आम्ही मांजरप्रेमी

 आम्ही मांजरप्रेमी



दिवेलागणीला दिवाबत्ती करायला पुढचा दरवाजा उघडायला आणि ही समोर यायला 🐈

गावाला ठीक पण इथे buildings मध्ये देशी मांजर क्वचितच कोणी पाळत असेल, त्यांना त्या विदेशी मांजारांसारखं घरात डांबून नाही ठेवू शकत ना. 

ही अचानक पाहुणी कुठून आली कोण जाणो. तिचं म्याव - म्याव सुद्धा घसा बसल्यासारखं वाटलं. 

शेजाऱ्यांचा दरवाजा उघडा होता, त्यांना विचारलं - तुमचं आहे काय ओ हे?

 ते पण बोलतात - नाही ओ, तिला दूध दिलं तर नाही तोंड लावलंन.

मी बिस्कीट दिलं खायला. म्हणजे आमच्याकडे मांजर होतं, तिला आई न चुकता मारी बिस्कीट द्यायची. ठरलेला शिरस्ता. ती आणि तिचं पोर 'चिंगू' चट्टा- मट्टा करायचे. पण हिने नाही खाल्लं. पुन्हा माझ्याकडे बघून - म्याव - म्याव. दुपारची कच्च्या केळ्यांची shallow fry केलेली कापं होती ती दिली. ते सुद्धा नको झालं त्या बाईला, म्हणजे मांजरीला. 🐱

बहीण बोलली - कदाचित non vegetarian असेल. आता तिचा कोणता आवडीचा पदार्थ काय माहीत.

आमच्या जुन्या घरात एक मांजर आहे - 'जितू' त्याला टोमॅटो खूप प्रिय. आम्हाला टोमॅटो नेहमी फ्रीज मध्ये ठेवावे लागतात त्यामुळे. बाहेर एखादा चुकून राहिला तर जीतूने तोंडात पकडून पळवलाच समजा. 

आमची चुलत बहीण बोलते - कोणत्यातरी पिताराची टोमॅटो वर वासना राहिली असेल, तोच हा जितू असेल 😺

दुसरी एक 'परी' आहे, तिला फ्रेश पाव अत्यंत प्रिय. 😋

आता इथे आलेल्या या पाहुणीला काय आवडत होतं काय माहीत. 

आवाज जरा विचित्र असला तरी दिसायला सुंदर 😻

एकसारखी काहीतरी शोधत होती. staires कडे जाऊन पुन्हा मागे येत होती. चुकून कोणाच्या मागून लिफ्ट ने किंवा staires नेच आली असावी. सगळे मजले दिसायला सारखे, त्यामुळे अजूनच गोंधळलेली. 

बहिणीला आणि शेजाऱ्यांना सांगितलं, तिला ग्राउंड फ्लोअर ला सोडलं तर बरं होईल, आपला रस्ता शोधत जाईल. एकसारखी माझ्या पायाशी घुटमळत होती. 

मग मी निघाले चालत, तशी माझ्या पायाशी आडवी तिडवी फिरत पोचली एकदाची तळमजल्याला. Security ला सांगितलं - बघा परत ती वाट चुकून वरती यायची. परंतु ती सुद्धा खाली पोहोचल्याक्षणी एकदम relax झाली, आणि पायदाणावर बसून अंग साफ करायला लागली 😸

इथे शक्य नाहीये म्हणून नाहीतर adopt च केली असती तिला 😽

किती महिन्यांनी एखादं मांजर पायात घुटमळलंय 😻

तो काय अनुभव असतो हे फक्त एखादया मांजरप्रेमी लाच समजू शकतं 😻😻😻😻😻

~ सुप्रिया घुडे
२०-०९-२०२०

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन