पोकळी
आपल्या भोवतालच्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात एक जागा तयार केलेली असते... आणि ती व्यक्ती अचानक 'नाहीशी' झाली कि आपल्या मनात एक पोकळी निर्माण होते... भयानक पोकळी... छोटंसं विवर वाटावं अशी.. अशी पोकळी कमीही नाही होत आणि दुसरी व्यक्ती भरूही नाही शकत.. त्या पोकळीवर जळमट चढायला लागतात, हळू हळू..
दिवस ढकलत असताना आपण त्या पोकळीकडे दुर्लक्ष करायला लागतो... कधी जाणतेपणी.. कधी अजाणतेपणी.. जळमट वाढतच असतात..
कधी अशाच एकट्या संध्याकाळी विचारांची गर्दी झाली की, मन ती जळमट साफ करण्याचं काम हाती घेत..
आणि पुन्हा जाणवायला लागते ती - पोकळी..
Comments
Post a Comment