड्राइवर असायचा - संतोष पाटील. शिक्षण घेतलं नाही म्हणून, बाकी एकदम हुशार. वाचन तर जबरदस्त. driving करताना पुस्तकांचे reference तर असे द्यायचा की बस्स. नेहमी फिरतीवर असल्याने जनसंपर्क चांगला. त्यामुळे संतोष पाटील हा एक आमच्यासाठी encyclopedia आहे.
तर विषय असा, की आम्ही फिरताना गाडी कथित अणुऊर्जा प्रकल्पा जवळ आली. रत्नागिरी मध्ये बऱ्याच ठिकाणी कातळ पठार आहे, तसंच हे एक कातळ. विस्तीर्ण पसरलेलं. तिथे लांबवर बोट दाखवून त्याने आम्हाला प्रकल्पाची जागा दाखवली. नावाला वस्ती दिसत नव्हती. कुंपण घातलेल्या जागेत पोलीस दिसत होते लांबवर.
माझा बाबांना दुसर्यांना बोलतं करायची खूप हौस.
बाबा - "काय रे पाटील, तुला काय वाटतं या प्रकल्पबद्दल?"
"प्रकल्प व्हायलाच पाहिजे. या राजकारण्यांच्या नादी लागून उपयोग नाही. आपली लोकं दारिद्रीच राहणार. स्वतः धंदे उभे करणार नाहीत, आणि आलेले धंदे हुसकावून लावतील. सगळ्यांनाच कुठे जमणार आहे मुंबई पुण्याला नोकऱ्या करायला. हे इथेच एकमेकांचे पाय ओढत राहणार" इति पाटील.

~~~~~~~~~~~~~~~~~~~

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची हीच ती बहुचर्चित जागा!
कोणतीही developement नसलेला ' no developement zone'. प्रकल्पाच्या बिंदूपासून 1.6 kms पर्यंत आरक्षित, निर्बंधित ; त्यापलीकडे 5kms पर्यंत no developement zone, त्यानंतर सारा मुलुख सर्वांसाठी खुला.

कोकणात enron प्रकल्प काही वर्षांपूर्वी आला, तेव्हा प्रथमच पर्यवणवादी त्याविरुद्ध मोहीम काढून आंदोलन करू लागले. जिंदाल ला ही विरोध झाला. डहाणू जवळील थर्मल plant विरोधातही स्थानिकांनी आंदोलन केले.

अलीकडच्या काळात कोकणात होऊ घातलेल्या प्रत्येक प्रकल्पाला कोकणवासीयांनि विरोध केलेला आहे. एकूणच नकारात्मक विचारसरणी, शंकेखोर स्वभाव आणि 'हवे' ऐवजी 'नको' चा प्रथम विचार. कोकण मागे राहण्याचे कारण त्यांची ही एकविसाव्या शतकाशी सर्वस्वी विसंगत मानसिकता.
विरोध ही आमची निशाणी बनली आहे. 'आमकां नको. नको म्हंजे नको!' - ही ठाम भूमिका.

विकासामध्ये राजकारण घुसले की काय होते, याचे जैतापूर प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. जैतापूरकरांचा विरोध हा शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित नसून राजकीय आणि भावनिक पायांवर उभा आहे. राजकारण्यांवरील पराकोटीची अंधश्रद्धा हे मूळ कारण आहे.

माडबन - जैतापूर सड्यावर निसर्गाने कातळाशिवाय काहीच दिलेले नाही. जैवविविधता मुळीच नाही. तरीही अशी हाकाटी की जगातील हे पठार जैवविविधतेने भरलेले, सर्वांगसुंदर, निसर्गरमणीय असे आहे! पावसाळ्यामध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान सड्यावर चिमूटभर माती असली तरी तेथे सोनाळी, तेरडे, सीतेचे केस अशी रानफुले फुलतात. दिवाळीनंतर ती सुकतात व त्यांचा मागमूसही दिसत नाही. पठार संपूर्ण कोरे करकरीत. प्रकल्पाची खरी जागा तीच. त्यामुळे हजारो आंबा-नारळ-काजूंच्या झाडांची कत्तल होणार हे धादांत खोटे!
पण जर भरपूर पैसा खर्च केला आणि त्यातून पाणी, कुंपण उपलब्ध करून जर सुरुंगाने किमान दीड दोन फुटांचे खड्डे कातळावर पाडले, तर उत्तम आंबा बागायत होऊ शकेल. पण स्थानिक जनतेकडे एवढा पैसा नसल्याने सडा पडीक राहिला आहे.

२००६ साली जमीनसंपदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि आंदोलनाला सुरुवात झाली.
प्रकल्पाच्या शास्त्रशुद्धतेविषयी, उपयुक्ततेविषयी चर्चा होण्या ऐवजी कॅन्सर, अपंग अपत्ये, नपुसंकत्व अशा भावनिक गोष्टींभोवतीच सर्व प्रकरण फिरत राहिले आहे.

जैतापूर नावाने संबोधित होणारी माडबन ही जागा वैज्ञानिकांनी का निवडली?
त्याचे निकष असे आहेत -
१. जागेची उपलब्धता
२. लोकसंख्येची घनता
३. पाण्याची उपलब्धता (समुद्राचे पाणी)
४. दळणवळणाची सोय
५. भूगर्भीय भक्कम रचना
६. पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास
७. कमी भूकंप प्रवणता
८.पुराच्या/त्सुनामी सारख्या संकटांमध्ये, जागेची उंचीवरील समतल पातळी
या सर्व निकषांमध्ये माडबन perfect उतरले.

सध्याचे विजनिर्मितीचे उपलब्ध स्रोत मुख्यतः कोळशावर आधारित आणि जलविद्युत हेच आहेत. भविष्यकालीन विजेची गरज लक्ष्यात घेता, हे स्रोत अपुरे पडणार हे नक्की.
विजेची बचत हा एक मोठा पर्याय आपणासाठी उपलब्ध आहे. पण ही बचत कुठे आणि कशी करायची. रोज अर्धा तास वीज बंद ठेवा असे आवाहन करायचे तर तेवढी राष्ट्रीय/ सामाजिक शिस्त अजून आपणांस लागलेली नाही.

या स्थितीत सौर आणि अणु ऊर्जेचा विचार आपणांस करावा लागणार आहे. सौर ऊर्जेचा पर्याय प्रचंड महागडा आणि विस्तिर्ण प्रमाणात जमीन व्यापणारा आहे. त्यामुळे अणुऊर्जेचा पर्याय ही गरजच नव्हे तर अपरिहार्यता आहे.

https://www.power-technology.com/features/what-is-a-nuclear-power-station/

पोखरण - २ च्या अणुस्फोटानंतर भारतावर अमेरिकेने अणुऊर्जा बहिष्कार टाकला होता. त्याची भारताने बिलकुल पर्वा केली नाही. अणूचा उपयोग मानवी हितासाठी व्हावा, हीच भारताची भूमिका राहिली आहे. शेवटी अमेरिकेने नमते घेऊन, भारतावरील आण्विक बहिष्कार मागे घेतला. त्यानंतरच्या काळातील जैतापूर हा पहिलाच प्रचंड क्षमतेचा, भव्य क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प. हा प्रकल्प भारताच्या दृष्टीने जागतिक स्तरावर राजनैतिक आणि व्यूहात्मक पातळीवर महत्वाचा ठरणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आण्विक प्रगतीमध्ये मानाचा तुरा ठरणार आहे.
१० हजार megawatt क्षमतेचा देशातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.

https://m.facebook.com/nuclearfriends/photos/a.265036110180560/820982841252548/?type=3

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2045648298984145&id=1684515921764053

या अणुऊर्जा वीज प्रकल्पाच्या बाबतीत लोकांच्या मनांत अनंत प्रश्न उभे राहिले आहेत, त्यातील एक, प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या गरम पाण्यामुळे मासे मरतील.
या भीतीबद्दल भारतीय अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर म्हणतात -
"जास्तीत जास्त किती गरम पाणी आपण सोडू शकतो याविषयीचे काही नियम आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त 7℃ चे पाणी आपण सोडणार आहोत. हे गरम पाणी तीन km अंतरावर खूप खोलवर समुद्रात बोगद्याद्वारे सोडण्यात येणार आहे. इतक्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम जलचारांवर होत नाही "
आणि हे कैगा, कर्नाटक येथील अणुऊर्जा प्रकल्पाने सिद्ध झालेले आहे. उलट तेथील काळी नदीत सोडलेल्या पाण्यामुळे काही माशांचे प्रजनन वाढलेले आढळले.

Chernobyl सारख्या अपघाताच्या संभाव्यतेबद्दल डॉ काकोडकर म्हणतात -
"Chernobyl ची अणुभट्टी खूपच जुनी होती, व रशीयनांनी बऱ्याच गोष्टी टाळल्या होत्या. जेव्हा अपघात झाला तेव्हा एवढी जुनाट अणुभट्टी जगात कोठेच नव्हती. आता राशियानेही आधुनिक तंत्रज्ञान वापरायला सुरू केले आहे. भारतातल्या अणू भट्ट्यांची सुरक्षितता जगन्मान्य आहे. तारापूर अणुभट्टीची मूळ २५ वर्षांची मुदत संपूनही तो आपण पुन्हा कार्यन्वित करू शकलो व त्यातून वीजनिर्मिती होत आहे "

https://www.aksharnama.com/client/article_detail/3545?fbclid=IwAR1iAbzDcZ9WwqrnDyk9S3FdOjlyY86_gxa_uQ2sukagRay95878Jrmewa8

अजून एक भीती अणूकचऱ्या बाबतीत.
अणुकचरा ही एक विनाशकारी गोष्ट आहे. याची विल्हेवाट जास्तीत जास्त सुरक्षितपणे, मानवी जीविताला धोका पोहोचू न देता कशी लावायची, हे प्रयोगसिद्ध संशोधन झाले आहे.त्याची काळजी जैतापूर प्रकापसाठी सुद्धा घेण्यात येणार आहे. फक्त आपल्या शास्त्रज्ञांवर आपल्याला विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात  होऊ घातलेली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती.

माडबन - जैतापूर प्रकल्प विनाशकारी नसून साह्यकारी हे रहिवाश्यानी समजून घ्यावे. दुर्दैवाने हा प्रकल्प रद्द केला किंवा दुसरीकडे गेला, तर महाराष्ट्र असाच भारनियमनात अडकून राहील. विकासाच्या ऐन उंबरठ्यावर असलेला आपला देश अजून काही वर्षे मागे पडेल. भारत महासत्ता होण्याचे स्वप्न आपणास सोडून द्यावे लागेल. जैतापूरचे पठार मोकळेच राहील. इतके वर्षं त्यावर काही लागवड झाली नाही, यापुढे काही शक्यता काही दिसत नाही.
स्थानिक दारिद्र रेषेच्या वर पोहोचायला अजून काही वर्षे जातील. कुळथाची पिठी आणि सुका बांगडा यावरच त्यांना भागवावे लागेल...

असे काहीही न होवो हीच सदिच्छा!

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन