लग्नाविना - मंगला सामंत



'Live-In Relationship'… काहीशी उच्चभ्रू आणि उच्च - मध्यम वर्गीयान्मध्येच "प्रसिद्ध" असलेली कल्पना. तीच कल्पना उचलून तयार झालेलं हे पुस्तक.
सध्या स्त्रिया-मुलींवरील हल्ले, बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार, भृणहत्या अशा अस्वस्थ करणाऱ्या घटना आपल्या भोवताली घडतायेत. एवढी पुरुषी मानसिकता विकृत का होत जात आहे? कदाचित याला आपणच जबाबदार आहोत, आपली पितृसत्ताक परंपरा, वंशाच्या दिव्यासाठी चाललेली धडपड, स्त्रियांविषयी अनादर, पुरुषी मत्सर हे जबाबदार आहे.
अतिप्राचीन भारतीय संस्कृती चा जर आढावा घेतला तर तेव्हा अशा घटना का होत नव्हत्या? कारण तेव्हा मातृप्रधान संस्कृती होती, मुक्त संबंधाना मान्यता होती, स्त्री-पुरुष दोघांना समान न्याय देणारी नैतिक व्यवस्था होती.
त्यानंतर हळु - हळु पुरुष प्रधान संस्कुती उदयास येऊ लागली, तिने विवाह बंधानास जन्म दिला आणि नैतिक-अनैतिकते च्या चष्म्यातून आपण समाजाकडे, in fact स्त्रियांकडे पाहायला सुरुवात केली.
आपल्याला आवडलेली स्त्री फक्त माझीच असायला हवी, दुसऱ्या कोणाचा हक्कच असू शकत नाही या भावनेतून स्त्रियांच्या चेहऱ्याची विटंबना होऊ लागली. यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेच आहे.
परदेशात live-in, single mother हे प्रकार सर्रास चालत, तिथे तर बलात्काराच्या घटना ऐकिवात नाही येत.
'लग्नाविना' विचार करणारी मंडळी एकटी पडतील, मनस्वास्थ्य गमावतील, समाजात हाहाकार होयील, अशी भीती जनमानसाला वाटते. परंतु खुल्या मानाने या गोष्टीचा स्वीकार केला तर आपोआप कुटुंबव्यवस्थेत लवचिकता येयील आणि अशी जोडपी समाधानाने आयुष्य व्यतीत करतील, अशी आशा वाटते.


From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204156502384012&l=081da06034

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5671022587480868023?BookName=Lagnavina


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर