भाज्यांची खरेदी

भाज्यांची खरेदी

भाज्यांची खरेदी ही पण एक कला आहे.
😊🌿🥕🥔🍆🌶️
बाजारात गेलं, ४ भाज्या उचलून आणल्या असं नाही होतं. त्या ४ भाज्या सुद्धा विचार करून त्यातल्या त्यात best कोणती ते select करणं, यामागे सुद्धा मोठी तपश्चर्या असते 😋
मी दर शनिवारी अथवा रविवारी आठवडाभरचा जिन्नस/भाज्या घेऊन येते. सुरुवात होते सामानाच्या यादीपासून. कांदे, बटाटे, टोमॅटो, मिरच्या, आलं, कोथिंबीर हे key items संपताक्षणी लागलीच घरात भरावे लागतात.


बाकी आठवड्याचे दिवस ७, रविवार सोडून बाकी ६ दिवस टिफिन बनवायचा असेल तर मग ठरवायचं - कडधान्य किती दिवस, फळभाज्या किती दिवस आणि पालेभाज्या किती दिवस बनवायच्या.

एकदा हे final झालं की त्याप्रमाणे कापडी पिशव्या घेऊन भाजी बाजारात पाऊल ठेवायचं. 🙅
एकदा संपूर्ण भाजी मार्केट पायी चालून reiki करून घ्यायची. त्यामुळे कोणकोणत्या भाज्या बाजारात आल्या आहेत ते लक्षात येत.
कोणत्या भाजीवाल्याकडे कोणती भाजी चांगली आहे ते note down करायचं (मनात 😋).
Reiki करता करता किमती पण विचारून घ्यायच्या, त्याप्रमाणे quality, quantity आणि price या सगळ्यांचा ताळमेळ घालून काय घ्यायचं आज, त्या निर्णयापर्यंत पोचायला मदत होते 😁
एकदा हे सगळं ठरलं, की आधी हेरून ठेवलेल्या भाजीवाल्यांकडे direct पोहोचून पटापट भाजी खरेदी करायची.  Simple 💁

मी राहायला अजूनही ग्रामीण भागात असल्याने गावातल्या मावशयांकडून खरेदी करण्याचा आनंद मी अजूनही लुटू शकते, त्यात मला जास्त आनंद वाटतो.
त्यात जर आपण घासाघीस न करता भाज्या घेतल्या तर त्यांनी स्वतःहून प्रेमाने एखादी extra चहाची पात, लिंबू, आणि अजून काही आपल्या पिशवीत टाकलं, तर बस्स, खरी खरेदी झाल्यासारखी वाटते 😍😇

बघा मग असही एकदा करून.
Thanks me later 😛

~ सुप्रिया घुडे


Comments

  1. इतकी प्लॅंनिंग,बापरे😀

    ReplyDelete
    Replies
    1. संसार म्हटला की करावं लागतं 😃

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन