विंचूर्णी चे धडे - गौरी देशपांडे


विंचूर्णी चे धडे - गौरी देशपांडे





विंचूर्णी - फलटण, साताऱ्याच्या जवळील एक छोटंसं गाव. माळरान असल्याने विंचू खूप, म्हणून तसं नाव.
लेखिकेची बहीण- मेहुणे तिथे राहायला असल्याने ती सुद्धा तिथे एक छोटंसं घर बांधते. आणि हळू हळू मांजर, कुत्रे, मेंढ्या, छोटे मोठे प्राणी यांच्यासोबत, नवरा, मुलं, नातवंड, पावणे - रावळे सांभाळत; विंचूर्णी - पुणे - मुंबई - हॉंगकॉंग प्रवास, तसेच लेखन काम सांभाळत; लेखिका तिथलीच एक होऊन जाते. 
विंचूर्णी ला राहायला असताना, घरातली/बाहेरची काम करायला येणाऱ्या तिथल्या गावातीलच व्यक्ती आणि वल्लींच्या कथा/व्यक्तिरेखा या पुस्तकात वाचायला मिळतात. 
मला खास आवडलेल्या व्यक्तिरेखा -
बॉन्स बिलाबॉंग, गोरखची गोष्ट, नानींची नवलकथा, आणि बाकी पण सगळ्याच ☺️
पुस्तकांत अध्ये-मध्ये असलेली रेखाचित्रे कथेला खास उठाव आणतात.

गौरी देशपांडे च्या इतर पुस्तकांपेक्षा हे एक वेगळ्या पठडीत बसतं, आणि कदाचित याचं लेखन आयुष्याच्या पन्नाशीत वगैरे केलेलं असावं.

पुस्तक वाचताना, लेखिकेने तिथल्या गावात बदल घडवून आणण्यासाठी केलेले छोटे - छोटे प्रयत्न, in general सरकारी कामातील गावातून दिसून येणारी उदासीनता, आणि या सर्वांतून सोडलेले प्रयत्न, या बद्दल लेखिकेने प्रामाणिक कबुली दिसून येते. 

शेवटचं प्रकरण  'विंचूर्णी चे धडे'.
विंचूर्णी कडून मिळालेले धडे यात मांडलेत -
१.आपल्या हातून कोणाचे फार भले होणार नाही. 
२. संघटना - organizational aparation या निराशाजनक असतात. 
३.माणसांना माया लावली, त्यांच्यावर प्रेम केले, त्यांच्याशी मोकळ्या - सरळ मनाने वागले, त्यांची सुख दुःखे वाटली  की ती 'आपली' होतात असे नव्हे

त्यामुळे लेखिका शेवटी म्हणते -
"विंचूर्णी ने मला काय दिलं, ते अनमोल आहे. खरी खंत अशी आहे की, काही का कारणाने होईना - मी विंचूर्णी ला फारसे काहीच दिले नाही"

- सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन