एकेक पान गळावया - गौरी देशपांडे



गौरी देशपांडे याचं लिखाण सहज, सोप्प अस नक्कीच नाहीये. ते पचनी पडायला वेळ लागतोच. 
'एकेक पान गळावया' हे मी वाचायला घेतलेलं गौरी च पाहिलंच पुस्तक. पहिल्या प्रकरणातच गौरी ही लेखिका म्हणून काय असामी आहे याची खात्री पटली.
प्रकरण १: कारावासातून पत्रे - निम्म्याहून अधिक गोष्ट वाचेपर्यंत सगळ 'डोक्यावरून'च जात होतं, हे मी प्रामाणिकपणे काबुल करेन. परंतु जेव्हा लेखाच्या शेवटला पोहोचतो, तेव्हा नक्की 'कारावासातून पत्रे' हे शीर्षक का दिलंय याचा उलगडा होतो.
प्रकरण २: मध्य लटपटीत - आयुष्यात नक्की काय हरवलंय याचा शोध घेता-घेता जेव्हा कथेच्या शेवटी आपणच आपल्याला गवसतो, तेव्हा मनात तरळत राहतो एक चिरंतन आनंद.
प्रकरण ३: एकेक पान गळावया - आयुष्यातले बंध; म्हटले तर सोपे, म्हटले तर क्लिष्ट; तेही लेखिकेने इतक्या सहजतेने उलगडलेले आहेत. घरातल्या प्रत्येक सदस्याने वाचावी अशी ही कथा. आई-वडील-मुलं यांच्यातील भावनाबंध exact मांडले आहेत. ही कथा वाचताना लेखिका प्रत्येकाला त्या-त्या जागी उभं राहून विचार करायला लावते.

तळ टीप: वाचकांनी 'कारावासातून पत्रे ' सर्वात शेवटी वाचण्यास घ्यावे. smile emoticon 


From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204766796560985&l=384933e5f4

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5033580873375176071?BookName=Ekek-Pan-Galavaya


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन