सोलापूर ट्रिप २०२२

 सोलापूर ट्रिप २०२२


~प्रस्तावना ~

Lockdown च्या आधी म्हणजे मार्च २०१९ मध्ये आम्ही सोलापूर ला जाऊन आलो होतो. त्यावेळी काही धावत्या भेटी झाल्या होत्या त्या अश्या - अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट चा राजवाडा / शस्त्रागार, तुळजापूर मंदिर, नळदुर्ग, सिद्धरामेश्वर मंदिर आणि सोलापूर भुईकोट . उन्हाळा असल्याने तेव्हा नळदुर्ग चा नर-मादी धबधबा पाहता आला नव्हता. आणि सोलापूर च्या भुईकोटात आम्ही उशिरा पोहोचलो त्यामुळे बाहेरचं गार्डन बघून परतलो होतो. तेव्हा ज्या दिवशी आम्ही सोलापूर हुन परतलो त्यानंतर एका आठवड्यात पहिला lockdown लागला होता 😨

नंतर Lockdown चालू असताना वाटलं होतं हा corona कधीच संपणार नाही आणि आयुष्य असं घरात बसूनच वाया जातंय की काय 😂

तब्बल २-३ वर्षांनी पूर्ण lockdown उठला आणि आम्हाला वेध लागले पुढील फॅमिली ट्रिप चे 🤩

Lockdown नंतर पहिली कोणती ट्रिप करायची असा विचार चालूच होता. आमच्या आत्येला अचानक स्वामी समर्थांच्या भेटीचे वेध लागतात 😀

म्हटलं चला lockdown नंतर ची पहिली ट्रिप स्वामी समर्थांकडून च सुरू करू. अक्कलकोट ला गेलं की जवळच तुळजापूर ला जाऊन कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च दर्शन ओघाने आलंच  🙏

 न भूतो न भविष्यति असा pandemic चा काळ बघून आपण सर्वजण यातून सुखरूप बाहेर पडलोय, नियतीच्या काहीतरी मनात असेल म्हणून तर आपण यातून तरुन निघालो म्हणायचं.

झालं... माझे आणि सर काकांचं नेहमीप्रमाणे ट्रिप प्लांनिंग चं discussion सुरू झालं 😋 

यावेळी कोणती ठिकाणं पहायची.??! 🤔

नळदुर्ग चा नर-मादी धबधबा आणि सोलापूर भुईकोट by default होते. धबधब्यासाठी पावसाळा सुरू झाल्यावर जायचं ठरलं. त्याप्रमाणे ऑगस्ट महिना नक्की केला. 

आधी ठरलं की सोलापूर ला 4 wheeler भाड्याने घेऊन तिथे फिरायचं. कारण मागच्या वेळी पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास केला आणि त्यात बराच वेळ गेला. त्यावेळात अजून एखादं ठिकाण बघून झालं असतं. 

परंतु ६ पैकी (माझ्यासकट 😬) ३ डोक्यांना  गाडी लागते 🤮. त्यामुळे एवढा प्रवास ४ व्हिलर ने कसा करायचा हा प्रश्नच होताच.. म्हणून आम्ही येण्या जाण्याचे ट्रेन बुकिंग कन्फर्म केले.

 मग अचानक ठरलं की सोलापूर ला जाऊन ४ व्हिलर बुक करण्यापेक्षा, कुडाळ हुन काका आत्ये निघतील तिथूनच 4 wheeler घेऊन सोलापूर ला यायचं आणि तीच गाडी सोलापूर ला फिरवायची. हाच प्लॅन फायनल झाला. 

सोलापूर हा पठारी भाग असल्याने रस्ते सरळ, त्यामुळे कुठेही कोणालाही त्रास झाला नाही 🤗

६ डोकी 3 ठिकाणाहून निघून सोलापूर ला भेटणार होती. आत्ये काका - कुडाळ हुन, काकी आणि सुजल - रत्नागिरी हुन, किर्ती आणि मी - मुंबई हुन. 

प्रवास कसा करायचा हे तर फायनल झालं. 


~महानाट्य~

 एक-दोन महिने अगोदर पासून बरेच प्रश्न उपस्थित व्हायला लागले..

° corona ची लाट आताच ओसरली आहे आणि लगेच कुठे निघालात?! 

- corona पूर्णपणे तर कधीच संपायचा नव्हता, त्यामुळे हा विषय तिथेच संपला होता आमच्या दृष्टीने 😅.

° सगळी आजारी माणसं (मुख्यत्वे गाडी लागणारी माणसं 🤮) कशी काय एवढ्या लांब प्रवास करणार?! 

- आजारपणं पाचवी ला पुजलेली. हातपाय हलतायेत तोपर्यंत फिरून घ्यावं नंतर regret नको करायला. आता पूर्वीसारखं मी ट्रेकिंग नाही करू शकत. म्हणून हातावर हात धरून तर नाही राहू शकत.. जो होगा देखा जायेगा 😎

° एवढा पाऊस पडतोय, घाट बंद झालेत, दरड कोसळतायेत..... 

- आम्ही निघणार ऑगस्ट मध्ये, जुलैपासून ऑगस्टपर्यंत दरड तशीच राहणार आहे का 😁 आणि आश्चर्य म्हणजे, आम्ही सोलापूर ला पोहोचलो तेव्हा सिंधुदुर्ग-रत्नागिरी-मुंबई पावसाने धुवून निघत होती परंतु  सोलापूर मध्ये  पाऊस नसल्याने आम्हाला मस्त फिरायला मिळालं. 🤩

° ट्रिप च्या १५ दिवस अगोदर अचानक आत्येने सुरू केलं - "ट्रिप ला जायचं ते मला 'ह्यांनी' काही सांगितलंच नाही  " 😨😢😩

-  एवढंच बाकी राहिलं होतं. 😕 सुरुवातीपासूनच ट्रिप ला बऱ्याच आडकाठी येत होत्या त्यामुळे मी आणि काकांनी आधीच ठरवलं होतं, आपण आपल्यात ठेवू मग सगळ्यांना सांगू.

असं नाय-होय चालू होतंच, त्यात काका आधी आजारी पडले, मागाहून आत्ये आजारी पडली.  आतातर आमचा प्लॅन जवळपास कॅन्सल च व्हायचा होता. पण अचानक काय कोण जाणे, एक आठवडा अगोदर आत्ये ने हिरवा कंदील दाखवला. काका तर काहीही झालं तरी ट्रिप साठी तयार होतेच 😄 आमचं ट्रिप च प्लांनिंग पुन्हा रुळावर आलं आणि आम्हाला हायस वाटलं 😁

°सुजल, किर्ती आणि मी - आम्ही तिघींनी तर शेवटपर्यंत leaves सुद्धा apply केल्या नव्हत्या. त्या सुद्धा आयत्या वेळी approve करून घेतल्या.

° तरीही विषय इथे संपायचे नव्हते. मी आणि किर्ती मुंबईहून सोलापूर ला ट्रेन ने जाणार होतो आणि तिथे बाकी ४ ट्रिप मेंबर्स ना डायरेक्ट गोदावरी lodge वर जॉईन होणार होतो. आयत्या वेळी आमची ट्रेन च कॅन्सल  झाली😑 मी ऑफिस मध्ये होते आणि मला IRCTC चा message आला. कुडाळ रत्नागिरी ची मंडळी तर निघायच्या तयारीत च होती 😦 

मी लगेच काकांना कॉल केला. काका कपाळाला हात लावून बसले 🤦त्यांना म्हटलं - थांबा, बघू एखादं जरी तिकीट  मिळालं तरी आम्ही दोघी निघू. 

आयत्या वेळी तरी कशी दुसऱ्या ट्रेन्स ची tickets मिळणार होती.  बस ने  मुंबई ते सोलापूर प्रवास करण्याची हिंमत आमच्या दोघींमध्येही नव्हती. 🤢 

IRCTC वर current bookings मिळतायते का ते बघायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य!  सिद्धेश्वर एक्सप्रेस ची फक्त 2 टिकेट्स available होती. महत्वाचं म्हणजे हीच ट्रेन 2 महिन्यांपूर्वी फुल्ल दिसत होती 😀

लगेच काकांना कॉल केला आणि सांगितलं, सगळ्यांनी निघायची तयारी करा.  आमचं बुकिंग कन्फर्म झालं आहे 😎 आता सोलापूर ला जाण्यापासून कोणीही नाही थांबवू शकत आपल्याला 💃🕺


~राहण्याची व्यवस्था~

२०१९ मध्ये आम्ही अशीच 3 दिवसांसाठीच गेलो होतो सोलापूर ला. त्यावेळी 3 दिवसांत 3 राहायच्या जागा बदलल्या होत्या 😁

2 दिवस 2 अक्कलकोट भक्त निवास आणि तिसरा दिवस गोदावरी lodge. 

भक्त निवास छान आहेत परंतु आम्हाला ज्या रूम्स मिळाल्या तिथल्या बाथरूम चे water logging चे प्रॉब्लेम होते. त्यामुळे गोदावरी lodge (https://g.page/hotel-godavari-lodge?share) मध्ये आम्ही तात्पुरती ground floor ला एक रूम बुक केली होती, ती स्वच्छ होती. त्यामुळे तेव्हाच ठरवलं होतं, पुढच्या वेळी आलो तर इथंच राहायला यायचं.

यावेळी ठरवल्याप्रमाणे आम्ही advanced बुकिंग करून  गोदावरी lodge वर धडकलो. पण हाय रे कर्मा, त्यांचं management change झालं की कामाला असणारी माणसं change झाली देव जाणो, वरच्या floors च्या 2 रूम दिल्या त्या अत्यंत गलिच्छ होत्या.

काका, आत्ये, काकी, सुजल आणि ज्यांची गाडी घेऊन आलो होतो ते श्री. सामंत; हे ५ जणं आदल्या रात्रीच गोदावरी ला आले होते. त्या पाचही जणांनी कशीतरी एक रात्र तिथे घालवली. 

मी आणि किर्ती सकाळी पोहोचलो. लगेच तयारी करून ट्रिप ची सुरुवात करायची होती. Lodge वर सकाळी अंघोळीला गरम पाणीच नव्हतं. अस्वच्छ रूम मिळाल्याने आधीच जनमानसात असंतोष पसरलेला होता. 😬  आमचं lodge मध्ये लँडिंग झाल्या झाल्या, राहायची जागाच change करायची असे संकेत दिसू लागले. 🙃

अंघोळी आटोपून किर्ती, सुजल आणि मी nearby stay शोधतच होतो, तेवढ्यात गोदावरी चे मालक आयते समोर आले 🤣 त्यांच्या समोर आम्ही समस्त बायकांनी एकूणच management ची कुंडली मांडायला सुरुवात केली 😂 मालकांना आत्ये बोलली - 'आमचा सुद्धा home stay आहे, माहीत नाही पण तुम्हाला कधीच कोणी complaint कशी केली नाही.. ' 🤔

 मालक समजूतदार होते, आम्ही दिवसभर फिरून येईपर्यंत त्यांनी आम्हाला नवीन स्वच्छ रूम allot केल्या 😎 म्हणतात ना तोंड उघडल्या शिवाय काही नाही मिळत ते असं 😁


~खाणेसुमारी~

देवकृपेने आम्हाला नाष्टा जेवण या ट्रिप मध्ये वेळेवर आणि व्यवस्थित मिळालं. 

खाली त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहे म्हणजे आमचे अनुभव दुसऱ्यांच्या कामी येतील 😇


दिवस पहिला : 

•गोदावरी lodge च्या बाजूला गुलबर्गा खानावळ आहे. (https://g.page/hotel-godavari-lodge?share) जास्त जिभेचे चोचले नसतील आणि अळणी आवडत असेल तर इथे नाष्टा / जेवण करायला हरकत नाही 😁

पहिल्या दिवशी चा नाष्टा आणि शेवटच्या दिवशी चं dinner आम्ही इथेच केलं .

•नळदुर्ग हुन निघून तुळजापूर ला जाताना वाटेत अंगत-पंगत रेस्टॉरंट आहे (https://g.co/kgs/hoAZAn). ट्रिप चा पहिला दिवस होता आणि आम्हाला उगाच काहीतरी खाऊन पोटं बिघडवायची नव्हती 😋   हल्ली ते पंजाबी डिशेस खाऊन एवढा वैताग आलाय, पनीर तर अगदी नको वाटतं सध्या. 😣 म्हणून आम्ही भेंडी फ्राय आणि भाकरी पासून सुरुवात केली.  काय सुंदर भेंडी फ्राय बनवली होती सांगू. 🤤 आम्ही आणखी 2 डिशेस मागवल्या, भाकऱ्या तर किती खाल्ल्या देव जाणो. 😆 अंगत- पंगत मधला ambience तर सुंदर च आहे.😊 मन आणि पोट तृप्त झालं इथे येऊन 😇

•सोलापूर मध्ये सुगरण उपहारगृह आहे (https://g.co/kgs/3NXXTB). तिथे Dinner ला आम्ही महाराष्ट्रीय थाळी घेतली सर्वांनी. चव ठीक ठाक होती. तिथे ईतर खरेदी आमची जास्त झाली उदा. सोलापुरी प्रसिद्ध शेंगदाणा सुकी चटणी, अननस तसेच पान च मुखवास, बडीशेप पावडर मुखवास, चहा मसाला.. 😀


दिवस दुसरा : 

•गुलबर्गा खानावळीत (अळणी) उपमा खाऊन 😋 आम्ही भुईकोट फिरून आलो, आणि त्या १-२ तासांनंतर पुन्हा नाश्त्याचा सेकंड राऊंड व्हायला हवा अशी गरज वाटायला लागली होती 😂 

अक्कलकोट ला पोहोचायला वेळ लागणार होता. दर्शन करून अन्नछत्रात प्रसादासाठी मोठी रांग असते. तोपर्यंत पोटातले कावळे मेले असते. त्यामुळे अक्कलकोट ला जाण्या आधी मध्येच थांबून कुठेतरी नाष्टा करू असं ठरवलं. 

वाटेतच विठ्ठल कामात लागलं आणि आम्ही लगेच गाडी बाहेर उडी घेतली 😆 

इथला नाष्टा superb 👌नाष्टा एवढा आवडला की आम्ही रात्री येऊन पुन्हा तिथेच dinner केलं 😁  

दिवसा इथे आलात तर इथल्या झाडांवर सुगरण पक्ष्यांची घरटी बघायला मिळतील. एकाच वेळी इतके सुगरण आणि त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात घरटी मी तरी याआधी कुठेच पहिली नव्हती  🥰  आधी आम्हाला वाटलं management ने कुठूनतरी घरटी आणून show साठी अडकवली असतील, परंतु जेव्हा प्रत्येक घरट्यात १-२ पक्षी खेळताना बागडताना दिसले तेव्हा लक्षात आलं ती घरटी त्या पक्ष्यानीच बांधली आहेत 🤩 आम्ही त्यांना बघण्यात इतके गुंग झालो होतो की विसरूनच गेलो की आम्हाला पुढे प्रवासाला निघायचं आहे 😍

(https://youtu.be/h6Q_w6ff55U)

•अक्कलकोट ला दुपारी अन्नछत्र मध्ये प्रसाद मिळाला 😊

(https://g.co/kgs/AMV92e). तो प्रसाद नेहमीच कसा चविष्ट असतो हे माझ्यासाठी न उलगडलेलं कोडं आहे. 🙂 तिथली डाळ किंवा आमटी जी देतात ना, अहाहा... 😍 तीची चव अगदी गोकर्ण मधल्या प्रसादात मिळणाऱ्या रसम सारखी वाटते मला. दोन्ही चवी मी कधीच विसरू शकत नाही  🤩


दिवस तिसरा : 

• सकाळी 8 वाजता च परांडा ला निघायला म्हणून निघालो. लवकर च निघायचं ठरवलं होतं. कारण संध्याकाळी लवकर lodge वर पोहोचणं गरजेचं होतं. रात्री ची परतीच्या प्रवासाची ट्रेन होती. 

रविवार म्हणून, की आम्हीच लवकर निघालो की काय, सोलापूर बाजारपेठेत कोणतंच रेस्तराँ उघडं नव्हतं. आम्हाला वाटलं आता उपाशीच परांडा गाठावा लागतोय की काय. तेवढयात आमच्या नशिबाने एका उडुपी हॉटेल मध्ये वर्दळ दिसली. इथे मस्त इडली, मेदूवडा नाष्टा मिळाला. 🤤

(https://g.co/kgs/bTGKVP)

• परांडा पाहून परत निघताना वाटेत भयंकर वावटळ मिळालं. त्यामुळे झालं असं, आम्हाला दुपारी जेवणासाठी एकही चांगलं रेस्टॉरंट मिळेना, पावसामुळे बरेच ढाबे बंद होते. शेवटी विचार केला, जास्त नाटकं न करता जो ढाबा मिळेल तिथेच गाडी थांबवायची.  आणि नेमकं समोर हॉटेल पाटील वाडा नजरेस पडलं. (https://www.justdial.com/Solapur/Hotel-Patil-Wada-Family-Restaurant-Akluj/9999PX217-X217-180209034839-H6D8_BZDET). नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे त्यांच्या ढाब्यावर च्या खुर्च्या टेबलं सगळं भिजल होतं. परंतु आम्ही ७ भुकेलेले जीव आलेले बघून त्यांनी लगेच आमची बसायची व्यवस्था केली. आमची ऑर्डर घेऊन ताजे गरमागरम जेवण आयत्या वेळी बनवून, आमच्या समोर त्यांनी हजर केलं. किती भाकऱ्या आम्ही संपवल्या असतील त्यावेळी काय माहिती!!! 😁 असो.. उशिरा मिळालं पण बेस्ट मिळालं - जेवण आणि पाहुणचार ही 😇

थोडक्यात खाणेसुमारी हा ट्रिप चा पार्ट एकदम छान पार पडला 😅


~ट्रिप प्लॅन आणि खर्च~

आमचा सहा जणांचा ३ दिवसांचा खर्च जवळपास ₹३०,०००/- झाला. ₹५,०००/- per head.

त्यात सगळं आलं - राहणं, खाणं, बिसलेरी बॉटल्स, प्रवास, टोल...


आमच्या ट्रिप चा Estimated Plan काहीसा खालीलप्रमाणे होता 👇

Day 1 : Solapur Bhuikot, Hattarsang Kudal Sangam, Akkalkot, कडगांची

Day 2 : Naldurg, Tulajabhavani, Dharashiv, Ausa Fort

Day 3 : Paranda Fort, Mankeshwar Teample 


परंतु Actual Execution असं झालं 👇

Day 1 : नळदुर्ग (https://youtu.be/Z9gevMf76Q8), तुळजापूर

Day 2 : सोलापूर भुईकोट (https://youtu.be/6USHLPSS4_0), अक्कलकोट, कडगंची दत्तस्थान (https://youtu.be/dhTqS0A8l4k)

Day 3 : परांडा किल्ला (https://youtu.be/wMqmIi25MZg)


जे ठरवून निघालो होतो ते सगळंच नाही कव्हर करता आलं.

असो, ३ किल्ले पाहून झाले तेही नसे थोडके 🤗


~अंत भला तो सब भला 🥰~

ट्रिप ठरवताना किर्ती आणि सुजल ला  मी बोलले होते - जर आपण सहाही जण  ठरलेल्या दिवशी फिरायला गेलो,  तर स्वामींसमोर आणि तुळजाई समोर साष्टांग दंडवत घालेन. मग काहीही होवो. त्या भर गर्दीत  मला तिथल्या लोकांनी उचलून बाहेर टाकलं तरी बेहत्तर 😆 

बोलून गेले खरी, पण मनातून घाबरले होते, तिथे देवाला एक क्षण बघूही देत नाहीत, ढकलून हाकलवतात आणि आपण साष्टांग दंडवत घालायच ठरवलंय 🙄 अशक्य नव्हतं परंतु कठीण होतं.. 😣

अक्कलकोट आणि तुळजापूर ला जेव्हा आम्ही पोहोचलो, दोन्ही स्थळी तुफान गर्दी होती परंतु माझ्या शब्दाची लाज देवांनीच राखली म्हणायची 😁

मलाच काय तर आम्हा सगळ्यांना साष्टांग दंडवत घालायला जागा मिळाली 😊😌😇🙏

म्हणतात ना, जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच, फक्त थोडीशी मेहनत तुम्ही सुद्धा तुमच्या कडून घेणं गरजेचं आहे. 😁


किसी चीज को दिलसे चाहो तो पुरी कायनात तुमहे उससे मिलाने मे लग जाती हैं 😆 ज्या ट्रिप साठी इतके महिने आधीपासून आटापिटा केला ती  अशी पूर्ण झाली 😊 


महत्वाचं म्हणजे आम्ही एकत्र भेटणार की नाही, ट्रिप successful होणार की नाही हेच नक्की नव्हतं. एवढे प्रॉब्लेम येऊनही ट्रिप संस्मरणीय झाली यातच सगळं आलं 😊


अशी ही सोलापूर ट्रिप च्या महानाट्याची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण 😌

~ सुप्रिया घुडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन